You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. फक्त बायका-पोरंच ट्रेनमध्ये चढू शकतात: युक्रेनच्या या स्थानकावर कुटुंबांची ताटातूट

  2. रशियाच्या हवाई हल्ल्यात हे शहर असं पडलं

  3. भारताच्या भूमिकेमुळे युक्रेनमध्ये विद्यार्थी संकटात सापडले का?| सोपी गोष्ट 548

  4. युक्रेन युद्धात रशियाचं किती लष्करी नुकसान झालंय?

  5. जगात फक्त 'या' व्यक्तींकडे आहेत अणूबॉम्ब टाकण्याचे अधिकार

  6. रशियाने ताब्यात घेतलेलं चेर्नोबिल पृथ्वीवरील सगळ्यांत धोकादायक जागा

  7. युक्रेनमध्ये कार्यरत असलेली बीबीसीची टीम

    युक्रेनमधली कॅमेऱ्यामागची ही बीबीसी न्यूजची टीम आहे. तुमच्यासाठी रशिया-युक्रेन संघार्षाचे क्षणोक्षणीचे अपडेट पाठवत आहेत.

  8. ब्रेकिंग, रशियाचा झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा – युक्रेन

    रशियाच्या सैन्यानं झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे, अशी माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिलीय.

    युक्रेनस्थित झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्यानं आगीची घटना घडली होती. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात युक्रेनच्या अग्निशमन दलाला यश आलं.

    मात्र, आता या अणूऊर्जा प्रकल्पावर रशियाच्या सैन्यानं ताबा मिळवल्याची माहिती युक्रेनच्या प्रशासनानं दिली.

    या प्रकल्पातील पॉवर यूनिट्सच्या स्थितीवर संबंधित अधिकारी लक्ष ठेवून असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. रॉयटर्स वृत्तसेवा संस्थेनं ही माहिती दिली.

  9. युक्रेन युद्धात रशियाचं किती मोठं लष्करी नुकसान झालंय?

  10. रोमानियाच्या सीमेवर ज्योदिरात्य शिंदे विद्यार्थ्यांचं स्वागत करताना...

    भारत सरकारमधील चार मंत्री युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाऊन, तिथून भारतीय नागरिकांना मायदेशी पाठवण्याचं नियोजन करत आहेत.

    केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे हे रोमानियात आहेत. त्यांनी काल (3 मार्च) 219 जणांना रोमानियाच्या सीमेवरील सुसिव्हा इथून भारतात पाठवण्याची सोय केली. या नागरिकांना बुखारेस्टपर्यंत आणण्याऐवजी कमी अंतरावरील सुसिव्हा इथूनच मायदेशी पाठवण्यात आलं.

    या विमानातली बरेचसे नागरिक ओडिसामधील होते. ज्योतिरादित्य शिंदेंनी यातील काही विद्यार्थ्यांशी संवादही साधला.

  11. एअरबीएनबीने रशिया आणि बेलारुसमधील सर्व काम थांबवले

    बेलारुस आणि रशियामध्ये आपण कामकाज थांबवत आहोत असं अमेरिकन कंपनी एअरबीएनबीने जाहीर केलं आहे.

    याची माहिती या कंपनीच्या प्रमुखांनी ट्वीट करुन दिली आहे. एअरबीएनबीसारख्या अनेक कंपन्यांनी असा निर्णय घेतला आहे. युरोपातील अनेक देश, अमेरिका यांनी रशियावर अनेक आर्थिक, वाहतूक निर्बंध लादले आहेत.

  12. भर युद्धाच्या काळात युक्रेनच्या नव्या नागरिकांचा जन्म

  13. युक्रेनच्या समुद्रकिनारी स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडालं

    युक्रेनच्या समुद्रकिनारी एका स्फोटानंतर मालवाहू जहाज बुडाल्याची घटना घडलीय.

    एस्टोनियास्थित व्हिस्टा शिपिंग एजन्सी या जहाजाची मालक आहे. एस्टोनिया बाल्टिक देश असून, नेटाचा सदस्य सुद्धा आहे. या देशाची सीमा रशियाला लागून आहे.

    किनाऱ्यावर स्फोट झाल्यानंतर जहाज समुद्रात बुडालं. मात्र, हा स्फोट कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालं नाहीय.

    या जहाजावरील चालक पथकातील दोन सदस्य आणि इतर चार जणांना युक्रेनस्थित बचाव पथकानं वाचवलं.

  14. रशियाने खारकीव्हच्या या भागात क्लस्टर बाँब टाकला असं सांगण्यात येत आहे.

  15. रशियाने युक्रेनमध्ये क्लस्टर बाँबचा वापर केला, असा आरोप केला जात आहे.

  16. अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश – आपत्कालीन सेवा

    युक्रेनमधील आपत्कालीन सेवेनं अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश मिळवलंय.

    झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्पातील आग विझवण्यात यश आलं असून, या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती युक्रेनकडून देण्यात आलीय.

  17. युक्रेनमधून हे लोक कुत्रे-मांजरं का घेऊन येतायत?

  18. ब्रेकिंग, अमेरिकेनं न्यूक्लिअर रिस्पॉन्स टीम केली कार्यन्वित

    अमेरिकेच्या ऊर्जा सचिव जेनिफर ग्रॅनहोम यांनी युक्रेनच्या ऊर्जामंत्र्यांशी झोपोरिजझिया प्रकल्पातील आगीबाबत चर्चा केली आणि अमेरिकेच्या न्यूक्लिअर इन्सिडन्ट रिस्पॉन्स टीमला कार्यन्वित केलं जाणार असल्याची माहिती दिली.

    “अणूऊर्जा प्रकल्पाशी लष्करी कारवाई म्हणजे हलगर्जीपणा असून, हे थांबवलं पाहिजे,” असं ग्रॅनहोम म्हणाल्या.

    “प्रकल्पाच्या अणूभट्ट्या कंटेन्मेंट स्ट्रक्चर्सच्या मार्फत संरक्षित आहेत आणि अणूभट्ट्या सुरक्षितपणे बंद केल्या जात आहेत,” असंही त्यांनी सांगितलं.

  19. मराठी मुलं MBBS साठी युक्रेन आणि रशियाला जातात, कारण...

    युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.

    रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर शेकडो विद्यार्थी युक्रनेच्या विविध राज्यांमध्ये संकटात आले.

    एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जातात हे समोर आल्यानंतर यानिमित्तानं अनेक मुद्यांवर सध्या चर्चा सुरू आहे.

    भारतात एमबीबीएस शिक्षणासाठी खरंच कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो का? महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयांची फी किती आहे? आणि शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

  20. VIDEO : युरोपातील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पात आग

    झेलेन्स्कींनी फेसबुकवर शेअर केलेला अणूऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचा व्हीडिओ :

    युरोपमधील सर्वात मोठ्या अणूऊर्जा प्रकल्पातील सहा रिअॅक्टर्सजवळ आग लागल्याची घटना घडलीय. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी फेसबुकवर या घटनेचा व्हीडिओ शेअर केला आहे.

    हा अणूऊर्जा प्रकल्प दक्षिण-पूर्व युक्रेनमध्ये आहे. रशियाकडून होणाऱ्या गोळीबारामुळे आग विझवण्यात अडथळे येत असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येतोय.

    झेलेन्स्कींनी फेसबुकवर शेअर केलेला अणूऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचा व्हीडिओ :