निकाल: युतीला बहुमत, मात्र 50:50 फॉर्मुल्यावरून रस्सीखेच

महाराष्ट्राचा निकाल युतीच्या बाजूने लागला असला तरी शिवसेना आणि भाजप यांच्यामधील '50:50' भागीदारीवरील रस्सीखेच पुन्हा सुरू झाली आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. 50-50 टक्के सत्तेच्या वाटपाची आठवण करून देत आहे - उद्धव ठाकरे

    मला सत्तेची घाई नाही, मी शांतपणे विचा करून निर्णय घेईन असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

    उद्धव ठाकरे
  2. हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये पेच, काँग्रेस सत्ता स्थापन करणार?

  3. भाजपपेक्षा कमी जागा येऊनही शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर वाढली का?

  4. भाजपच्या सर्व अडचणी मी समजून घेऊ शकत नाही - उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री कुणाचा होईल हा एक प्रश्न आहे.

    जागा वाटपाचा फॉर्म्युला 50-50 टक्के ठरला होता.

    भाजपच्या सर्व अडचणी मी समजून घेऊ शकत नाही.

  5. मुक्ताईनगर : रोहिणी खडसेंना पराभवाचा धक्का, अपक्ष चंद्रकांत पाटील विजयी

  6. पृथ्वीराज चव्हाण विजयी

    कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा 9 हजार 132 मतांनी विजय झाला आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे अतुल भोसले यांनी निवडणूक लढवत होते.

  7. परळीत पंकजा मुंडेंचा पराभव कशामुळे झाला?

  8. राष्ट्रवादीचे किरण लहामटे विजयी

    अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार किरण लहामटे यांचा 57 हजार मतांनी दणदणीत विजय झाला आहे. त्यांनी भाजपच्या वैभव पिचड यांचा 57689 मतांनी पराभव केला आहे. मधुकर पिचड राष्ट्रवादी सोडून भाजपत आले होते. या पराभवामुळे पिचड यांचा चाळीस वर्षांचा गड खालसा झाला आहे.

  9. दौंडमध्ये राष्ट्रवादीचा निसटता पराभव

    दौंडमध्ये राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला आहे. भाजप उमेदवार राहुल कुल यांचा ६१८ मतांनी विजय झाला आहे. चुरशीच्या लढतीत राहुल कुलांची सरशी झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात 200 मतांनी विजय झाला होता. मात्र यावर राहुल कुल यांनी आक्षेप घेत फेरमोजणी घेतली. त्यात राहुल कुल यांना 618 मतांच्या फरकाने विजय झाला आहे.

  10. राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी

    निफाडचे शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल कदम यांचा 17668 मतांनी पराभव करत राष्ट्रवादीचे दिलीप बनकर विजयी झाले आहेत.

  11. रवी राणा तिसऱ्यांदा विजयी

    बडनेरा मतदारसंघाचे महाआघाडी समर्थीत उमेदवार रवी राणा तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांना 76337 मते मिळाली असून, त्यांनी 16347 मतांनी विरोधातील शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पराभव केला आहे. बंड यांना 60113 मते मिळाली आहेत.

  12. इतका जोर लावूनही भाजपच्या जागा कमी का झाल्या?

  13. पलूस-कडेगावमधून विश्वजीत कदमांना दीड लाखांचं मताधिक्य

    पलूस-कडेगावमधून काँग्रेसचे विश्वजित कदम दीड लाखांहून अधिक मताधिक्यानं विजयी झाले आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं ही NOTA ला मिळाली आहेत. सांगली-तासगावमधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार आणि आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमन पाटील या 61 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत.

    विश्वजित कदम ज्योतिरादित्य सिंधियांसोबत

    फोटो स्रोत, FACEBOOK

    फोटो कॅप्शन, विश्वजित कदम ज्योतिरादित्य सिंधियांसोबत
  14. सांगली जिल्ह्यात भाजपला फटका दोन आमदार पराभूत

    सांगली जिल्ह्यात भाजपला फटका बसला असून, दोन आमदार पराभूत झाले आहेत. भाजपचे जतचे उमेदवार विलासराव जगताप आणि शिराळ्याचे उमेदवार शिवाजीराव नाईक पराभूत झाले आहेत.

  15. मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी पराभूत

    मुक्ताईनगरमधून भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या आहेत.

    अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी रोहिणी खडसेंचा पराभव केला. चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला होता.

    एकनाथ खडसे-रोहिणी खडसे

    फोटो स्रोत, FACEBOOK

    फोटो कॅप्शन, एकनाथ खडसे-रोहिणी खडसे
  16. जनतेची मी आभारी आहे: सुप्रिया सुळे

    "महाराष्ट्राच्या जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी मी त्यांची आभारी आहे. साम दाम दंड भेद वापरू, ईडी लावू काय वाटेल ते करू, पण आम्ही जिंकणारच हे मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट होतं. पण नेहमी सत्याचाच विजय होतो," असं सुप्रिया सुळे यांनी निकालानंतर म्हटलं आहे.

  17. भाजपचे दिलीप बोरसे विजयी

    बागलाण विधानसभेच्या राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार दीपिका चव्हाण यांचा 33,694 मतांनी पराभव करत, भाजपचे दिलीप बोरसे विजयी झाले आहेत.

  18. आमदार मुश्रीफ 27673 मतांनी विजयी

    कागल मतदारसंघाच्या अंतिम निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ 27673 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांना 115438 मते मिळाली आहेत. तर अपक्ष उमेदवार समरजितसिह घाटगे यांना 87765 मते मिळाली आहेत, तर सेनेच्या संजयबाबा घाटगे यांना 55070 मते मिळाली आहेत.

  19. अचलपूर विधानसभा निकाल जाहीर

    प्रहार जनशक्ती पक्षाचे अचलपूर मतदारसंघाचे उमेदवार बच्चू कडू चौथ्यांदा विजयी झाले आहेत. त्यांना 81252 मते मिळाली आहेत. त्यांच्याविरोधातील काँग्रेसचे उमेदवार बबलू देशमुख यांना 72856 मते मिळाली आहेत.

  20. राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील

    चंदगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील विजयी झाले आहेत. त्यांनी साडेचार हजार मतांनी त्यांचा विजय झाला आहे.