You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
आतापर्यंत 10 लाख लोकांनी युक्रेन सोडलं...
युक्रेन आणि रशियामध्ये गेल्या आठ दिवसांपासून संघर्ष सुरू आहे. या आठ दिवसात 10 लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडल्याची माहिती संयुक्त राष्ट्रानं दिलीय.
युक्रेनमधून बाहेर पडलेले शराणार्थी पोलंड, हंगेरी, रोमानिया आणि मोल्दोवासारख्या शेजारील देशांच्या दिशेनं जात आहेत.
युद्धामुळे देश सोडणाऱ्या युक्रेनच्या शरणार्थींना तीन वर्षांपर्यंत अस्थायी रहिवासी परमिट देण्याचं युरोपियन कमिशननं ठरवलंय. तसंच, या शरणार्थींना शिक्षण आणि आरोग्य सुविधाही पुरवल्या जातील.
ब्रझेल्समध्ये गुरुवारी झालेल्या बैठकीत युरोपियन कमिशनमधील गृहमंत्र्यांनी या योजनेला मंजुरी दिली. युरोपियन कमिशनमध्ये याआधी अशा प्रकारची सुविधा देण्यात आली नव्हती.
अणूऊर्जा प्रकल्प ‘सुरक्षित’ – अधिकारी
झोपोरिजझिया प्रदेश प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, झोपोरिजझिया अणूऊर्जा प्रकल्प ‘सुरक्षित’ आहे.
अलेक्झांडर स्टारुख यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत म्हटलंय की, झोपोरिजझिया प्रकल्पाच्या संचालकांशी आताच बोलणं झालं. त्यांनी प्रकल्पाच्या सुरक्षेची खात्री दिली.
दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय अणूऊर्जा यंत्रणेनं (IAEA)याबाबत युक्रेनच्या नेतृत्वाशी चर्चा केली. प्रकल्पातील ‘महत्वाची’ साधनं अजूनही कार्यरत आहेत, असं युक्रेनकडून IAEA ला सांगण्यात आलं.
मायभूमी सोडून जाताना...
संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 10 लाख लोक युक्रेन सोडून शेजारील देशांमध्ये स्थलांतरित झाली आहेत.
वसईचं मराठी-युक्रेनी कुटुंब युद्धभूमीतून कसं बाहेर पडलं?
एकीकडे युद्ध, दुसरीकडे निवडणूक
रशियाच्या या 8 भीषण हवाई हल्ल्यांमुळे युक्रेनचं मोठं नुकसान
युक्रेनला कोण मदत करतंय?
शनिवारी (26 फेब्रुवारी) युक्रेन सरकारने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन एक संदेश पोस्ट केला."युक्रेनच्या नागरिकांना साथ द्या. आता आम्ही क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातूनही देणगी स्वीकारत आहोत. बिटकॉईन, इथीरियम आणि अमेरिकन डॉलरच्या माध्यमातून दान द्या."
सरकारने क्रिप्टो वॉलेटचा पत्ता पोस्ट केल्यानंतर 54 लाख डॉलर एवढी देणगी जमा झाली आहे.8 तासांच्या आतच बिटकॉईन, इथिरियम आणि इतर क्रिप्टो करन्सीद्वारे युक्रेनला देणगी जमा झाली.
युक्रेनला युद्धात मदत करण्यासाठी ही रक्कम वापरली जाईल, असं युक्रेनच्या डिजिटल मंत्रालयाने सांगितलं. परंतु हे पैसे कसे वापरले जाणार हे मात्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
इलिप्टिकचे संस्थापक टॉम रॉबिन्सन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "काही समूहदान माध्यमं आणि पेमेंट कंपन्यांनी युक्रेनचं समर्थन करणाऱ्या काही गटांसाठी पैसे जमा करण्याची प्रक्रिया थांबवली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत बिटकॉईन आणि इतर क्रिप्टोकरंसीच्या माध्यमातून पैसे जमवले जात आहेत."
सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा-युक्रेनला युद्धासाठी अशी मिळत आहेत कोट्यवधींची मदत
मराठी डॉक्टरने युद्धात जखमी झालेल्यांना मदत करण्यासाठी चीन गाठलं तेव्हा...
रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा आज नववा दिवस, बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी नामदेव काटकर आणि ओंकार करंबेळकर या Live Pageच्या माध्यमातून देत आहेत.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आज नववा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ले वाढल्यानंतर लाखो लोक युक्रेन सोडून पलायन करत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या लाइव्ह पेजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तत्पूर्वी काय घडले हे आपण पाहू.
रशियाने युक्रेन केलेल्या हल्ल्याच्या कालच्या आठव्या दिवशी काय काय घडलं?
- पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच हे युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलंय.
- युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये चर्चेची दुसरी फेरी बेलारूसमध्ये सुरू झालीय. युद्ध ताबडतोब थांबवण्यात यावं, युद्धात उद्ध्वस्त झालेल्या शहरांतून आणि गावांतून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कॉरिडोर उपलब्ध करून द्यावा यासारख्या मुदद्यांवर चर्चा होणार आहे.
