You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. रशिया युक्रेन युद्ध : 'नो फ्लाय झोन' म्हणजे नेमकं काय?

  2. रशिया इन्स्टाग्रामवर बंदी घालण्याची तयारी करतंय, कारण...

  3. '...आणि सलग 25 रात्र ते माझ्यावर बलात्कार करत राहिले'

  4. युक्रेनच्या नवीन शहरांवर रशियाचे हल्ले, 'अनेक नागरिकांचा मृत्यू'

  5. सुमी शहरातील ‘ही’ शाळा हजारो सैनिकांसाठी अन्न शिजवते

  6. युक्रेनमधून पोलंडमध्ये आलेले भारतीय विद्यार्थी कोणत्या अवस्थेत आहेत?

  7. युक्रेनमधील लाखो लोकांनी सोडला देश

  8. रशिया युक्रेन युद्धाच्या वातावरणातही या जोडप्यानं 'अशी' बांधली लग्नगाठ...

  9. युक्रेन रशिया युद्ध : पोलंडमधून भारतीय विद्यार्थी असे बाहेर पडतायत

  10. तामिनाडूतून युक्रेनमध्ये शिकायला गेला, आता सैनिक होऊन रशियाविरोधात लढतोय

  11. रशियाकडे किती आण्विक शस्त्रं आहेत?

  12. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचा आजवरचा प्रवास फक्त 10 फोटोंमध्ये

  13. नाटो काय आहे? रशियाचा नाटोवर विश्वास का नाही? भारत नाटोचा सदस्य आहे का?

  14. रशिया-युक्रेन युद्धाचे भारतावर हे '3' परिणाम होणार

  15. युक्रेनमधील लोकांच्या हातात पेट्रोल बाँबचं शस्त्र

  16. अणूहल्ल्याचे अधिकार कुणाकडे असतात?

  17. नरेंद्र मोदींमुळे रशियानं 6 तास युद्ध थांबवलं या महाराष्ट्र भाजपच्या दाव्यात किती तथ्य?

    खारकिव्ह शहरातील भारतीयांना बाहेर काढण्यासंदर्भात काही बनावट बातम्या आणि राजकीय वक्तव्यं समोर आली आहेत.

    भारतीय विद्यार्थ्यांना खारकीव्हमधून बाहेर पडता यावं, यासाठी रशियाने त्या भागात सहा ते आठ तासांसाठी युद्ध थांबवलं होतं, असा दावा करणाऱ्या अनेक बनावट बातम्या आणि समाजमाध्यमांवरील पोस्ट गेल्या आठवड्यात सर्वत्र पसरले होते.

    या खोट्या बातम्या किमान आठ प्रमुख राष्ट्रीय वृत्तमाध्यमांमधून प्रसिद्ध झाल्याचं बीबीसीच्या निदर्शनास आलं. यापैकी कोणत्याही माध्यमाने आपल्या वार्तांकनात दुरुस्ती अथवा खुलासा केलेला नाही. अशा खोट्या बातम्या अजूनही त्या माध्यमांच्या संकेतस्थळांवर आणि फेसबुक, ट्विटर व यु-ट्यूब इत्यादी समाजमाध्यम मंचांवर उपलब्ध आहेत. यातील काही मंचांचे तर एक कोटींहून अधिक फॉलोअर आहेत.

    अशाच एक खोटा दावा भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र शाखेने स्वतःच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केला होता. किमान सहा प्रमुख भाजप नेत्यांनी स्वतःच्या 'व्हेरिफाइड' ट्विटर खात्यांवरून हाच दावा शेअर केला. या नेतेमंडळींचे लाखो फॉलोअर आहेत. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- हा महाराष्ट्र भाजपचा दावा किती खरा?

  18. युक्रेनमध्ये 'Z' अक्षराची दहशत

  19. 12 लाख लोक युक्रेनमधून पोलंडमध्ये

    युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून पोलंडमध्ये 12 लाख लोकांनी आसरा घेतल्याचं पोलिश गार्ड एजन्सीने म्हटलंय.

