You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड
पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.
लाईव्ह कव्हरेज
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी केले नरेंद्र मोदींचे अभिनंदन
श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले.
कोल्हापूरः संजय मंडलिक यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक यांनी आघाडी घेतली आहे. कागल शहरामध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.
पणजी विधानसभेची जागा भाजपनं गमावली
गोवा विधानसभेच्या पणजी मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा पराभव झाला असून काँग्रेसच्या बाबुश मॉन्सेरॉत यांचा विजय झाला आहे.
(स्रोतः एएनआय)
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये विनायक राऊत आघाडीवर
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विनायक राऊत आघाडीवर आहेत. त्यांना 1 लाख 37 हजार 359 मते तर नीलेश राणे यांना 81,720 मते मिळाली आहेत.
आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांना मोठ झटका, विधानसभेच्या 175 पैकी 149 जागांवर YSR काँग्रेस आघाडीवर, तेलुगू देसम फक्त 25 जागांवर आघाडीवर
शिरूर मतदारसंघात अमोल कोल्हे 21 हजार मतांनी आघाडीवर
शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हे यांना 1 लाख 76 हजार 474 मते मिळाली आहेत तर
शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना 1 लाख 55 हजार 437 मते मिळाली आहेत.
ही आकडेवारी 8 व्या फेरीनंतरच्या मोजणीनंतरची आहे.
मुंबईच्या सर्व जागा युतीलाच मिळणार- किरीट सोमय्या
भाजपमध्ये जी जबाबदारी मिळते ती आम्ही पार पाडतो. 6 महिन्यांमध्ये येणाऱ्या विधानसभेतही आमचा विजय होईल. असं मत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं.
पार्थ पवारला मावळमधून लढवण्याचा निर्णय चुकीचा - विनोद तावडे
पार्थ पवारला मावळमधून लढवणं हा पवार कुटुंबाचा चुकीचा निर्णय होता, असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलं आहे. मावळ हा आमचा गड आहे, असा दावा सुद्धा त्यांनी केला आहे.
ब्रेकिंग, उत्तर प्रदेशात 80 पैकी 56 जागांवर भाजप आघाडीवर
उत्तर प्रदेशात 80 जागांपैकी 56 जागांवर भाजप आघाडीवर आहे. 12 जागांवर बहुजन समाजवादी पार्टी आणि 8 जागांवर समाजवादी पार्टीने आघाडी घेतली आहे.
उत्तराखंडमधील सर्व 5 जागांवर भाजप आघाडीवर आहे.
ज्ममू-काश्मीरमधील 6 जागांपैकी 3 जागांवर भाजप आणि 3 जागांवर नॅशनल काॅन्फरन्स आघाडीवर आहे.
ओडिशामध्ये 21 पैकी 14 जागांवर बिजू जनता दल तर 7 जागांवर भाजपा आघाडीवर आहे.
ब्रेकिंग : औरंगाबादमध्ये इम्तियाज जलील 12,742 मतांनी आघाडीवर
जम्मू काश्मीरमध्ये भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स 3-3 जागांवर आघाडीवर
जम्मू काश्मीरमध्ये 6 पैकी भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्स प्रत्येकी 3 जागांवर आघाडीवर आहेत.
सेन्सेक्स 40 हजार पार: निवडणूक निकालांमुळे शेअर बाजार का वधारतात?
नाशिकमध्ये हेमंत गोडसे 19762 मतांनी आघाडीवर
नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे यांना 61863 मते मिळाली आहेत तर राष्ट्रवादीच्या समीर भुजबळ यांना 42101 मते मिळाली आहेत.
दिंडोरी मतदारसंघात भाजपच्या भारती पवार यांना 1,06862 मते मिळाली आहेत तर राष्ट्रवादीच्या धनराज महाले यांना 66353 मते मिळाली आहेत. भारती पवार 40327 मतांनी आघाडीवर आहेत.
कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूत फेरफार करणं शक्य आहे- डॉ. प्रकाश आंबेडकर
मतपत्रिकांद्वारे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत आपण मतदानात सहभागी होणार नाही अशी भूमिका विरोधकांनी घ्यायला हवी. कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये फेरफार शक्य आहे. असे मत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
…आणि सनी लिओनी ट्रेंड होऊ लागली!
देशभरात आज एकच विषय गाजतोय – निवडणूक निकाल. चहाच्या टपऱ्यांवरून सोशल मीडियाच्या ट्रेंड्सपर्यंत फक्त निकालांसंबंधीचे हॅशटॅग्स ट्रेंड करत असतानाच अचानक पुढे आलं ते नाव म्हणजे सनी लिओनी.
पूर्वाश्रमीची अडल्ट इंडस्ट्री स्टार आणि आता बॉलिवुडची अभिनेत्री असलेल्या सनीचं नाव पुढे आलं एका चुकीमुळे.
रिपब्लिक चॅनलचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनी निवडणूक निकालांची माहिती देण्याच्या गडबडीत ही गफलत केली. पंजाबच्या गुरुदासपूर येथून सनी देओल भाजपच्या तिकीटवर लढत आहेत.
पण त्याची माहिती देताना त्यांनी अचानक सनी देओल ऐवजी लियोनी हे नाव घेतलं.
त्याचीच चर्चा सध्या सर्वत्र होत असून लोकांनी त्या विशिष्ट क्षणाची क्लिप सोशल मीडियावर शेअर केली आहे.
‘माझा विजय म्हणजे धर्माचा विजय’- प्रज्ञा सिंह ठाकूर
भोपाळच्या भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या पुढे आहेत, असं ताजी आकडेवारी सांगतेय.
त्यावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, “निश्चितच माझा विजय होणार. माझा विजय म्हणजे धर्माचा विजय आणि अधर्माचा नाश. भोपाळच्या जनतेची मी आभारी आहे.”
पाहा निवडणूक निकाल LIVE आणि विश्लेषण
अजूनही विजयाची अपेक्षा - कन्हैय्या कुमार
सध्या आम्हाला कमी आकडे मिळत आहेत, पण याचा अर्थ असा नाही की शेवटपर्यंत अशीच स्थिती राहिल. असं वक्तव्य कन्हैय्या कुमार यांनी केलं आहे.
ओडिशामध्ये 21 पैकी 14 जागांवर बीजू जनता दल आघाडीवर
ओडिशामध्ये 21 पैकी 14 जागांवर बीजू जनता दल आघाडीवर आहे. तर 7 जागांवर भाजप आघाडीवर आहे.