You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

शेतकऱ्यांसाठी, व्यापारी वर्गासाठी ठाकरे सरकारचे मोठे निर्णय

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. अभिनेत्री प्रार्थना बहेरे येतीये तुमच्याशी गप्पा मारायला

    आज संध्याकाळी 6 वाजता, बीबीसी मराठीच्या इन्स्टाग्राम पेजवर लाईव्ह मग तुम्ही येताय ना...

  2. हायड्रॉक्सिक्लोरोक्विन कोरोनाला हद्दपार करणार?

  3. गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1396 नवे रुग्ण सापडले आहेत

    गेल्या 24 तासांमध्ये कोरोनाचे 1396 रुग्ण सापडल्याचे आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

    85 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांत एकही रुग्ण सापडलेला नाही. ही माहिती आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

  4. लॉकडाऊन कुठे, कधी शिथील करायचा, हे राज्यांनी ठरवायचं – पंतप्रधान मोदी

  5. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेला सुरुवात

  6. लॉकडाऊनमध्ये हल्ला झाल्यावर हात तुटलेल्या पोलीस अधिकारी हरिजित सिंह यांचा शस्त्रक्रीयेनंतरचा पहिला व्हीडिओ

  7. कपिल आणि धीरज वाधवान यांना 29 पर्यंत सीबीआयच्या ताब्यात

  8. ब्रेकिंग, 'मौलाना साद फरार नाहीत'

    तबलिगी जमातचे मौलाना साद यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. ते फरार नाहीत. पोलिसांनी त्यांना हजर राहाण्याचे समन्स दिलेले नाहीत. आतापर्यंत त्यांना तीन नोटिस आल्या आहेत. त्या सर्वांची उत्तरं दिली आहेत असं मौलाना साद यांचे वकील फुजैल अयुबी यांनी स्पष्ट केलं आहे.

  9. केशरी रेशनकार्डधारकांना धान्यवाटप करण्यात येणार- मुश्रीफ

    "केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दरात प्रत्येकी 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ रेशन देण्याचा निर्णय शासनानं घेतला होता. त्याची अंंमलबजावणी आजपासून करण्यात येणार आहे.

    त्यामुळे ज्यांचे केशरी कार्ड असतील त्यांनी धान्य दुकानांमध्ये जाऊन या सुविधेचा लाभ घ्यावा " असे राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे.

  10. लॉकडाऊन आणि तेलाच्या किमतीचे राजकारण

    कोरोना व्हायरसचा जगभर झालेला उद्रेक आणि त्यातून निर्माण झालेली आरोग्यविषयक आणीबाणी याचा अनुभव आपण सगळेच मागचा महिनाभर घेत आहोत.

    या उद्रेकातून बचावासाठी अख्ख्या जगाने लॉकडाऊनचा मार्ग अनुसरला. त्यातूनच जागतिक अर्थविषयक व्यवहारही ठप्प झाले आहेत. आणि थोड्याफार फरकाने सगळेच देश याचा प्रतिकूल परिणाम भोगत आहेत.

    कोरोना संसर्गाच्या जोडीने आर्थिक मंदीचा सामना जगाला करावा लागतोय.

    त्याचाच आणखी एक परिणाम म्हणून कालचा असाधारण दिवस उगवला, जेव्हा अमेरिकन बाजारात कच्च्या तेलाच्या किमती शून्य डॉलर प्रती बॅरलच्याही खाली गेल्या.

    म्हणजे एक बॅरल तेलासाठी तेल उत्पादक कंपनी तुम्हाला उलट पैसे देणार. तुम्हाला तेलही फुकट मिळणार, वर पैसे मिळणार.

    आजतागायत जागतिक स्तरावर असं घडलेलं नाही. तेलाच्या किंमती या अर्थव्यवस्थेची तब्येत कशी आहे त्याचा एक मापदंड आहे.

    त्या शून्याखाली जाणं म्हणजे अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर असल्यांचं निर्देशक असणं असा आपला समज झाला असणं स्वाभाविक आहे.

    याचा नेमका अर्थ काय? जगभरात त्याचे आणखी काय पडसाद उमटणार आहेत? भारतावर याचा काय परिणाम होईल?

    एकंदरीतच कोरोना उद्रेक आणि लॉकडाऊनची परिस्थिती भारताने योग्य पद्धतीने हाताळली आहे का?

    हे समजून घेण्यासाठी ही मुलाखत नक्की वाचा

  11. लॉकडाऊन गप्पाः मृणाल कुलकर्णीना स्वतःची कोणती भूमिका सर्वात जास्त आवडते?

