पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय - झेलेन्स्की
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
खारकीव्ह शहराजवळ हल्ला, 2 लहान मुलांसह 8 मृत्युमुखी
फोटो स्रोत, Unian
रशियाच्या युक्रेन
आक्रमणाचा आजचा आठवा दिवस आहे. रशिया आपल्या रहिवासी भागांवर हल्ले करत असल्याचा
दावा युक्रेनने केला आहे.
राजधानी कीव्हबरोबर खारकीव्हवरही मोठ्या प्रमाणात हल्ले
होत आहेत.
खारकीव्हपासून एक-दोन तासांच्या अंतरावर असणाऱ्या इजियम
शहरात 2 मुलांसह 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
रशियाच्या हल्ल्यात सिटी
सेंटरचं मोठं नुकसान झालं आहे. आणखी एका सरकारी इमारतीला या हल्ल्याचा तडाखा
बसल्याचं आणि अनेक पोलीस जखमी झाल्याचं या शहराचे उपमहापौर वोलोदिमीर मात्सोकिन
यांनी सांगितले.
पुतीन यांच्या रशियावर कोणकोणते निर्बंध लादण्यात आले आहेत?
युक्रेनवरील हल्ल्याचा आजचा आठवा दिवस, गेल्या काही तासांमध्ये काय घडामोडी घडल्या. त्याचा थोडक्यात आढावा-
फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनची
राजधानी कीव्हमध्ये गेल्या काही तासांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट झाले आहेत. सोशल
मीडियावर या स्फोटांचे चित्रिकरण व्हायरल होत आहे.
हेगमधील
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने रशियाविरोधात युद्धातील अपराधांवर चौकशी सुरू केली आहे.
युक्रेनमधून
पलायन करणाऱ्यांची संख्या 10 लाखांपर्यंत पोहोचल्याचं संयुक्त राष्ट्राचं मत आहे.
युक्रेनच्या
राष्ट्राध्यक्षांनी बुधवारी रात्री नागरिकांना उद्देशून एक व्हीडिओ संदेश प्रसारित
केला आहे. आम्ही आक्रमण करणाऱ्यांविरोधात लढत राहू असं आवाहन त्यांनी केलं आहे.
युक्रेनचे
उत्तरेचे शहर चेर्निहाइव्हमधील एका रुग्णालयावर दोन क्रूज मिसाइल्स डागण्यात
आल्याची माहिती मिळाली आहे.
रशियन सैनिकांनी
मारियुपोल आणि खेरसोन शहरांना घेराव घातला आहे.
ब्रेकिंग, 100 भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण- बेलारुसचा दावा
फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
पोलंड सीमेवर सुरक्षारक्षकांनी 100 भारतीय विद्यार्थ्यांना
मारहाण करुन पुन्हा युक्रेनमध्ये पाठवले असा दावा बेलारुसने केला आहे.
या मुलांना रुमानियातील एका आश्रयछावणीत जागा देण्यात आली
होती असा दावा करण्यात आला आहे.
संयुक्त
राष्ट्र महासभेत बोलताना बेलारुसचे राजदूत व्हॅलेन्टाइन रयबाकोव्ह यांनी वरील
माहिती दिली.
रयबाकोव्ह म्हणाले, “पोलंडच्या सीमेवर सुरक्षारक्षकांनी 26
फेब्रुवारीला जवळपास 100 भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि परत युक्रेनला
पाठवलं. त्या मुलांना रुमानियामध्ये आश्रयछावणीत ठेवण्यात आलं आहे.”
रशियाच्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू आणि
चीनचा एक नागरिक जखमी झाल्याचं युक्रेनचे संयुक्त राष्ट्रामधील राजदूत सर्गेई
किस्लिट्स्या यांनी सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
व्लादिमीर पुतिन 'न्युक्लिअर बटन' दाबतील का?
2005 साली पुतिन यांचा क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचं निरीक्षण करतानाचा फोटो प्रसिद्ध झाला होता. आता जर युक्रेन संघर्षाची परिणती आपल्या मनाप्रमाणे होत नाहीये, हे लक्षात आलं तर पुतिन उतावीळपणे पुढचं पाऊल उचलू शकतात.
2018 साली प्रदर्शित झालेल्या एका माहितीपटात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी म्हटलं होतं, "जर कोणी रशियाला नष्ट करण्याचा प्रयत्न केला, तर आम्हालाही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा कायदेशीर अधिकार आहे. ही गोष्ट मानवतेला आणि जगासाठीही विनाशकारक असेल, हे निश्चित. पण मी रशियाचा नागरिक आणि देशाचा प्रमुख आहे. रशिया नसेल तर जगाचीही गरज काय?"
