देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रिपदापर्यंत 'पुन्हा परतण्याचा' असा आहे प्रवास
विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीने मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर आणि दहा दिवसांच्या चर्चेनंतर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी कोण बसेल याची घोषणा केली आहे. देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे गटनेते आणि मुख्यमंत्री होतील असे जाहीर करण्यात आले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका मांडताना मी पुन्हा येईन! अशा आशयाची एक कविता सादर केली होती. एकप्रकारे फडणवीस यांनी याद्वारे स्वतःला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं.
पण निवडणुकांनंतर निर्माण झालेली परिस्थिती वेगळी होती. राज्यातलं संपूर्ण राजकारण बदललं. शिवसेनेनं काँग्रेस, राष्ट्रवादीच्या साथीनं महाविकास आघाडी करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर विरोधकांकडून टीका करताना 'मी पुन्हा येईन' चा वापर गमतीनं केला जाऊ लागला.
पण या निवडणुकीत महायुतीला आलेलं बहुमत पाहता, 2019 साली 'मी पुन्हा येईन' अशी घोषणा केलेले फडणवीस आता पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत.
पाहा त्यांचा हा पाच वर्षांतला प्रवास
व्हीडिओ - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - अरविंद पारेकर






