You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

मोदी सरकार: नरेंद्र मोदींची संसदीय दलाच्या नेतेपदी निवड

पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत. निकाल ते सत्तास्थापनेच्या सर्व ताज्या घडामोडी पाहा बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर.

लाईव्ह कव्हरेज

  1. या 7 मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीमुळे झाला काँग्रेसचा पराभव?

  2. महाराष्ट्रातील खासदार यादी 2019 - लोकसभा महाराष्ट्र खासदार

  3. या निकालांचा महाराष्ट्र विधानसभेत कुणाला फायदा, कुणाला फटका?

  4. मोदी-शहांनी घेतली मुरली मनोहर जोशींची भेट

    आडवाणींची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्येष्ठ भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांचीसुद्धा त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

    "डॉ. मुरली मनोहर जोशी हे शिक्षणतज्ज्ञ आहेत. त्यांनी भारतीय शिक्षण व्यवस्थेला खूप मोठं योगदान दिलंय. त्यांनी पक्षबांधणीत तसंच भाजप कार्यकर्त्यांना तयार करण्यात मोलाचं योगदान दिलं आहे, मी सुद्धा त्यांच्यापैकीच एक आहे," असं मोदी म्हणाले.

  5. मोदी, शहांनी घेतली आडवाणींची भेट

    विजयाच्या दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

    “आज भाजपला मिळालेलं हे यश त्यांच्यासारख्या दिग्गजांनी घेतलेल्या इतक्या वर्षांच्या मेहनतीची फलश्रुती आहे. त्यांनीच जनतेपुढे एक नवीन पर्यायी विचारसरणी मांडली,” असं त्यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं.

  6. राज्यातील अखेरचा निकाल जाहीर

    सुप्रभातम!

    राज्यात मतमोजणी रात्रभर सुरूच होती. रात्रीतून जवळजवळ 25 मतदारसंघांचे निकाल लागले आणि तेही बऱ्याच अंशी भाजप-सेने युतीच्याच बाजूने.

    शुक्रवारी सकाळी आलेल्या शेवटच्या निकालातून रामटेकमध्ये शिवसेनेच्या कृपाल तुमाने यांचा विजय झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

    त्यानुसार राज्यातली अंतिम तालिका अशी आहे -

  7. महाराष्ट्र लोकसभा निकाल: राज्यातल्या सर्व 48 मतदारसंघातील विजयी उमेदवारांची यादी

  8. शिरूर लोकसभा निकाल : अमोल कोल्हे यांचा विजय, शिवाजीराव आढळराव पराभूत

  9. मावळमध्ये पार्थ पवार 2.16 लाख मतांनी पराभूत, श्रीरंग बारणे विजयी

  10. बारामती लोकसभा निकाल : सुप्रिया सुळे 1 लाखांहून अधिक मतांनी विजयी

  11. औरंगाबाद लोकसभा निकाल : MIM चे इम्तियाज जलील विजयी, चंद्रकांत खैरे यांचा पराभव

  12. नांदेड लोकसभा निकाल : अशोक चव्हाण यांचा परभाव, प्रतापराव पाटील विजयी

  13. सुजय विखे पाटील अहमदनगरचे नवे खासदार, संग्राम जगताप यांचा केला पराभव

  14. औरंगाबादमधून MIM चे इम्तियाज जलील विजयी

    औरंगाबादमधून वंचित बहुजन आघाडी आणि MIM चे इम्तियाज जलील विजयी झाले आहेत. सलग चार टर्म खासदार राहिलेल्या चंद्रकांत खैरेंचा त्यांनी पराभव केला आहे.

  15. लोकसभा निकाल : राज ठाकरेंचा 'हाय टेक' प्रचार का ठरला प्रभावहीन?

  16. मतदारांप्रती कृतज्ञ - नवीन पटनाईक

    बिजू जनता दलाला मतदान करणाऱ्या मतदारांप्रती मी कृतज्ञ आहे. पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांचे मन:पूर्वक आभार. मतदानासाठी बाहेर पडलेल्या महिला मतदारांचे विशेष आभार.

  17. मुंबई लोकसभा निकाल: भाजप-शिवसेनेची सर्व 6 जागांवर आघाडी

  18. हा लोकशाहीचा विजय आहे, हा विजय जनतेला समर्पित - नरेंद्र मोदी

    "2019 लोकसभेचा जनादेश देशवासीयांकडे नव्या भारताच्या उभारणीसाठी आहे. मतदारांना मी वंदन करतो. मतदानाचे आकडे जगभरातील लोकशाही व्यवस्था असणाऱ्या देशातली सगळ्यांत मोठी घटना. इतक्या निवडणुका झाल्या परंतु स्वातंत्र्यानंतर सगळ्यांत अधिक मतदान या निवडणुकीत झालं. प्रचंड उन्हात मतदारांनी मतदान केलं. हे भारतीय मतदारांच्या जागृतीचं लक्षण आहे. जगाला याची दखल घ्यावी लागेल. लोकशाही म्हणन भारतीय शक्तीची जगाला नोंद घ्यावी लागेल."

    “मी कुणाच्या बाजूने नाही. मी हस्तिनापुरासाठी लढत आहे” असं श्रीकृष्णाने सांगितलं होतं. 130 कोटी नागरिक श्रीकृष्णाप्रमाणे भारतासाठी उभे आहेत. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, एखादा पक्ष, नेता लढत नाहीये. या निवडणुका देशातली जनता लढवत आहेत. त्यांचे कान,डोळे बंद होते त्यांच्यासाठी माझं बोलणं समजणं अवघड होतं. जनताजनार्दनाने माझं बोलणं समजून घेतलं. हिंदुस्तान विजयी झाला आहे. जनतेचा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे. नम्रतापूर्वक विजय जनतेप्रती समर्पित करतो.

    - नरेंद्र मोदी

  19. नरेंद्र मोदी LIVE : नरेंद्र मोदींचे विजयाचे भाषण

  20. निकाल लोकसभेचा आणि सनी लिओनी झाली ट्रेंड... : सोशल