You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'कुमकुम भाग्य', 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' टीव्ही सीरियलची अभिनेत्री संचिता उगलेनी संपवले जीवन
'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया - नई पीढी एन किस्से' आणि 'दिलवाली दुल्हा ले जाएगी अशा टीव्ही सीरियलमध्ये भूमिका केलेल्या अभिनेत्री संचिता उगलेनी आपले जीवन संपवले, अशी माहिती पोलिसांनी दिली. ती 22 वर्षांची होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जून रोजी (रविवार) संध्याकाळी नालासोपाऱ्यात ही घटना घडली.
पोलीस उपायुक्त (एसीपी) उमेश माने पाटील म्हणाले, "घटनेची माहिती मिळताच पोलीस टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली. तिथे कोणतीही संशयास्पद वस्तू मिळालेली नाही आणि कोणतीही नोटदेखील मिळालेली नाही."
"अभिनेत्रीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितलं की, त्यांना कोणावर संशय नाही. ते कोणालाही या मृत्यूसाठी जबाबदार मानत नाहीत," असंही माने यांनी नमूद केलं.
पोलीस मृत्यूचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
संचिता उगलेनं 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया - नई पीढी एन किस्से' आणि 'दिलवाली दुल्हा ले जाएगी' यासारख्या सीरीयल्समध्ये भूमिका केल्या आहेत.
(आत्महत्या ही एक गंभीर मानसिक आणि सामाजिक समस्या आहे. जर तुम्हीदेखील तणावात असाल तर भारत सरकारच्या जीवनसाथी हेल्पलाइन 18002333330 ची मदत घेऊ शकता. तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि नातेवाईकांशी देखील बोललं पाहिजे.)
पोलिसांनी काय माहिती दिली?
पोलीस उपायुक्त (एसीपी) उमेश माने पाटील म्हणाले, "14 जूनला आचोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक प्रकरण समोर आलं आहे."
काही कारणास्तव 22 वर्षीय संचिता उगलेनी आपले जीवन संपवल्याचे पोलिसांनी सांगितले.
माने यांनी सांगितले की " संचिताचे वडील मच्छिंद्र उगले यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पंचनामा आणि पुढील कारवाई सुरू आहे. तपासानंतर मृत्यूचं कारण समोर येईल. त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल."
"घटनास्थळी कोणतीही नोट सापडली नाही. तसेच तिच्या वडिलांची यासंदर्भात कोणाच्याही विरोधात तक्रार नाही," असे माने यांनी माध्यमांना सांगितले.
महत्त्वाची सूचना
औषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.
- हितगुज हेल्पलाईन, मुंबई - 022- 24131212
- सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)
- इंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820
- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000
- विद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)