ब्रेकिंग, संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या निषेधाचा ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा युनायटेड नेशन्सने निषेध करत रशियाने सैन्य मागे घ्यावं अशी मागणी केलीय.
याबाबतच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या आणीबाणीच्या सभेत मतदान करण्यात आलं.
यामध्ये एकूण 193 सदस्यांपैकी 141 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं. 5 सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं, तर 35 सदस्यांनी मतदान केलं नाही.
भारत या ठरावावरील मतदानाला अनुपस्थित होता. यापूर्वीही रशियाच्या विरोधातल्या प्रस्तावावरच्या मतदानावेळी भारत अनुपस्थित होता.
युक्रेनच्या अस्तित्त्वाचा अधिकार रशियाने हिरावून घेऊ नये, असं आवाहन या मतदानाच्या आधी युक्रेनचे राजदूत सर्गेई काईस्लित्सिया यांनी केलं होतं.
तर रशियाला पूर्व युक्रेनमधला फुटीरतावादी संघर्ष संपवायचा असल्याचं रशियाचे राजदूत वासिली नेबेंझिया यांनी म्हटलं.
1997 नंतर पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांची अशी आणीबाणीची बैठक झाली.