You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार नागरिकांना परत आणल्याचा सरकारचा दावा
रशिया-युक्रेन युद्ध सुरूच असून बऱ्याच घडामोडी घडत आहेत. या युद्धाबाबत सर्व अपडेट्स तुम्ही या लाईव्ह पेजमध्ये वाचू शकता.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे and तुषार कुलकर्णी
रशियाचा युक्रेनवर हल्ला, आजच्या दिवशी काय-काय घडलं?
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा 13 वा दिवस आहे.
- युक्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार भारतीयांना परत आणल्याचा दावा भारत सरकारने केलाय. युक्रेनच्या सुमे शहरात अडकलेल्या सगळ्यात भारतीयांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
- युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे. निर्वासिताचं हे प्रमाण आणि समस्या दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घटना असल्याचं युनायटेड नेशन्सचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्राँडी यांनी म्हटलं होतं.
- रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 1,207 नागरिक ठार झाल्याचं वा जखमी झाल्याचं युनायटेड नेशन्सने त्यांच्या आकडेवारीत म्हटलंय. युक्रेनमध्ये आतापर्यंत 406 लोक मारले गेले आहेत. तर 801 नागरिक जखमी झाले आहेत. पण हा आकडा "अधिक मोठा असण्याची शक्यता असल्याचं" युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार उच्चायुक्त लिझ थ्रोसेल यांनी म्हटलंय.
- पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.
- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं चित्र 'द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे. झेलेन्स्की युक्रेनचा झेंडा हातात घेऊन, युद्धभूमीवर ठामपणे उभे असल्याचे या चित्रातून दाखवण्यात आलं आहे. झेलेन्स्कींनी लष्कराचे कपडे परिधान केल्याचे या चित्रात दाखवण्यात आलंय.
- जागतिक बँकेनं युक्रेनसाठी 700 मिलियन डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिलीय.
- इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) चे अधिकारी चेर्नोबिलला भेट देण्याची शक्यता आहे.
- ऑस्ट्रेलियातील ऊर्जा कंपनीनं रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतलाय.
- अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्च तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केलं आहे.
रशियाच्या कच्च्या तेलावर अमेरिकेत बंदी
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिका यापुढे रशियाकडून कच्च तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा आयात करणार नसल्याच जाहीर केलं आहे.
पुतिन यांच्या युद्धाला आर्थिक मदत मिळेल असं आम्ही काही करणार नाही, त्यांच तेल खरेदी करून आम्ही त्यांच्या युद्धाला हातभार लावणार नाही, असं ज्यो बायडन यांनी म्हटलंय.
अमेरिकेच्या या घोषणोनंतर तेलाच्या किंमती वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सध्या तेलाच्या किंमतीत 5 टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या कच्च्या तेलाचे प्रति बॅरल दर 130 डॉलरपर्यंत वाढले आहेत.
रशियन फौजा किती पुढे सरकल्या आहेत?
जेव्हा रशियाने गावातील पूलही पाडला...
युक्रेनमधून लोक कोणत्या देशांत पलायन करत आहेत?
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे.
युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून पोलंडमध्ये 12 लाख लोकांनी आसरा घेतल्याचं पोलिश गार्ड एजन्सीने म्हटलंय.
सोमवारी 7 मार्चच्या एका दिवसात 1,41,500 लोकांनी सीमा ओलांडल्याचं पोलिश बॉर्डर गार्ड एजन्सीने ट्विटरवर लिहीयं. रविवारी 6 मार्चला 1,42,300 जणांनी युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केला होता.
युक्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार भारतीयांना परत आणल्याचा सरकारचा दावा
युक्रेनच्या सुमे शहरात अडकलेल्या सगळ्यात भारतीयांना बाहेर काढण्यात आलं असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
उत्तराखंडचे रहिवासी जिया बलुनी यांच्यासोबत बीबीसी प्रतिनिधी अभिनव गोयल यांचं बोलणं झालं. सुमेमधून सगळे भारतीय निघाल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान ऑपरेशन गंगामार्फत मंगळवारी युक्रेनमधून 410 भारतीयांना आणण्यात आल्याचं नागरी उड्डाण मंत्रालयाने म्हटलंय. सुसेइवामधून रवाना झालेल्या विशेष प्रवासी विमानाने या लोकांना आणण्यात आलं.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑपरेशन गंगा मोहिमेद्वारे आतापर्यंत 18 हजार भारतीयांना देशात आणण्यात आल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
फेब्रुवारी 2022मध्ये ही मोहिम सुरू करण्यात आली होती.