- युक्रेनमधल्या सर्व भारतीय नागरिकांनी तातडीने एक गुगल फॉर्म भरावा अशी सूचना युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने दिलीय.
- युक्रेनमधून आतापर्यंत 6,200 भारतीयांना परत आणण्यात आल्याचं भारत सरकारने म्हटलंय. भारतात आज 10 फ्लाईट्सद्वारे दाखल होणाऱ्या 2,185 नागरिकांचाही यात समावेश आहे.
- रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून 5.75 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी युक्रेनमधून पलायन करत शेजारच्या पोलंडमध्ये आसरा घेतलाय. हा हल्ला सुरू झाल्यापासून आतापर्यंत एकूण 10 लाखांपेक्षा जास्त लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय.
कालचे अपडेट्स जाणून घेण्यासाठीबीबीसी मराठीच्या या पेजलाभेट द्या.
‘रशियाला त्यांच्या सुरक्षेची वाटणारी चिंता रास्त’
युक्रेनचा सीरिया होऊ देऊ नका, युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांचं नाटो सदस्यांना आवाहन
कीव्हमध्ये लोकांची देवाला साद
कीव्ह आणि खारकीव्हमध्ये कुठे पोहोचलय रशियन सैन्य, नकाशांमधून समजून घ्या
भारत नाटोचा सदस्य झाल्यास फायदा होईल की तोटा?
टीव्ही चॅनेलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला कीव्हवरील हल्ला
CBS News च्या कॅमेऱ्यात कीव्हवर झालेला हल्ला कैद झाला आहे. वार्ताहराच्या मागेच मोठा स्फोट झाला आणि मग पुढे काय झालं?
रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं?
रशिया-युक्रेन संघर्षाचे सर्व अपडेट्स तुम्हाला लाइव्ह पेजवर वाचू शकता. जर तुम्ही आताच हे लाइव्ह पेज पाहात असला, तर आजच्या दिवसभरात काय काय घडलं हे थोडक्यात जाणून घ्या-
- युक्रेनचे लोक सध्या टाइम मासिकाचं मुखपृष्ठ एकमेकांत शेअर करत आहेत. कारण या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कीयांना स्थान दिले आहे.
- शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी (1 मार्च) त्यांनी खारकीव्ह सोडलं.
- खारकीव्ह आणि सुमीमधील हल्ले थांबले तर परदेशी विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट केले आहे.भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांनी रशियाकडे याची मागणी करावी असं युक्रेन सरकारने म्हटले आहे.
- रशियाच्या युक्रेन आक्रमणाचा आजचा आठवा दिवस आहे. रशिया आपल्या रहिवासी भागांवर हल्ले करत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.राजधानी कीव्हबरोबर खारकीव्हवरही मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांबद्दल रशियाने केलेल्या दाव्यावर जर्मनीच्या राजदूतांचा संताप
युक्रेनमध्ये मानवी ढाल म्हणून भारतीय विद्यार्थ्यांना बंधक बनवलं गेलं हा रशियाचा दावा म्हणजे खोटा प्रचार असल्याचं भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी म्हटलं.
एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, सरकारी प्रोपागंडा एवढ्या खालच्य पातळीवर पोहोचला आहे.
रशियन दूतावासानं संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दावा केला की, युक्रेन विद्यार्थ्यांना सशस्त्र ‘मानवी ढाली’प्रमाणे वापरत आहेआणि त्यांना रशियन भागांपर्यंत पोहोचण्यापासून अडवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.
अर्थात, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला आहे. युक्रेनमध्ये कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला बंधक बनवलं गेल्याचं कोणतंही वृत्त नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
यावर भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी लिहिलं आहे की, जे क्रूर आक्रमणकारी युक्रेनमध्ये लाखो लोकांच्या वेदनेला कारणीभूत आहेत, ते पीडितांनाच दोष देत आहेत. युक्रेनमध्ये नागरिकांवर (भारतीय विद्यार्थ्यांवरही) बॉम्ब हल्ले होत आहेत. हे सगळं अविश्वसनीय आहे.
एकिकडे रशियाचे हल्ले होत आहेत तर दुसरीकडे युक्रेनचे नवे नागरिक जन्मास येत आहेत
MBBS प्रवेशासाठी कोट्यवधी रुपयांच्या डोनेशनमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनला जातात?
युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर शेकडो विद्यार्थी युक्रनेच्या विविध राज्यांमध्ये संकटात आले.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जातात हे समोर आल्यानंतर यानिमित्तानं अनेक मुद्यांवर सध्या चर्चा सुरू आहे.
भारतात एमबीबीएस शिक्षणासाठी खरंच कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो का?
महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयांची फी किती आहे? आणि शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा- डोनेशनमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनला जातात?