या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
भारत नाटोचा सदस्य झाल्यास फायदा होईल की तोटा?
मध्यरात्रीपासून रशियाचे हल्ले थांबलेले नाहीत - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की
फोटो स्रोत, Volodymyr Zelensky
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक नवीन व्हिडिओ प्रकाशित केलाय.
मध्यरात्रीपासून रशियाने विविध शहरांवर न थांबता हल्ले केले असून युक्रेनचं सैन्य जोरदार प्रतिकार करत असल्याचं झेलेन्स्कींनी या व्हिडिओत म्हटलंय.
रशियाने आपला पवित्रा बदलत नागरी भागांवर हल्ले सुरू केले, यावरून युक्रेनने मॉस्कोचा जमिनीद्वारे हल्ला करत सहज विजय मिळवण्याचा बेत यशस्वीरित्या थोपवल्याचं दिसत असल्याचंही झेलेन्स्की म्हणाले आहे.
झेलेन्स्की म्हणाले, "आमच्याकडे स्वातंत्र्याखेरीज गमावण्याजोगं दुसरं काहीच नाही." युक्रेनला आंतरराष्ट्रीय समर्थकांकडून दररोज शस्त्रास्त्रांचा पुरवठा होत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
रशिया नागरी भागांवर बॉम्ब हल्ले करत असून याविषयीच्या 'वॉर क्राईम्स' विषयीच्या तपासाबद्दलची चर्चा एकीकडे सुरू असतानाच झेलेन्स्कींचा हा व्हिडिओ आलाय.
झेलेन्स्कींनी आपल्या या भाषणात युक्रेनच्या सैन्याचं आणि नागरिकांचंही कौतुक केलंय. रशियन सैन्य 10 पटींनी जास्त असूनही त्यांचं मनोधर्य आता खचत असून ते मोठ्या संख्येने परत जात असल्याचं झेलेन्स्कींनी म्हटलंय.
ते म्हणाले, "आमच्या सैन्याने, सीमेचं संरक्षण करणाऱ्या जवानांनी आणि शेतकऱ्यांनी अनेक रशियन सैनिकांना पकडलं. आपण इथे का आलोय हेच त्यांना माहिती नसल्याचं ते (पकडलेले रशियन सैनिक) सांगतायत.
आतापर्यंत 9,000 रशियन सैनिकांना ठार केल्याचा दावा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी केलाय.
युक्रेनचे नागरिक हत्यारं नसतानाही ज्याप्रकारे रशियन सैन्यासमोर ठामपणे उभे राहिले, त्याचं आपल्याला कौतुक असल्याचं झेलेन्स्कींनी म्हटलंय.
टीव्ही चॅनेलच्या कॅमेऱ्यात कैद झालेला कीव्हवरील हल्ला
CBS News च्या कॅमेऱ्यात कीव्हवर झालेला हल्ला कैद झाला आहे. वार्ताहराच्या मागेच मोठा
स्फोट झाला आणि मग पुढे काय झालं?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
रशिया-युक्रेन संघर्षात आतापर्यंत काय काय घडलं?
फोटो स्रोत, Getty Images
रशिया-युक्रेन संघर्षाचे सर्व अपडेट्स तुम्हाला लाइव्ह पेजवर वाचू शकता. जर
तुम्ही आताच हे लाइव्ह पेज पाहात असला, तर आजच्या दिवसभरात काय काय घडलं हे थोडक्यात
जाणून घ्या-
युक्रेनचे लोक सध्या टाइम मासिकाचं मुखपृष्ठ एकमेकांत शेअर
करत आहेत. कारण या मासिकाने आपल्या मुखपृष्ठावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष
वोलोदिमीर झेलेन्स्कीयांना
स्थान दिले आहे.
शिरुरचे 9 विद्यार्थी
युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय
विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी
(1 मार्च)
त्यांनी खारकीव्ह सोडलं.
