निकाल: युतीला बहुमत, मात्र 50:50 फॉर्मुल्यावरून रस्सीखेच

महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. केज विधानसभा मतदारसंघात भाजपच्या नमिता मुंदडा पहील्या फेरी अखेरीस आघाडीवर

  2. कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार आघाडीवर

  3. कोल्हापूर : करवीरमध्ये पहिल्या फेरीत शिवसेनेचे चंद्रदीप नरके 2446 मतांनी आघाडीवर

  4. मुक्ताईनगर : रोहिणी खडसे पिछाडीवर

  5. मेळघाट मतदारसंघातून अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल आघाडीवर

  6. सांगली : तासगावमध्ये सुमन आर आर पाटील पहिल्या फेरीत 5 हजारने आघाडीवर

  7. औशात अभिमन्यू पवारांची आघाडी

    लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपचे अभिमन्यू पवार आघाडीवर आहेत.

    अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. ते मुख्यमंत्र्यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात. त्यांची ही ओळख औशातल्या विजयासाठी पुरेशी ठरेल का, हे पाहायचे आहे.

    त्यांचे वडील दत्तात्रय पवार हे संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांच्याप्रमाणेच अभिमन्यूही लहानपणापासून संघाचे सदस्य होते.

    2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षात अनेकांना आश्चर्यकारकरीत्या उमेदवारी मिळाल्याचं चित्र आहे. लातूर जिल्ह्यातला औसा मतदारसंघ हे त्यातलंच एक उदाहरण आहे.

    गेल्या 15 वर्षांपासून अभिमन्यू पवार हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आहेत. वनवासी कल्याण आश्रममध्येही ते सक्रीय होते.

    अभिमन्यू पवार

    फोटो स्रोत, Abhimanyu Pawar/Facebook

  8. सांगली : पलूस - कडेगावमध्ये काँग्रेस विश्वजित कदम आघाडीवर

  9. धनंजय मुंडे आठशे मतांनी पुढे

    धनंजय मुंडे आठशे मतांनी पुढे आहेत.

  10. जत मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर, जत मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सावंत आघाडीवर

    जत मतदारसंघात काँग्रेसचे विक्रम सावंत पोस्टल मतदानामध्ये 1333 मतांनी आघाडीवर आहेत, तर भाजपचे विलासराव जगताप पिछाडीवर.

  11. पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री 2,560 मतांनी आघाडीवर

    पहिल्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2,560 मतांनी आघाडीवर आहेत.

  12. अमरावती : भाजपचे सुनील देशमुख 1897 मतांनी आघाडीवर, अमरावती भाजपचे उमेदवार सुनील देशमुख 1897 मतांनी आघाडीवर

    अमरावतीत भाजपचे उमेदवार सुनील देशमुख 1897 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना 2339, तर भाजपच्या सुनील देशमुख यांना 4236 मतं मिळाली आहेत.

  13. भाजपच्या कार्यालयाबाहेर जय्यत तयारी

  14. यशोमती ठाकूर पिछाडीवर, यशोमती ठाकूर पिछाडीवर

  15. काँग्रेस कार्यालयात शुकशुकाट

    सी व्होटरने दिलेल्या आकडेवारीनुसार महायुतीला 87 जागांवर आघाडी मिळाली आहे. मतमोजणी सुरु व्हायच्या आधीपासूनच भाजपच्या कार्यालयाबाहेर सजावट दिसून येत होती. पण आज सकाळपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालयाबाहेर शुकशुकाट दिसून येतोय.

    काँग्रेस कार्यालयाबाहेर ना कोणी मोठा नेता दिसून येतोय ना पक्ष कार्यकर्ते.

    काँग्रेस कार्यालय
  16. महायुतीचे 133, तर महाआघाडी 51 जागांवर आघाडीवर, महायुतीचे 133, तर महाआघाडी 51 जागांवर आघाडीवर

  17. काटोलमध्ये अनिल देशमुख आघाडीवर, काटोलमध्ये अनिल देशमुख आघाडीवर

  18. परळीतून धंनंजय मुंडे आघाडीवर

    परळीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनंजय मुंडे एक हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्यासमोर भाजपाच्या विद्यमान आमदार पंकजा मुंडे यांचं आव्हान आहे.

    बीडमधील परळी विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. राज्यातील अत्यंत चुरशीची आणि सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जातंय. याचं कारण इथून मुंडे भावंडं आमने-सामने उभे ठाकलेत.

    धनंजय मुंडे हे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि पंकजा मुंडे या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आहेत. दोघेही चुलत भाऊ-बहीण असल्यानं निवडणुकीला वेगळं महत्त्वं आहे.

    पंकजा - धनंजय

    फोटो स्रोत, Getty Images

  19. बडनेरा मतदारसंघात रवी राणांना आघाडी, बडनेरा मतदारसंघात रवी राणांना आघाडी मिळाली आहे. ते काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढत आहेत.

  20. निवडणूक निकालासाठी 25 हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक

    विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु होऊन सुरुवातीचे कल हाती यायला लागले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. विधानसभेच्या निकालाबरोबरच सातारा लोकसभा जागेचाही निकाल येणार आहे.

    राज्याच्या विविध भागांतील 269ठिकाणी 288केंद्रांवर मतमोजणी सुरू झालेली आहे. एका मतदारसंघासाठी मतदान केंद्राच्या संख्येच्या प्रमाणात 14 ते 20 टेबल ठेवण्यात आलेली आहेत. एका टेबलसाठी एक पर्यवेक्षक (सुपरवायझर), दोन साहाय्यक असे तीन मतमोजणी कर्मचारी आणि प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक राहणार असून मतमोजणीच्या सर्वात कमी म्हणजेच 13फेऱ्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात होणार असून पलूस आणि इस्लामपूर या मतदारसंघांत 14फेऱ्या होतील. तर सर्वाधिक 34 फेऱ्या ठाणे जिल्ह्य़ातील मुरबाड मतदारसंघात होणार आहेत.

    मतमोजणी

    फोटो स्रोत, Getty Images