नागपुरात भाजपला धक्का, सुधाकर देशमुख आणि माने पराभूत
नागपुरात भाजपला दोन जागांवर कॉंग्रेसने धक्का दिला. पश्चिम नागपूरमध्ये भाजपाचे आमदार आणि राज्यमंत्री सुधाकर देशमुख यांचा धक्कादायक पराभव झालेला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरेंनी त्यांना सुमारे 5800 मतांनी पराभूत केले.
तर उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने यांचा पराभव झाला असून. येथे माजी मंत्री नितीन राऊत यांची विजयाकडे घोडदौड सुरू आहे.


