काँग्रेसचे विश्वजित कदम 32 हजार 61 मतांनी आघाडीवर
पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजित कदम 32 हजार 61 मतांनी आघाडीवर आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.
पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे विश्वजित कदम 32 हजार 61 मतांनी आघाडीवर आहेत. ते शिवसेनेचे उमेदवार संजय विभुते यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
बीड विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर हे पाचव्या फेरी अखेरीस 100 मतांनी आघाडीवर आहेत.
राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात ते लढत आहेत. बीडमध्ये काका-पुतण्यामध्ये ही लढत होत आहे.
जाणून घ्या इथे - काका पुतण्याची लढत: कोण जिंकणार?
अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार बच्चू कडू 2855 मताने आघाडीवर आहेत. तर मेळघाटात अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल 2954 मताने आघाडीवर आहेत.
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 10000 मतांनी पिछाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील निवडणूक लढवत आहेत. इथं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात ऋतूराज पाटील 6159 मतांनी आघाडीवर.
त्यांच्याविरोधात भाजपचे अंमल महाडीक निवडणूक लढवत आहेत.
माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा मतदारसंघ असलेला सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तर शिवसेनेचे दिलीप माने पिछाडीवर आहेत.
सोलापुरात प्रणिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे नरसय्या आडम, एमआयएमचे फारुख शाब्दी आणि अपक्ष उमेदवार महेश कोठे रिंगणात आहेत.
2009 निवडणुकीत चारही पक्ष वेगळे लढल्याने भाजप आणि सेनेत झालेल्या मतविभाजनाचा प्रणिती यांना फायदा झाला होता.

फोटो स्रोत, Facebook
मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 5093 मतांनी पुढे.
त्यांचा सामना दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात त्यांचा सामना काँग्रेसच्या आशिष देशमुख यांच्याशी होतोय.
या लढतीविषयी अधिक वाचा इथे - नागपूर दक्षिण पश्चिम मतदासंघातून कोण बाजी मारणार?
अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी वरूड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि राज्याचे कृषीमंत्री अनिल बोंडे पिछाडीवर आहेत. महाआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार आघाडीवर.
बारामतीत दुसऱ्या फेरीअखेर अजित पवार 12229 मताने आघाडीवर.
गोपीचंद पडळकर यांना दुसऱ्या फेरीअखेर 2470 मतं.
पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर
कराड मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 1200 मतांनी आघाडीवर आहेत.
नागपुरमधील हिंगणा विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर मेघे 1000 मतांनी आघाडीवर.
पहिल्या फेरीत कर्जत - जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार 3099 मतांनी पुढे आहेत.
त्यांना 6313 मतं मिळाली आहेत, तर राम शिंदे यांना 3214 मतं मिळाली आहेत.
धुळे शहर मतदारसंघात अपक्ष उमेदवार अनिल गोटे 800 मतांनी आघाडीवर आहेत. निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपचा राजीनामा दिला होता.
सांगली - पृथ्वीराज पाटील (काँग्रेस)
मिरज - सुरेश खाडे (भाजप)
इस्लामपूर - जयंत पाटील (राष्ट्रवादी)
शिराळा - मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी)
पलूस कडेगाव - विश्वजीत कदम (काँग्रेस)
खानापूर - अनिल बाबर (शिवसेना)
तासगाव - सुमनताई पाटील (राष्ट्रवादी)
जत - विक्रम सावंत (काँग्रेस)
उदयनराजे भोसलेंनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली आणि महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंच्या प्रचाराचा नारळही फोडला.
त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आहेत. श्रीनिवास पाटील हे शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. दोन वेळा ते खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. ते सिक्कीमचे राज्यपालही होते.
इथे शरद पवारांनी घेतलेली भर पावसातली सभाही गाजली.

फोटो स्रोत, Getty Images
शिराळ्यात मानसिंगराव नाईक 2000 मतांनी आघाडीवर, इचलकरंजी अपक्ष प्रकाश आवाडे 5000 मतांची आघाडीवर.
वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपचे पंकज भोयर 700 मतांनी आघाडीवर, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार 1300 मतांनी आघाडीवर, देवळी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे रणजीत कांबळे 4267 मतांनी आघाडीवर, तर आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपचे दादाराव केचे 500 मतांनी आघाडीवर.
सातारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 1000 मतांनी पिछाडीवर आहेत.
शिर्डी मतदारसंघात भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील पहिल्या फेरीत 4613 मतांनी पुढे.