  12. लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

    लॉकडाऊनमुळे जवळपास सर्वांच्याच जीवनशैलीत बदल झाले आहेत. रिकामा वेळ असल्याने सहाजिकच जास्त खाल्लं जातं.

    ताण आणि कंटाळा घालवण्यासाठीही आपण बऱ्याचदा गरजेपेक्षा जास्त खातो आणि ते आपल्या लक्षातही येत नाही

    लॉकडाऊनमुळे सध्या भरपूर वेळ आहे. भाजीपाला आणि किराणा मालाची दुकानं खुली आहेत आणि हातात यूट्यूब आहे.

    त्यामुळे रेस्टॉरंट, बेकरी, खाऊगल्ली आणि चौपाटीवर मिळणारे चमचमीत पदार्थ घरी बनवणं सहज शक्य झालं आहे.

    घरोघरी असे पदार्थ बनवले जात आहेत. व्हॉट्सअॅपवर रोज घरी बनवलेल्या नवनवीन पदार्थांच्या फोटोंवरूनच तुम्हाला याची कल्पना आली असेलच.

    तुम्हीसुद्धा सध्या तेलकट, चमचमीत पदार्थ खात असाल तर ही बातमी नक्की वाचा. पूर्ण बातमीसाठी क्लिक करा- लॉकडाऊनमध्ये तुम्ही भरपूर खाताय का?

  13. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे स्वागत

    स्पेशल लिक्विडिट फॅसिलिटी म्हणून रिझर्व्ह बँकेने म्युच्युअल फंडांना 50,000 कोटी रुपयांची मदत केली आहे. यामुळे लहान गुंतवणुकदारांना मदत होईल अशी आशा व्यक्त करुन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे स्वागत केले.

  14. 'मौलाना साद फरार नाहीत'

    तबलिगी जमातचे मौलाना साद यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. ते फरार नाहीत. पोलिसांनी त्यांना हजर राहाण्याचे समन्स दिलेले नाहीत. आतापर्यंत त्यांना तीन नोटिस आल्या आहेत. त्या सर्वांची उत्तरं दिली आहेत असं मौलाना साद यांचे वकील फुजैल अयुबी यांनी स्पष्ट केलं आहे.

  15. महाराष्ट्राचा लॉकडाऊन प्लान - जिल्हे तीन झोन्समध्ये विभागले जाणार

  16. मुंबईसाठी काहीही... महापौर नर्सच्या गणवेशात

    मुंबईसाठी आपण काहीही काय करायला तयार आहोत. आम्ही घरातून काम करु शकत नाही. आम्ही तुमच्यासाठी काम करत आहोत. लोकांनी घरीच राहावे असा संदेश मुंबई्च्या महापौरांनी दिला.

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांच्या परिचारिकेच्या गणवेशात नायर रुग्णालयाला भेट दिली.

  17. ब्रेकिंग, कोणत्याही कंपनीला 4500 रुपयांमध्ये टेस्ट किट बनवण्यास दिलेले नाही- आयसीएमआर

    कोणत्याही कंपनीला आयसीएमआरने 4500 रुपयांमध्ये टेस्ट करण्यासाठी किट बनवण्याची ऑर्डर दिलेली नाही. आयसीएमआरने सांगितलेल्या रकमेपेक्षा स्वस्त किट तयार करुन देणाऱ्या कंपनीचे स्वागत आहे असे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे. माजी खासदार उदित राज यांनी केलेल्या पोस्टबाबत हा खुलासा करण्यात आला आहे.

  18. कोरोनाचं जपानमधील वास्तव - 12,000 कोरोनाग्रस्त रुग्ण, तज्ज्ञांना कशाची वाटते भीती?

  19. 'लॉकडाऊन एक महिन्यासाठी वाढवण्यात यावं'

    देशातील लॉकडाऊन एक महिन्यासाठी वाढवण्यात यावं, अशी मागणी ओडिशाचे आरोग्य मंत्री नाबा दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे.

  20. कोरोनाच्या रुग्णांची संख्या पोहोचली 30 लाखांजवळ

    जगभरात जवळपास 30 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

    जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 29 लाख 71 हजार 699 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.

    कोरोनामुळे आतापर्यंत कमीतकमी 2 लाख 06 हजार 549 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांची संख्या याहून अधिक असू शकते, कारण अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांविषयी अधिकृत आकडेवारी समोर आलेली नाही, असंही विद्यापीठानं म्हटलं आहे.