निकाल: युतीला बहुमत, मात्र 50:50 फॉर्मुल्यावरून रस्सीखेच
महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.
लाईव्ह कव्हरेज
अमरावती जिल्ह्यातले सर्व निकाल
- धामणगाव रेल्वे - भाजपचे प्रताप अडसड यांचा 87234 मतं मिळवून विजय. काँग्रेसच्या वीरेंद्र जगतापांना 87234 मतं मिळाली. प्रताप अडसड 9143 मतांनी विजयी.
- बडनेरा - रवी राणा 89776 मतांनी विजयी. शिवसेनेच्या प्रीती बंड यांना 73193 मतं. रवी राणा 15,631 मतांनी विजयी.
- अमरावतीतून काँग्रेसच्या सुलभा खोडके यांचा 80,589 मतांनी विजय. सुनील देशमुख यांना 64,188 मतं मिळाली. सुलभा खोडके यांचा 16401 मतांनी विजय.
- तिवसामध्ये काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांना 75,270 मतं प्राप्त. शिवसेनेच्या राजेश वानखडे यांना 65,230 मतं,
- यशोमती ठाकूर यांचा 10,040 मतांनी विजय.
- दर्यापूर - काँग्रेसचे बळवंत वानखेडे 95,081 मतांनी विजयी. भाजपच्या रमेश बुंदिल्यांना 64,856 मत. बळवंत वानखेडे 30,225 मतांनी विजयी.
- मेळघाट - अपक्ष उमेदवार राजकुमार पटेल 84,569 मतांनी विजयी. रमेश मावस्कर यांना 43,207.राजकुमार पटेल 41,362 मतांनी विजयी.
- अचलपूर - बच्चू कडू यांचा 81,252 मतांनी विजय. काँग्रेसच्या बबलू देशमुख यांना 72,856 मते. बच्चू कडू 8,396 मतांनी विजयी.
- मोर्शी - महाआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार 96,143 मतांनी विजयी. भाजपच्या अनिल बोंडे यांना 86,335 मतं. देवेन्द्र भुयार 9,808 मतांनी विजयी.
पुणे जिल्ह्यातले सर्व निकाल
1.कोथरुड मतदारसंघात भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा 25495 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 1,05,246 इतकी मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात मनसेचे किशोर शिंदे निवडणूक लढवत होते. त्यांना 79751 मतं मिळाली आहेत.
2.कसबा मतदारसंघातून भाजपच्या मुक्ता टिळक 28166 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसचे अरविंद शिंदे निवडणूक लढवत होते, त्यांन 47240 मते मिळाली आहेत.
3.पुणे कॅन्टोन्मेंटमधून भाजपचे सुनील कांबळे 5056 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या रमेश बागवे यांना 46,661 मतं मिळाली असून, त्यांचा पराभव झाला आहे.
4.खडकवासला मतदारसंघातून भाजपच्या भिमराव तापकीर यांचा 2 हजार 595 मतांनी विजय झाला आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सचिन दोडके यांचा पराभव झाला आहे. त्यांना 1, 17,923 मते मिळाली आहेत.
5.हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांचा 2828 मतांनी विजय झाला आहे. त्यांना 92,326 मतं मिळाली आहेत. भाजपच्या योगेश टिळेकर यांना 89,506 मते मिळाली आहेत.
6.पर्वतीमधून भाजपच्या माधुरी मिसाळ यांना 97,012 मतं मिळाली आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अश्विनी कदम निवडणूक लढवत होत्या. त्यांना 60,245 मतं मिळाली आहेत. 36 हजार मतांनी माधुरी मिसाळ यांचा विजय झाला आहे.
7.वडगावशेरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनील टिंगरे यांना 97700 मतं मिळाली असून, भाजपचे जगदीश मुळीक यांना 92725 मतं मिळाली आहेत. टिंगरे यांचा 497 मतांनी विजय झाला आहे.
8.शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे यांनी 5124 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 58727 मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता बहिरट यांना 53603 मते मिळाली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील नवे आमदार
सोलापूर जिल्ह्यातील नवे आमदार
- सोलापूर दक्षिण या मतदारसंघातून भाजपचे सुभाष देशमुख विजयी झाले आहेत.
- सोलापूर उत्तरमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख विजयी झाले आहेत.
- अक्कलकोट मतदारसंघातून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी यांना विजय मिळाला आहे.