खारकीव्ह आणि सुमीमधील हल्ले थांबले तर परदेशी
विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट
केले आहे.भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर
देशांनी रशियाकडे याची मागणी करावी असं युक्रेन सरकारने म्हटले आहे.
रशियाच्या युक्रेन आक्रमणाचा आजचा आठवा दिवस आहे. रशिया
आपल्या रहिवासी भागांवर हल्ले करत असल्याचा दावा युक्रेनने केला आहे.राजधानी कीव्हबरोबर खारकीव्हवरही मोठ्या प्रमाणात
हल्ले होत आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांबद्दल रशियाने केलेल्या दाव्यावर जर्मनीच्या राजदूतांचा संताप
फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमध्ये मानवी ढाल म्हणून
भारतीय विद्यार्थ्यांना बंधक बनवलं गेलं हा रशियाचा दावा म्हणजे खोटा प्रचार
असल्याचं भारतातील
जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी म्हटलं.
एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं आहे की, सरकारी प्रोपागंडा
एवढ्या खालच्य पातळीवर पोहोचला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त, 1
रशियन दूतावासानं संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या
हवाल्यानं दावा केला की, युक्रेन विद्यार्थ्यांना सशस्त्र ‘मानवी ढाली’प्रमाणे वापरत आहेआणि
त्यांना रशियन भागांपर्यंत पोहोचण्यापासून अडवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करत आहे.
अर्थात, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा फेटाळून लावला
आहे. युक्रेनमध्ये कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याला बंधक बनवलं गेल्याचं कोणतंही
वृत्त नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त, 2
यावर भारतातील जर्मनीचे राजदूत वॉल्टर जे लिंडनर यांनी लिहिलं
आहे की, जे क्रूर आक्रमणकारी युक्रेनमध्ये लाखो लोकांच्या वेदनेला कारणीभूत आहेत,
ते पीडितांनाच दोष देत आहेत. युक्रेनमध्ये नागरिकांवर (भारतीय विद्यार्थ्यांवरही)
बॉम्ब हल्ले होत आहेत. हे सगळं अविश्वसनीय आहे.
युक्रेनमध्ये अजूनही युद्ध सुरुच आहे
एकिकडे रशियाचे हल्ले होत आहेत तर दुसरीकडे युक्रेनचे नवे नागरिक जन्मास येत आहेत
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
MBBS प्रवेशासाठी कोट्यवधी रुपयांच्या डोनेशनमुळे महाराष्ट्रातील विद्यार्थी युक्रेनला जातात?
फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनमध्ये जवळपास 18 हजार भारतीय विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं अनेक मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर शेकडो विद्यार्थी युक्रनेच्या विविध राज्यांमध्ये संकटात आले.
एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षणासाठी जातात हे समोर आल्यानंतर यानिमित्तानं अनेक मुद्यांवर सध्या चर्चा सुरू आहे.
भारतात एमबीबीएस शिक्षणासाठी खरंच कोट्यवधी रुपयांचा खर्च होतो का?
महाराष्ट्रात खासगी महाविद्यालयांची फी किती आहे? आणि शिक्षणासाठी कोट्यवधी रुपयांच्या खर्चामुळे भारतीय विद्यार्थ्यांना विदेशात शिक्षणासाठी जावं लागतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे तिथे हजारो लोकांना विस्थापित व्हावं लागत आहे. त्यांच्याबरोबर पाळीव प्राणीही विस्थापित होत आहेत. अनेक प्राण्यांना असं आश्रयछावण्यांमध्ये राहावं लागत आहे.
हे मुके प्राणी आपल्या भाषेत बोलत नसले तरी त्यांना काहीतरी बदललं असल्याची जाणीव झाली असेल का? बोलक्या डोळ्यांतून हे प्राणी काय विनंती करत असतील?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
युक्रेनचे लोक
सध्या टाइम मासिकाचं मुखपृष्ठ एकमेकांत शेअर करत आहेत. कारण या मासिकाने आपल्या
मुखपृष्ठावर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की
यांना स्थान दिले
आहे. या फोटोसाठी युक्रेनच्या झेंड्याची पार्श्वभूमीसुद्धा वापरण्यात आली आहे.
