You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

शेतकऱ्यांसाठी, व्यापारी वर्गासाठी ठाकरे सरकारचे मोठे निर्णय

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. 'माझी मम्मा कोव्हिड वॉर्ड सांभाळते': एका नर्सच्या मुलाचं भावनिक मनोगत

  2. व्हिटामिन्स, हस्तमैथुन, ग्रीनटी: रोग प्रतिकारशक्ती वाढवायला काय करावं, काय करू नये?

  3. कोरोनाचा धोका टळला आहे असं समजू नका - WHO

    कोरोनाना आटोक्यात आला आहे किंवा त्याचा धोका टळला आहे असं समजू नका. हा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक अॅडॉनॉम घेब्रेयेसूस यांनी दिला आहे.

    अफ्रिका, पूर्व युरोप, लॅटिन आणि काही आशियाई देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे यावर जागतिक आरोग्य संघटनेनी चिंता व्यक्त केली. काही देशांमध्ये चाचण्यांचे प्रमाण कमी असल्याने रुग्णांची नोंद होत असल्याचं ते म्हणाले.

  4. आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

    1) देशभरात गेल्या 24तासांत1,396 नवे रुग्ण, एकूण 27,892बाधित

    2) महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे 8 हजार 68 रुग्ण, 342 जणांचा मृत्यू

    3) काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेटवर 11 मे पर्यंत बंदी

    4) उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी मंत्रिमंडळाची पुन्हा राज्यपालांना विनंती

    5) राज्य सरकार व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणार.

    हे लाइव्ह पेज येेथेच थांबवत आहोत. 28 एप्रिलच्या ताज्या घडामोडी तुम्ही बीबीसी मराठीच्या या लाइव्ह पेजवर पाहू शकता.

  5. राज्यात कोव्हिडचे 8590 चे रुग्ण

    आज महाराष्ट्रात 522 नवे रुग्ण सापडले असून, महाराष्ट्रात कोव्हिडच्या रुग्णांची संख्या 8590 झाली आहे.

  6. काश्मीरमध्ये हायस्पीड इंटरनेटवर 11 मे पर्यंत बंदी

    जम्मू आणि काश्मीरमध्ये 5 ऑगस्ट 2019 रोजी हायस्पीड इंटरनेटवर घातलेली बंदी 11 मे पर्यंत चालेल अशी माहिती गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

  7. #CoronaPodcast :

    3 मेनंतर लाॅकडाऊन कुठे आणि कसं शिथिल करायचं याचा निर्णय राज्य सरकारांनी घ्यावा - पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी व्यक्त केलं मत.

    उद्धव ठाकरेंच्या आमदारकीसाठी मंत्रिमंडळाची पुन्हा राज्यपालांना विनंती

    अशाच काही मुद्द्यांची आणि आज कोरोना उद्रेकाबाबत जगभरात काय काय घडलं, सांगतायत विनायक गायकवाड आणि आशिष दीक्षित

  8. व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी जीएसटी कायद्यात सुधारणा करणार, कोव्हिडबाबत मंत्रिमंडळाचे निर्णय

  9. 'लॉकडाऊनमुळे युकेमध्ये लोकांचं मानसिक आरोग्य बिघडलंय'

  10. उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषदेतील नियुक्तीबाबत निर्णय घेण्याची राज्यपालांना विनंती

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 9 एप्रिल 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता व तशी शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली होती. सध्या कोरोनाच्या संकटकाळात शासन-प्रशासन जोमाने संकटाचा मुकाबला करत आहे. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील अस्थिरता दूर होणे अत्यावश्यक आहे.

    त्यामुळे मंत्रिमंडळाने आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या एका रिक्त जागेवर विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या शिफारशींवर माननीय राज्यपाल महोदयांनी तातडीने कार्यवाही करावी या विनंतीचा पुनरुच्चार केला.

  11. अनेक नोकऱ्या जातील असं भाकित पवारांनी का व्यक्त केलं?

  12. प्लाझ्मा थेरपीच्या मदतीने इंग्लंडमध्ये उपचार सुरु

  13. कोरोनाच्या काळात पत्रकारिता करताना प्राण गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबाला 15 लाख रुपयांची मदत- पटनाईक

    कोरोना साथीच्या काळात पत्रकारिता करताना जीव गमवावा लागेलल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी जाहीर केेले आहे.

  14. निराधार, ज्येष्ठ, विकलांगांना तीन महिन्यांचं अनुदान आगाऊ मिळणार

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार सामाजिक न्यायविभागासाठी तब्बल 1273 कोटी 25 लाख रुपयांचा आगाऊ (ॲडव्हान्स्) निधी आज वितरित करण्यात आला.

    कोरोनामुळे उत्पन्नात घट असतानाही समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय प्राधान्याने घेण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

  15. चीनने कोरोनामुळे मरण पावलेल्यांची आकडेवारी लपवली का?

  16. ब्रेकिंग, कोरोनामुळे देशात आजवर 886 लोकांचा मृत्यू

  17. राज्यात पावणेदोन लाख आयसोलेशन खाटांची उपलब्धता -आरोग्यमंत्री राजेश टोपे

    राज्यात कोरोनासाठी त्रिस्तरीय उपचार व निगा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.

    सध्या तीन वर्गवारीतील 1677 उपचार केंद्र असून त्यामध्ये 1 लाख 76 हजार 347 विलगीकरण (आयसोलेशन) खाटांची संख्या आहे तर 7248 अतिदक्षता (आयसीयू) खाटांची उपलब्धता आहे.

    सुमारे तीन हजार व्हेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. 80 हजाराच्या आसपास पीपीई किटस तर 2 लाख 82 हजार एन 95 मास्क उपलब्ध आहेत, अशा प्रकारे कोरोना उपचाराची सज्जता असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

    केंद्र शासनाच्या सूचनांनुसार कोरोनावरील उपचारासाठी तीन श्रेणींमध्ये रुग्णालयांची वर्गवारी केली आहे. श्रेणी-1मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय, श्रेणी- 2 मध्ये अधिकृत कोविड रुग्णालय व निगा केंद्र तर श्रेणी 3 मध्ये कोविड रुग्ण निगा केंद्र यांचा समावेश होतो.

    या तीनही श्रेणीतील उपचार केंद्रामध्ये तापाचे रुग्ण तपासण्यासाठी फिवर क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.

  18. दारुमधून महाराष्ट्राला किती पैसा मिळतो?

  19. नव्वदी ओलांडलेल्या आजींनी केली कोरोनावर मात

    आदित्य ठाकरे यांनी या आजीचा व्हीडीओ ट्वीट केला आहे.

  20. , उद्धव ठाकरेंनी नितीन गडकरींच कौतुक करत देवेंद्र फडणवीसांकडे तर इशारा केला नाही ना?