- माळशिरस येथून भाजपचे राम सातपुते विजयी झाले आहेत.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांनाही जनतेने कौल दिला आहे.
- बार्शी मतदारसंघातल्या अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊतांना (भाजपचे बंडखोर ) विजय प्राप्त झाला आहे.
- करमाळा येथील अपक्ष उमेदवार संजय शिंदे आघाडीवर ( राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पाठिंबा ).
- पंढरपूर मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भारत भेलके यांना विजय मिळाला आहे.
- माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीकॉंग्रेसचे बबनदादा शिंदे विजयी झाले आहेत. मोहोळ येथून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे यशवंत माने विजयी झाले आहेत.
- सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत.
- सांगोल्यातून शिवसेनेचे शहाजी बापू पाटील विजयी झाले आहेत.
नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघांचे निकाल
- नागपूर दक्षिण मतदारसंघातून भाजपचे मोहन मते विजयी झाले आहेत.
- नागपूर पश्चिममधून काँग्रेसचे विकास ठाकरे विजयी झाले आहेत.
- नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिंकले आहेत.
- नागपूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसचे नितिन राऊत जिंकले आहेत.
- नागपूर पूर्वमधून भाजपचे कृष्णा खोपडे विजयी झाले आहेत.
- नागपूर मध्य मतदारसंघातून विकास कुंभारे यांचा विजय झाला आहे.
- रामटेक मतदारसंघातून अपक्ष उमेदवार आशिष जैस्वाल विजयी झाले आहेत.
- सावनेरमधून काँग्रेसचे सुनील केदार विजयी झाली आहेत.
- काटोलमधून राष्ट्रवादी काँग्रेसमधून अंनिल देशमुख विजयी झाले आहेत.
- उमरेड येथून काँग्रेसचे राजू पारवे जिंकले आहेत.
- कामाठी मतदारसंघातून भाजपचे टेकचंद सावरकर आघाडीवर आहेत.
- हिंगण्यातून भाजपच्या समीर मेघेंना विजय मिळाला आहे.
युतीला बहुमत पण भाजपचे आकडे घटले, आता शिवसेना काय करणार?
यवतमाळ जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदार संघाचे निकाल
- यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे बाळासाहेब मांगुळकर 4,000 मतांनी आघाडीवर असून, भाजपचे पालकमंत्री मदन येरावार पिछाडीवर आहेत.
- दिग्रस येथून शिवसेनेचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड 63,607 मतांनी विजयी झाले आहेत.
- राळेगावात भाजपचे अशोक उईके 10,141 मतांनी विजयी विजयी झाले आहेत.
- उमरखेड मतदारसंघातून भाजपचे नामदेव ससाणे 9,427 मतांनी विजयी झाले आहेत.
- पुसदमधून राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक 9,750 मतांनी विजयी झाले आहे. भाजपचे उमेदवार आमदार निलय नाईक पराभूत झाले आहेत.
- वणी मतदारसंघातून भाजपचे संजीवरेड्डी बोदकुरवार 17,000 मतांनी आघाडीवर आहेत, काँग्रेसचे वामनराव कासावार पिछाडीवर आहेत.
- आर्णीमधून काँग्रेसचे शिवाजी मोघे पिछाडीवर असून, भाजपचे संदीप धुर्वे 2,000 मतांनी आघाडीवर आहेत.
पुणे ग्रामीणमध्ये महाआघाडीचं वर्चस्व
- पुरंदर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला आहे.
- भोर हवेली मतदारसंघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे विजयी झाले असून, इंदापूर मतदारसंघातून आघाडीचे दत्ता भरणे यांनी विजय मिळविला आहे. भाजपात गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी पराभव केला.
- दौंडमध्ये भाजप उमेदवार राहुल कुल यांचा 618 मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांचा 618 मतांच्या फरकाने विजय झाला.
- पिंपरी चिंचवडमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी विजय मिळविला आहे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचा त्यांनी पराभव केला.
- चिंचवडमधून भाजपाचे लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा त्यांनी पराभव केला.
- मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी भाजपाचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला.
- भोसरी मधून भाजपच्या महेश लांडगे यांचा विजय झाला असून, त्यांनी अपक्ष विलास लांडे यांचा पराभव केला.
