शिवसेनेत बंड ते मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंकडे आता उपमुख्यमंत्रिपद
शिवसेनेत बंड ते मुख्यमंत्री, एकनाथ शिंदेंकडे आता उपमुख्यमंत्रिपद
Published
एकनाथ शिंदे हे नाव कोणाच्या ध्यानीमनीही नसतांना बघता बघता मोठं होत गेलं आणि अत्यंत कमी वेळात वेगानं महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक केंद्रस्थान बनलं. शिंदेंना, ते 1 जुलै 2022 ला मुख्यमंत्री होण्याअगोदर, कायम दुय्यम स्थान मिळालं. ते 'ठाकरे'केंद्रित शिवसेनेतही अनेक नेत्यांपैकी एक होते. मंत्रिमंडळात इतर अनेकांपैकी एक होते. राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ज्यांची नावं गेल्या दोन दशकांमध्ये राहिली, त्यातही ते नव्हते किंवा खूप मागे होते. जून 2022 चं शिवसेनतलं अभूतपूर्व बंड झालं आणि एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या घराघरात आणि राष्ट्रीय पातळीवरही परिचित नाव झालं. कसा होता त्यांचा प्रवास? जाणून घ्या...






