You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

शेतकऱ्यांसाठी, व्यापारी वर्गासाठी ठाकरे सरकारचे मोठे निर्णय

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. लॉकडाऊनमध्ये गरिबांना जेवण देण्यासाठी जमीन विकली

  2. कोरोनाविषयी तुम्ही चुकीची माहिती लोकांना पाठवत तर नाहीये ना?

    निरोगी राहण्यासाठी लसूण खायला पाहिजे का? किंवा दर 15 मिनिटांनी पाणी प्यावे का? चुकीची आणि बरोबर अशा दोन्हीप्रकारची भरपूर माहिती जगभरात पसरवली जात आहे. WHOने याला माहितीच्या साथीचा आजार असं म्हटलं आहे. पण कोरोना व्हायरसविषयीची चुकीची माहिती जीवघेणी ठरू शकते.

    पाहा व्हीडिओ -

  3. क्यूबाच्या डॉक्टरांची टीम दक्षिण आफ्रिकेला पोहोचली

    क्यूबामधील दोनशेहून अधिक डॉक्टरांची टीम कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला पोहोचली आहे. क्यूबानं आतापर्यंत 1,200 आरोग्य कर्मचारी जगातल्या 22 देशांमध्ये मदतीसाठी पाठवले आहेत.

  4. यवतमाळमध्ये कोरोनाचे 71 रुग्ण

    यवतमाळमध्ये कोरोनाचे 11 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आता यवतमाळमधील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 71 झाली आहे. यवतमाळचे जिल्हाधिकारी M. D. सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

  5. प्लाझ्मा डोनेट केल्यानंतर अनुज शर्मा म्हणतात...

    दिल्लीतील अनुज शर्मा यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातून सुटका झाल्यानंतर त्यांनी आपला प्लाझ्मा डोनेट केला आहे.

    त्यानंतर ते म्हणाले, "प्लाझ्मा डोनेट करण्याची प्रक्रिया 45 मिनिटांत संपली. प्लाझ्मा डोनेट करून एखाद्याचं आयुष्य वाचत असेल, तर आपण नक्कीच ते करायला हवं."

  6. पुण्यात कोरोनाचे 55 नवीन रुग्ण

    पुण्यात सोमवारी कोरोनाचे 55 नवीन रुग्ण आढळले असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1 हजार 319 वर पोहोचली असून आतापर्यंत 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

  7. ऐन रमझानच्या महिन्यात पाकिस्तानच्या चिंतेत वाढ

    रमझानच्या महिन्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू शकतो, अशी शक्यता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे आरोग्य विषयक सचिव डॉ. जाफर मिर्झा यांनी व्यक्त केली आहे.

    पाकिस्तान सरकारनं रमझानच्या महिन्यात मशिदी बंद ठेवण्याचा आणि सामूहिक नमाज न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, मुस्लीम संघटनांच्या मागणीमुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला.

    मिर्झा यांनी म्हटलं, "रमझानच्या काळात दुकानांमध्ये गर्दी वाढते. शनिवारी मला गर्दी झालेली पाहायला मिळाली. लोकांनी आता याकडे गांभीर्यानं पाहायला हवं. नाहीतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाईल."

    शनिवारी पाकिस्तानात एका ENT सर्जनचा मृत्यू झाल्यामुळे देशातील डॉक्टरांच्या चितेंत वाढ झाली आहे.

    पाकिस्तानात कोरोनाचे आतापर्यंत 12,500 रुग्ण आढळले असून 260 जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृत आकडेवारीतून दिसत आहे.

  8. 25 टन कांदा विकत घेऊन त्याने लॉकडाऊनमध्ये गाठलं घर #5मोठ्याबातम्या

  9. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांचे मृत्यू का होत आहेत?

  10. अमेरिकेतले भारतीय डॉक्टर स्वतःला असुरक्षित का समजत आहेत?

  11. 'न्यूझीलंडनं कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली'

    न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांचं म्हणणं आहे की, "न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा असा एकही रुग्ण नाही, ज्याची तापसणी झालेली नाही. देशानं कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे."

    न्यूझीलंडमध्ये मध्यरात्रीपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आलं आहे.

    न्यूझीलंडचे आरोग्य विभागाचे संचालक अश्ले ब्लूमफील्ड यांनी म्हटलं की, "देशानं कोरोनाबाबतचं ध्येय पूर्ण केलं आहे. याचा अर्थ असा नाही की, देशात कोरोनाचा एकही रुग्ण नाही, तर कोरोनाची प्रकरणं कुठून समोर येत आहेत, याची आम्हाला माहिती आहे."

  12. मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या कमी

    मुंबईतील कंटेनमेंट झोनची संख्या 1035 वरून कमी झाली आहे. मुंबईतल्या 234 भागांत गेल्या 14 दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण न आढळल्यानं या भागांना वगळण्यात आलं आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

  13. प्लाझ्मा थेरपीनं कोरोनाचे रुग्ण बरे होणार का?