भारतीय वायुसेनेने या मिशन अंतर्गत 12 उड्डाणं करत 2,467 लोकांना भारतात आणलं. या मिशनद्वारे 32 टन बचत सामुग्रीही पोहोचवण्यात आली.
ओलेना झेलेन्स्का : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कीच्या पत्नी कोण आहेत?
वोलोदिमीर झेलेन्स्की सतत मागणी करत असलेला 'नो फ्लाय झोन' काय असतो?
आतापर्यंत एकूण 1,207 नागरिक युक्रेनमध्ये ठार वा जखमी - युनायटेड नेशन्स
रशियाने 24 फेब्रुवारीला युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत 1,207 नागरिक ठार झाल्याचं वा जखमी झाल्याचं युनायटेड नेशन्सने त्यांच्या आकडेवारीत म्हटलंय.
युक्रेनमध्ये आतापर्यंत 406 लोक मारले गेले आहेत. तर 801 नागरिक जखमी झाले आहेत. पण हा आकडा "अधिक मोठा असण्याची शक्यता असल्याचं" युनायटेड नेशन्सच्या मानवाधिकार उच्चायुक्त लिझ थ्रोसेल यांनी म्हटलंय.
हवाई हल्ले आणि स्फोटक शस्त्रांस्त्रांमुळे बहुतेक जण जखमी झाल्याचं युएनने म्हटलंय. युक्रेनमधल्या अनेक शहरांमधल्या शेकडो निवासी इमारती या हल्ल्यांमध्ये नष्ट झाल्याचंही संयुक्त राष्ट्रांनी म्हटलंय.
युक्रेनमध्ये एक पत्रकार मारला गेल्याचंही वृत्त आहे.
रशियन सैन्याच्या ताब्यातल्या भागांमधल्या युक्रेन सैनिकांना ताब्यात घेण्यात येण्याविषयीही युएनने काळजी व्यक्त केली आहे. तर युक्रेन सरकारच्या ताब्यातल्या भूभागांमधल्या रशिया धार्जिण्या लोकांवरच्या हल्ल्यांविषयीही काळजी व्यक्त करण्यात आलीय.
संयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार रशियामध्ये युद्धाच्या विरोधात शांततापूर्ण निदर्शनं करणाऱ्या 12,700 जणांना अटक करण्यात आलीय.
तर रशियन सैन्याविषयी 'चुकीची' माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास देण्याची तरतूद असलेला कायदा रशियात मंजूर करण्यात आलाय. अनेक संघटनांनी यावर टीका केलीय.
अणुबॉम्ब वापरण्याचे अधिकार कुणाकडे असतात? सोपीगोष्ट 549
कीव्हसाठीचं युद्ध सुरूच, पहा नकाशा
रशियन फौजांनी कीव्ह ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू केल्याला आता अनेक दिवस उलटले आहेत. कीव्ह शहराच्या मध्यवर्ती भागांतल्या अनेक ठिकाणी हवाई हल्ले करण्यात आले आहेत. पण रशियन फौजा कीव्हच्या उपनगरांतून पुढे मध्यवर्ती भागांत सरकलेल्या नाहीत.
ब्रेकिंग, आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेन सोडला - युनायडेट नेशन्स
युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे.
निर्वासिताचं हे प्रमाण आणि समस्या दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घटना असल्याचं युनायटेड नेशन्सचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्राँडी यांनी म्हटलं होतं
युक्रेनमधून लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी कोणते मार्ग आहेत?
, रशिया - युक्रेन युद्ध : आतापर्यंत काय घडलं?
नमस्कार,
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा 13 वा दिवस आहे.
- युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत 20 लाख लोकांनी युक्रेनमधून पलायन केलं असल्याची माहिती युनायटेड नेशन्सने बीबीसीला दिली आहे. निर्वासिताचं हे प्रमाण आणि समस्या दुसऱ्या महायुद्धानंतरची सर्वात मोठी घटना असल्याचं युनायटेड नेशन्सचे निर्वासितांसाठीचे उच्चायुक्त फिलिपो ग्राँडी यांनी म्हटलं होतं.
- पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय. रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.
- युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं चित्र 'द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे. झेलेन्स्की युक्रेनचा झेंडा हातात घेऊन, युद्धभूमीवर ठामपणे उभे असल्याचे या चित्रातून दाखवण्यात आलं आहे. झेलेन्स्कींनी लष्कराचे कपडे परिधान केल्याचे या चित्रात दाखवण्यात आलंय.
- जागतिक बँकेनं युक्रेनसाठी 700 मिलियन डॉलरची मदत देण्यास मंजुरी दिलीय.
- इंटरनॅशनल ऑटोमिक एनर्जी एजन्सी (IAEA) चे अधिकारी चेर्नोबिलला भेट देण्याची शक्यता आहे.
- ऑस्ट्रेलियातील ऊर्जा कंपनीनं रशियातून तेल आयात थांबवली. रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने हा मोठा निर्णय घेतलाय.
आतापर्यंत 12 लाख लोकांचं युक्रेनमधून पोलंडला पलायन, अॅडम ईस्टन, वॉरसॉ करस्पाँडंट
युद्धाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनमधून पोलंडमध्ये 12 लाख लोकांनी आसरा घेतल्याचं पोलिश गार्ड एजन्सीने म्हटलंय.
सोमवारी 7 मार्चच्या एका दिवसात 1,41,500 लोकांनी सीमा ओलांडल्याचं पोलिश बॉर्डर गार्ड एजन्सीने ट्विटरवर लिहीयं. रविवारी 6 मार्चला 1,42,300 जणांनी युक्रेनमधून पोलंडमध्ये प्रवेश केला होता.
युक्रेनमधून येणाऱ्या लोकांपैकी 90% युक्रेनियन नागरिक आहेत. यात बहुतेक महिला आणि मुलं आहे. यापैकी 40% जण पोलंडमधून इतर देशांमध्ये गेल्याचा अभ्यासकांचा अंदाज आहे.
पोलंडमध्ये आधीपासूनच साधारण 10 ते 20 लाख युक्रेनियन नागरिक आहेत. आणि म्हणून युक्रेनसोडून अनेकजण आता त्यांच्या कुटुंबियांकडे किंवा मित्रमंडळींकडे रहायला आले आहेत.
अनेक पोलिश नागरिकांनी आपल्या घरांमध्ये युक्रेनच्या निर्वासितांना आसरा दिलाय. आणि असं करणाऱ्या पोलिश नागरिकांना आर्थिक मदत देण्यात यावी का, यावर पोलंडच्या संसदेत चर्चाही होणार आहे.
यासोबतच युक्रेनियन नागरिकांना पोलंडमध्ये 18 महिने राहण्याचे आणि काम करण्याचे अधिकार आणि मोफत आरोग्यसेवा आणि शालेय शिक्षण द्यायचं का यावरही चर्चा होणार आहे.
जगात असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्रं वापरण्याचा अधिकार आहे?
'द न्यूयॉर्कर'च्या मुखपृष्ठावर वोलोदिमीर झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचं चित्र 'द न्यूयॉर्कर' या प्रसिद्ध मासिकाच्य मुखपृष्ठावर छापण्यात आलं आहे.
झेलेन्स्की युक्रेनचा झेंडा हातात घेऊन, युद्धभूमीवर ठामपणे उभे असल्याचे या चित्रातून दाखवण्यात आलं आहे. झेलेन्स्कींनी लष्कराचे कपडे परिधान केल्याचे या चित्रात दाखवण्यात आलंय.
बॅरी ब्लिट यांनी हे चित्र रेखाटल्याचं 'द न्यूयॉर्कर'नं सांगितलं.
नरेंद्र मोदींमुळे रशियाने 6 तास युद्ध थांबवलं, हा महाराष्ट्र भाजपचा दावा किती खरा?
चीन आणि रशियामध्ये किती व्यापार होतो?