    • सोमवारी 7 मार्चच्या एका दिवसात 1,41,500 लोकांनी सीमा ओलांडल्याचं पोलिश बॉर्डर गार्ड एजन्सीने ट्विटरवर लिहिलंय. रविवारी 6 मार्चला 1,42,300 जणांनी युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केला होता.
    • युक्रेनमधून येणाऱ्या लोकांपैकी 90% युक्रेनियन नागरिक आहेत. यात बहुतेक महिला आणि मुलं आहे. यापैकी 40% जण पोलंडमधून इतर देशांमध्ये गेल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.
    • पोलंडमध्ये आधीपासूनच साधारण 10 ते 20 लाख युक्रेनियन नागरिक आहेत. आणि म्हणून युक्रेनसोडून अनेकजण आता त्यांच्या कुटुंबियांकडे किंवा मित्रमंडळींकडे रहायला आले आहेत.
    • अनेक पोलिश नागरिकांनी आपल्या घरांमध्ये युक्रेनच्या निर्वासितांना आसरा दिलाय. आणि असं करणाऱ्या पोलिश नागरिकांना आर्थिक मदत देण्यात यावी का, यावर पोलंडच्या संसदेत चर्चाही होणार आहे.
    • यासोबतच युक्रेनियन नागरिकांना पोलंडमध्ये 18 महिने राहण्याचे आणि काम करण्याचे अधिकार आणि मोफत आरोग्यसेवा आणि शालेय शिक्षण द्यायचं का यावरही चर्चा होणार आहे.
  20. आतापर्यंत काय घडलं?

    नमस्कार,युक्रेन-रशिया युद्धाला सुरुवात झाल्यापासून आपण बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजवर या युद्धाच्या सर्व घडामोडी जाणून घेत आहोत. आज या युद्धाचा चौदावा दिवस आहे. बीबीसी मराठीचे पराग फाटक आणि ओंकार करंबेळकर आजच्या घडामोडी या लाइव्ह पेजच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहेत.

    कालपर्यंत काय घडलं?

    • क्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार भारतीयांना परत आणल्याचा दावा भारत सरकारने केलाय. युक्रेनच्या सुमे शहरात अडकलेल्या सगळ्यात भारतीयांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
    • युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे. निर्वासिताचं हे प्रमाण आणि समस्या दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घटना असल्याचं युनायटेड नेशन्सचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्राँडी यांनी म्हटलं होतं.
    • रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 1,207 नागरिक ठार झाल्याचं वा जखमी झाल्याचं युनायटेड नेशन्सने त्यांच्या आकडेवारीत म्हटलंय. युक्रेनमध्ये आतापर्यंत 406 लोक मारले गेले आहेत. तर 801 नागरिक जखमी झाले आहेत. पण हा आकडा "अधिक मोठा असण्याची शक्यता असल्याचं" युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार उच्चायुक्त लिझ थ्रोसेल यांनी म्हटलंय.
    • पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.
    • युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं चित्र 'द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे. झेलेन्स्की युक्रेनचा झेंडा हातात घेऊन, युद्धभूमीवर ठामपणे उभे असल्याचे या चित्रातून दाखवण्यात आलं आहे. झेलेन्स्कींनी लष्कराचे कपडे परिधान केल्याचे या चित्रात दाखवण्यात आलंय.
    • जागतिक बँकेनं युक्रेनसाठी 700 मिलियन डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिलीय.
    • इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) चे अधिकारी चेर्नोबिलला भेट देण्याची शक्यता आहे.
    • ऑस्ट्रेलियातील ऊर्जा कंपनीनं रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतलाय.
    • अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्चं तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केलं आहे.

    कालच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा- युक्रेनमधील लोकांची देशाबाहेर पडण्यासाठी धडपड