काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी रुग्णालयात दाखल

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींना दिल्लीतील सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींना कोव्हिडची लागण झाली होती. कोव्हिडशी संबंधितच त्रास सुरू झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं.

काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवलांनी ट्वीट करून सोनिया गांधींच्या तब्येतीबाबत माहिती दिली.

रणदीप सुरजेवालांच्या माहितीनुसार, "काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना कोव्हिडशी संबंधित त्रास सुरू झाल्यानं त्यांना सर गंगा राम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांची तब्येत आता स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे."

तसंच, सुरजेवाला पुढे म्हणाले की, "काँग्रेसचे सर्व कार्यकर्त्यांचे आम्ही आभार मानतो की, त्यांनी सोनिया गांधींच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली आणि सदिच्छा व्यक्त केल्या."

दहा-एक दिवसांपूर्वी सोनिया गांधींना कोव्हिडची लक्षणं जाणवू लागली. त्यानंतर चाचणी केली असता त्यांना कोव्हिडची लागण झाल्याचं समोर आलं. त्यांना सौम्य ताप आणि इतर काही लक्षणं जाणवली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. मात्र, आता लक्षणांचा त्रास अधिक जाणवू लागल्यानं त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

रुग्णालयातील खासगी वॉर्डमध्ये सोनिया गांधींना ठेवण्यात आलं असून, तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्या तब्येतीवर देखरेख ठेवत आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)