फोटो स्रोत, Getty Images
त्यावर लिहिले आहे, वोलोदिमीर झेलेन्स्कीआणि युक्रेनचे नायक
वोलोदिमीर झेलेन्स्कीयांनी युरोपियन युनियनमध्ये केलेल्या भाषणाचा थोडा भागही यात देण्यात आला आहे.
ब्रेकिंग, शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेनमधून पोलंडला पोहोचले
शिरुरचे 9 विद्यार्थी युक्रेन सीमा ओलांडून पोलंडला पोहोचले आहेत. खारकीव्ह राष्ट्रीय वैद्यकीय विद्यापीठाचे हे सर्व विद्यार्थी आहेत. सहा दिवस बंकरमध्ये राहिल्यानंतर मंगळवारी (1 मार्च) त्यांनी खारकीव्ह सोडलं.
खारकीव्ह ते लिव्हिव्ह असा 18 तासांचा प्रवास त्यांनी रेल्वेने केला.
लिव्हिव्ह ते युक्रेन-पोलंड बॉर्डर ते बसने गेले. त्यासाठी त्यांना 14 तासांचा प्रवास करावा लागला.
आता ते पोलंड सीमेवर सरकारी निवारागृहात राहत आहेत.
"आम्ही कसेबसे आता पोलंडला पोहचलो आहोत. थंडी खूप आहे. जवळपास 400 विद्यार्थी अजून खारकीव्हलाच अडकले आहेत. काही विद्यार्थी जीव धोक्यात घालून चालत येत आहेत." अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली आहे.
युक्रेन-रशिया संघर्षामध्ये आता पुढे काय होणार?
युक्रेन सध्या रशियाच्या आक्रमणाचा सामना करत आहे. सोबतच युक्रेनची स्वत:च्या अस्तित्वासाठीची लढाईसुद्धा सुरू आहे.
युक्रेनवर रशियानं हल्ला करून आता दोन-तीन दिवस उलटले आहेत. रशियाचं सैन्य आता राजधानी कीव्हपर्यंत पोहोचलं आहे. पण, आता पुढे काय होणार हा मोठा प्रश्न आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये सध्याही संघर्ष सुरू आहे.
युक्रेनवर कब्जा करण्याच्या डिफेन्स चीफ यांच्या योजनेचा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अनेक महिने अभ्यास केला.
फोटो स्रोत, Getty Images
या योजनेनुसार, युक्रेनवर उत्तर, पूर्व आणि दक्षिण अशा तिन्ही बाजूंनी हल्ला केला जातो. बाँब तसंच मिसाईल हल्ला करून विरोधाचा जोर कमी केला जातो. त्यानंतर पायदळ आणि टँक युद्धभूमीवर उतरवले जातात.
युक्रेनच्या झेलेन्स्की सरकारनं लवकरात लवकर आत्मसमर्पण करावं आणि तिथं रशियाच्या बाजूचं सरकार स्थापन करावं, असं पुतिन यांना वाटतं. देशातील राष्ट्रीय विरोधाच्या दीर्घकालीन मोहिमेला गती देण्यापासून रोखणं, हाही यामागचा उद्देश आहे.
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजचे ब्रिगेडियर बेन बैरी यांच्या मते, रशियानं कीव्हवर यशस्वीपणे कब्जा मिळवला तर ते रशियासाठी लष्करी आणि राजकीय यश असेल.
भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमध्ये पोलिसांकडून मारहाण झाल्याचे व्हीडिओ विद्यार्थ्यांकडून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. त्यावरून मोदी सरकारच्या बचावमोहिमेवरही टीका होेतेय.
विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी ‘हे’ पाऊल उचला- युक्रेनचा भारताला सल्ला
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
खारकीव्ह आणि सुमीमधील हल्ले थांबले तर परदेशी
विद्यार्थ्यांना बाहेर काढता येईल असं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्रालयाने ट्वीट
केले आहे.
भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांनी रशियाकडे याची मागणी
करावी असं युक्रेन सरकारने म्हटले आहे.
युक्रेनचे परराष्ट्र मंत्रालय आपल्या ट्वीटमध्ये म्हणतं,
आम्ही भारत, पाकिस्तान, चीन आणि इतर देशांच्या सरकारांना आवाहन करतो की आपल्या
विद्यार्थ्यांसाठी त्यांनी रशियाकडून मानवी कॉरिडॉरची मागणी करावी, रशियाच्या
हल्ल्यामुळे हे विद्यार्थी खारकिव्ह आणि सुमीमध्ये अडकले आहेत.
जेव्हा केंद्रीय मंत्री स्मृती इराणींनी युक्रेनहून परत आलेल्या विद्यार्थ्यांचं 4 भाषांमध्ये स्वागत केलं...
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
'नवीन एस. ज्ञानगौडा जेवण आणायला गेला आणि परत आलाच नाही'
खारकीव्हमधल्या युद्धात भारतातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला विद्यार्थी नवीन एस. ज्ञानगौडा याचा मृत्यू झालाय.
खारकीव्हच्या बेकिटोव्हामध्ये एका शेल्टरमध्ये नवीनने मित्रांसोबत आसरा घेतला होता. अन्न पदार्थ विकत घेण्यासाठी नवीन बाहेर पडला होता. त्यासाठी त्याने जवळच्या एका मित्राला पैसे ट्रान्स्फरही करायला सांगितले होते.
"त्याने मला युक्रेनमधल्या सकाळी 8 वाजताच्या सुमारास फोन केला. अन्न घेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्याला आमच्यासाठी आणखी खाद्यपदार्थ विकत घ्यायचे होते," खारकीव्हमध्ये चौथ्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी श्रीकांत चेन्नेगौडाने बीबीसीशी बोलताना सांगितलं. सुरक्षेसाठी त्यांनी सध्या एका इमारतीच्या तळघरात आसरा घेतलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
युक्रेनमधून भारतीय विद्यार्थ्यांना आणणारे C-17 ग्लोबमास्टर विमान कसे आहे?, या विमानाची वैशिष्ट्ये काय आहेत-
फोटो स्रोत, Getty Images
अमेरिका आणि ब्रिटन व्यतिरिक्त भारताकडूनही C-17 चा वापर केला जातो.
बोईंगच्या वेबसाईटनुसार, भारतीय हवाई दलात ग्लोबमास्टर 3 C-17 ची संख्या सध्या 11 आहे. भारतीय हवाई दल अनेकदा मदत कार्यासाठी या विमानाचा वापर करताना दिसते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती. त्यावेळी टँकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचवण्यासाठी याच विमानाचा आधार घेण्यात आला होता.
फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेच्या हवाई दलाच्या फॅक्ट शीटनुसार हे विमान 77 हजार 519 किलोग्रॅमपर्यंत माल वाहून नेण्याची क्षमता असेल यादृष्टीने रचना करण्यात आली आहे.
सशस्त्र वाहने, ट्रक आणि अगदी एम 1 अब्राम रणगाडेही विमानात नेले जाऊ शकतात.
तीन जणांच्या क्रूमध्ये दोन वैमानिक आणि एक लोडमास्टर असतात जे मागील बाजूने विमानात माल चढवतात.
फोटो कॅप्शन, भारतीय वायूदलाचे c-17 ग्लोबमास्टर विमान रुमानियामध्ये दाखल झाले. या विमानाने 200 विद्यार्थ्यांना हिंडन येथील वायूदलाच्या तळावर आणण्यात आले.