  14. पश्चिम बंगालमधल्या बाजारात मोठी गर्दी

    पश्चिम बंगालमधल्या राजा बाजार परिसरात सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा व्हीडिओ समोर आला आहे.

    भाजीपाला आणि इतर जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी इथं गर्दी केल्याचं दिसून आलं.

  15. नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्र्यांशी संवाद सुरू

    पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोरोना व्हायरसच्या संदर्भात सर्व राज्यातल्या मुख्यमंत्र्यांशी बैठक सुरू आहे. व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद साधला जात आहे.

  16. न्यूयॉर्कमध्ये आता औषधीच्या दुकानांवर कोरोनाची टेस्ट

    अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमध्ये औषधी दुकानांना कोरोनाची टेस्ट करण्याची परवानगी देण्यात आली आहे. न्यूयॉर्कच्या महापौरांनी हे आदेश दिले आहे.

    महापौर अँड्र्यू कुओमो यांनी म्हटलं की, "न्यूयॉर्कमधल्या जवळपास 5 हजार औषधी दुकांनामध्ये कोरोनाची टेस्ट होऊ शकेल आणि यामुळे प्रतिदिन 40 हजार कोरोनाच्या टेस्ट घेता येतील."

    अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांपैकी एक तृतीयांश व्यक्ती एकट्या न्यूयॉर्कमधील आहेत.

  17. महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा वाढत असला, तरी सरकार सज्ज – अमित देशमुख

    महाराष्ट्रातील लॉकडाऊन 3 मेला संपेल? राज्याची आर्थिक परिस्थिती काय?

    पाहा अमित देशमुख यांची मुलाखत.

  18. तेल ठेवायचं कुठे?

    तेलाच्या व्यापाराविषयी जगाला 20 एप्रिलला कळालं, कारण तेव्हा अमेरिकेत तेलाची किंमत शून्याखाली गेली होती. (-38 ड़ॉलरप्रति बॅरल)

    गेल्या काही महिन्यांपासून कोरोना व्हायरसदरम्यानच्या लॉकडाऊनमुळे तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात खालावली आहे. कारण जगभरातली माणसं घरातच आहेत. ते प्रवास करत नाहीयेत.

    आता अमेरिकेत इतकं तेल आहे की, ते कुठं ठेवायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. ते ठेवण्यासाठी त्यांच्याकडे जागाच शिल्लक नाही. हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांसाठी कायम राहिल, असं तज्ञांचं मत आहे.

    बीबीसीचे आर्थिक प्रतिनिधी अँड्र्यू वॉकर सांगतात...

    सध्या जगामध्ये गरजेपेक्षा वा वापरापेक्षा जास्त इंधनसाठा आहे. शिवाय आर्थिक घसरणीमुळे जगभरातली इंधनासाठीची मागणी घटलेली आहे.

    तेल उत्पादन करणाऱ्या ओपेक आणि रशियासारख्या इतर देशांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन घटवण्याचं ठरवलं होतं. अमेरिकेनेही असं केलं. पण तरीही सध्या जगात गरजेपेक्षा जास्त तेलसाठा आहे.

    आणि इतकं तेल वापरलं जाणार का, फक्त हाच प्रश्न नाही. तर लॉकडाऊन शिथील होऊन पुरेशी मागणी निर्माण होईपर्यंत इतकं तेल साठवून ठेवता येणार का, ही देखील मोठी चिंता आहे.

    साठवण क्षमता झपाट्याने संपतेय आणि तेल उत्पादन सुरूच असल्याने भविष्यात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे.

    कच्च्या तेलासाठीची जगभरातली मागणी वाढली तरच ही परिस्थिती सुधारेल. पण सध्यातरी हे जगभरातल्या आरोग्यसंकटावर अवलंबून आहे.

  19. भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 892 वर

    भारतातील कोरोना रुग्णांची संख्या 27 हजार 892 झाली असून आतापर्यंत 872 जणांचा मृत्यू झाला आहे.

    गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1 हजार 396 रुग्ण आढळले असून 48 जणांचा मृत्यू झाला आहे.

  20. इराणमधील मशिदी उघडल्या जाणार

    देशातील कोरोनाचा प्रसार ज्या भागात संपुष्टात आला आहे, अशा भागातील मशिदी सुरू करण्याचा विचार इराण करत आहे.

    इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांनी रविवारी यासंबंधी वक्तव्य केलं आहे. ईराणमध्ये आता लॉकडाऊन शिथिल करण्यात येत आहे.

    राष्ट्राध्यक्षांच्या वेबसाईटनुसार, इराणला व्हाईट, येलो आणि रेड अशा तीन भागांत विभागलं जाणार आहे. आणि मग त्यानंतर या विभागांत काही नियम लागू केले जातील.

    पण, ही नियमावली कधीपासून लागू होईल, हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही.

    इराणमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या 90,481 वर पोहोचली आहे आणि आतापर्यंत 5,710 जणांचा मृत्यू झाला आहे.