You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: 20 कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण विलगीकरण केंद्रातून पसार
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI कॉलेज या विलगीकरण केंद्रातून 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी पलायन केलं आहे. या सगळ्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर काल साधारण 8.30 वाजता त्यांना या केंद्रावर दाखल करण्यात आले होते.
या लोकांना परत केंद्रात आणले जाईल अशी माहिती आरोग्य अधिकारी धर्मेश चव्हाण यांनी दिली.
"पलायन झालेले गावपाड्यातील नागरिक आहेत. त्यामुळं त्यांच्यातल्या धास्तीमुळे ते परतले असतील किंवा त्यांना काहीही झालेलं नाही, असं वाटत असावं म्हणून ते या केंद्रामधून परतले असावेत. उद्या आम्ही त्यांना परत आणू, असं तालुका घाटंजीचे तालुका आरोग्य अधिकारी धर्मेश चव्हाण यांनी सांगितले.
- वाचा -कोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-लहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय?
- वाचा-कोरोनाची लक्षणं जाणवल्यावर कोणती टेस्ट करायची?
- वाचा-लस घेण्यासाठी Co-Win वर नोंदणी कशी करायची?
- वाचा- कोरोना लसीकरणाबाबत तुम्हाला पडलेले 15 प्रश्न आणि त्यांची उत्तरं
24 एप्रिलला साधारण दुपारच्या सुमारास 20 रुग्ण विलगीकरण कक्षातून बाहेर पडले. घाटंजी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 65 कोरोना रुग्ण दाखल होते अशी माहिती आहे. त्यापैकी 20 कोरोना रुग्णांनी पलायन केल्याची माहिती आहे.
दरम्यान ते किती लोकांना भेटले असतील याचाही शोध घेणे प्रशासनासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)