आंबेगाव, जुन्नर,शिरूर, खेड भागात आघाडी -
- जुन्नर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांचा विजय झाला असून,त्यांनी शिवसेनेच्या शरद सोनवणे यांचा पराभव केला.
- आंबेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला.
- शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांचा त्यांनी पराभव केला.
- खेड आळंदी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेच्या आमदार सुरेश गोरेंचा पराभव केला.
- शिरूर मधून अशोक पवार यांचा विजय
राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर विजयी
बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर यांचा विजय झाला आहे, मंत्री जयदत क्षीरसागर यांचा पराभव त्यांनी केला आहे. ते 1770 मतांनी विजयी झाले आहेत.
नाशिक मध्ये आतापर्यंत 8 विद्यमान आमदारांचा पराभव
1. नाशिक पूर्व : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी निकाल बाकी आहे, राहुल ढिकले (भाजप) – 43369 बाळासाहेब सानप (राष्ट्रवादी) – 38890
2. नाशिक मध्य : या मतदारसंघातून भाजपचा विजय निश्चित झाला आहे. प्रा. देवयानी फरांदे (भाजप) – 77832, हेमलता पाटील (काँग्रेस) – 44714 नितीन भोसले (मनसे) - 21971
3. नाशिक पश्चिम : भाजप आघाडीवर आहे. सीमा हिरे (भाजप) – 59892, अपूर्व हिरे (राष्ट्रवादी) – 53717
4. देवळाली (एससी राखीव) : शिवसेना, राष्ट्रवादी राष्ट्रवादी विजयी सरोज अहिरे (राष्ट्रवादी) – 84108 योगेश घोलप (शिवसेना) – 42464
5. सिन्नर : राष्ट्रवादीचा विजय, माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी) – 96644 राजाभाऊ वाजे (शिवसेना) – 94317
6. इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (एसटी राखीव) : काँग्रेस विजयी, निर्मला गावित (शिवसेना) – 54907 हिरामण खोसकर (काँग्रेस) –86392
7. दिंडोरी-पेठ (एसटी राखीव) : राष्ट्रवादी विजयी. नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी) – 124084 भास्कर गावित (शिवसेना) – 63542
8. कळवण-सुरगाणा (एसटी राखीव) : राष्ट्रवादी विजयासमीप. नितीन पवार (राष्ट्रवादी) – 85203 जे. पी. गावित (माकप) – 79307
9. बागलाण (एसटी राखीव) : भाजप विजयी. दिलीप बोरसे (भाजप) – 94390 दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी) – 60989
10. मालेगाव बाह्य : शिवसेना विजयी. दादा भुसे (शिवसेना) – 120796 डॉ. तुषार शेवाळे (काँग्रेस) – 72904
11. मालेगाव मध्य :एमआयएम MIM विजयी, आसिफ शेख (काँग्रेस) – 78723 मोलाना मुफ्ती (एमआयएम) – 117242
12. चांदवड-देवळा : भाजप विजयी. डॉ. राहुल आहेर (भाजप) – 96842 अॅड. शिरिष कोतवाल (काँग्रेस) – 69339
13. नांदगाव : शिवसेना विजयासमीप. सुहास कांदे (शिवसेना) – 85275 पंकज भुजबळ (राष्ट्रवादी) – 71386
14. येवला : राष्ट्रवादी विजयी. छगन भुजबळ (राष्ट्रवादी) – 91681 संभाजी पवार (शिवसेना) – 50328
15. निफाड : राष्ट्रवादी विजयी. अनिल कदम (शिवसेना) – 78686 दिलीप बनकर (राष्ट्रवादी) – 96354 यतिन कदम (बहुजन वंचित आघाडी) – 24046
राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे विजयी
राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे 22 हजार मतांनी विजयी झाले आहेत. भाजपाचे विद्यमान आमदार शिवाजी कर्डिले यांचा पराभव केला आहे.
भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी
शिर्डी मतदारसंघातून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील यांचा 87 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी सुरेश थोरात याचा पराभव केला आहे. सुरेश थोरात बाळासाहेब थोरात यांचे चुलत भाऊ आहेत.
काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा विजय
संगमनेर मतदारसंघातून काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा 62000 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी शिवसेनेचे साहेबराव नवले यांचा पराभव केला आहे. विखे पाटलांच्या रणनितीला अपयश आल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे लहूजी कानडे यांचा विजय
रामपूर मतदारसंघातून काॅग्रेसचे लहूजी कानडे यांनी विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांचा 21 हजार मतांनी पराभव केला आहे. भाऊसाहेब कांबळे काँग्रेसमधून शिवसेनेत आले होते.
अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख विजयी
नेवासा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजार मतांनी विजय झाला आहे. त्यांनी भाजपचे विद्यमान आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला आहे. शेतकरी क्रांतीकारी पक्षाच्या माध्यमातून गडाखांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यांना राष्ट्रवादीच्या घुलेंनीही दिला पाठिंबा दिला होता.
अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय
कोपरगाव मतदारसंघातल्या अटीतटीच्या सामन्यात राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा विजय झाला आहे. ते अवघ्या 847 मतांनी विजयी झाले आहेत.
भाजपाच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला आहे. भाजपचे बंडखोर विजय वहाडणे आणि विखेंचे मेव्हणे असलेल्या राजेश परजणे यांच्या अपक्ष उमेदवारीने स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाला आहे.
कोल्हापुरातील विजयी उमेदवार
कोल्हापुरातील विजयी उमेदवार
1 इचलकरंजीतून अपक्ष उमेदवार प्रकाश आवडे यांचा विजय झाला असून, त्यांनी भाजपचे सुरेश हाळवणकर यांना पराभूत केेले आहे.
2. कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसचे ऋतुराज पाटील विजयी झाले आहेत, त्यांच्याविरोधातील भाजपचे अंमल महाडिक पराभूत झाले आहेत.
3. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे चंद्रकांत जाधव यांनी शिवसेनेच्या राजेश क्षीरसागर यांचा पराभव केला आहे.
4. राधानगरीतून शिवसेनेचे प्रकाश आंबिटकर विजयी झाले असून, राष्ट्रवादीचे के. पी. पाटील पराभूत झाले आहेत.
5. शाहूवाडी मतदारसंघातून जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे विजयी झाले असून, त्यांनी शिवसेनेच्या सत्यजित आबा पाटील यांना पराभूत केले आहे.
7. करवीरमधून काँग्रेसचे पी. एन. पाटील विजयी झाले असून, शिवसेनेच्या चंद्रदीप नरके यांचा पराभव झाला आहे.
8. हातकणंगलेमधून काँग्रेसच्या राजू आवळेंचा विजय झाला आहे, त्यांच्याविरोधातील शिवसेनेच्या सुजित मिनचेकर यांचा पराभव झाला आहे.
9.शिरोळमधून अपक्ष उमेदवार राजेंद्र पाटील विजयी झाले असून, शिवसेनेच्या आमदार उल्हास पाटील यांचा पराभव झाला आहे.
10. चंदगड मधून राष्ट्रवादीचे राजेश पाटील विजयी झाले आहेत.
रोहित पवारांचा भरघोस मतांनी विजय
कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार 43357 इतक्या मतांनी विजयी झाले आहेत. रोहित पवार यांना 135824 इतकी भरघोस मते मिळाली आहेत, तर राम शिंदे यांना 92477 मते मिळाली आहेत.
आमचं ठरलं आहे, त्यानुसार आम्ही पुढे जाऊ - देवेंद्र फडणवीस
उद्धव ठकरेंची पत्रकार परिषद मी ऐकली आहे आमचं जे ठरलं आहे त्यानुसारच आम्ही पुढे जाऊ, असं उद्धव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं आहे.
मी उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो त्यांनी माझं अभिनंदन केलं आहे मी त्यांचं अभिनंदन केलं आहे, सरकार महायुतीचच येणार आहे, असंही त्यानी पुढे म्हटलंय.
भाजपचा स्ट्राईकरेट वाढला आहे - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद
- आम्ही जागा कमी लढवल्या, त्यातुलनेत आमच्या चांगल्या जागा आल्या आहेत
- उदयनराजे आणि पंकजा यांच्या पराभवाचा धक्का आहे
- आमचे काही मंत्री पराभूत झाले आहेत, त्याचं आम्ही विश्लेषण करू, दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी झाली, त्याचा फटका आम्हाला बसला
- अपक्ष निवडून आलेल्या 15 जणांनी माझ्याशी संपर्क केला आहे
- विरोधकांच्या जागा फार काही वाढलेल्या नाहीत.
- महायुतीला बंडखोरांचा फटका बसला.

फोटो स्रोत, ANI