आता आपण 2022 मध्ये येऊया. पुतिन यांनी युक्रेनविरोधात पूर्ण क्षमतेनं युद्ध पुकारलं आहे, पण युक्रेनच्या लष्कराकडून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे. क्रेमलिनला धक्का देणारी अजून एक गोष्ट म्हणजे पाश्चिमात्य देशही रशियावर आर्थिक आणि वित्तीय निर्बंध लादण्यासाठी एकत्र आले. पुतिन यांच्या अधिपत्याखालील व्यवस्थेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची वेळ आली.
युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडता येईल?
फोटो स्रोत, twitter/@Gen_VKSingh
भारतीय वायू दलाच्या सी-17 विमानांमधून युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे चार केंद्रीय मंत्र्यांना वेगवेगळ्या देशात पाठवून हे विद्यार्थी भारतात यावेत यासाठी केंद्र सरकारने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
मात्र अजूनही युक्रेनमधील विविध शहरांत अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना तातडीची मदत गरज मिळणं गरजेचं आहे.
त्यामुळे युक्रेनच्या शेजारी देशांमध्ये केंद्रीय मंत्र्यांना पाठवून हे काम खरंच सोपं होईल का यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
भारत सरकारने आपल्या नागरिकांची युद्धभूमीतून यापूर्वीही सुटका करण्याच्या मोहिमा पूर्ण केल्या आहेत. 1990 साली कुवैतमधून, 2003 साली इराक, 2015मध्ये येमेनमधून अशी सुटका करण्यात आली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
1990 साली तत्कालीन परराष्ट्रमंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी आतापर्यंतची सर्वात मोठी सुटकेची मोहीम राबवून कुवेतमधील 1.70 लाखांहून अधिक भारतीयांची सुटका केली होती.
ही जगातली सर्वात मोठी एअरलिफ्ट मोहीम होती.
2015मध्ये येमेनमध्ये युद्ध सुरू झालं तेव्हा भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंह यांनी तेथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
आक्रमण करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल- वोलोदिमीर झेलेन्स्की
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला
युक्रेनियन लोक चोख प्रत्युत्तर देतील असं आपल्या भाषणात म्हटलं आहे. आक्रमण
करणाऱ्यांना आपलं प्रत्युत्तर कायम लक्षात राहिल असंही म्हटलंय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.
X पोस्ट समाप्त
ऑपरेशन गंगाद्वारे युक्रेनमधून त्याच्या शेजारील देशात पोहोचलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलंडमधून 437 भारतीय आणि एका बांगलादेशी व्यक्तीस भारतात पाठवले गेले. यावेळेस केंद्रीय मंत्री मेजर जनरल निवृत्त व्ही. के. सिंह उपस्थित होते.
ब्रेकिंग, स्विफ्ट बँकिंगमधून रशियाच्या 7 बँकांना वगळलं
फोटो स्रोत, Getty Images
रशियाच्या 7 बँकांना आपल्या जागतिक नेटवर्कमधून वगळल्याचं
स्विफ्ट बँकिंग प्रणालीनं स्पष्ट केलं आहे. ही कारवाई 12 मार्च रोजी पूर्ण होईल.
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर हा निर्णय घेण्यात आला
आहे. त्यामुळे या आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिका, युरोपिय महासंघ, ब्रिटन आणि
त्यांच्या अनेक सहकारी देशांनी रशियाच्या बँकांना स्विफ्टमधून बाहेर काढम्याचा
निर्णय घेतला होता.
जगभरात
हजारो वित्तसंस्था स्विफ्ट प्रमालीचा वापर करतात. रशियाही तेल आणि वायू
निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणावर या प्रणालीचा वापर करतो.
युक्रेनन आक्रमणानंतर रशियावर घातलेला हा मोठा निर्बंध
मानला जात आहे. रशियापूर्वी एकदा इराणला या प्रणालीतून बाहेर काढण्यात आलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
मराठी-युक्रेनी कुटुंब युद्धभूमीतून कसं बाहेर पडलं?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.
YouTube पोस्ट समाप्त
"मी माझ्या दोन्ही मुलांसोबत बाहेर खेळत होतो. तेवढ्यात मोठा स्फोट झाला," मूळचे वसईचे असलेले टोनी कर्वालो युक्रेनमधल्या युद्धाचा आपला अनुभव सांगतात.
आपली युक्रेनी पत्नी ओलेना आणि दोन मुलांसह टोनी ओदेसा शहरात राहात होते. पण रशियानं युक्रेनवर हल्ला केल्यावर त्यांना घर सोडावं लागलं.
मजल दरमजल करत हे कुटुंब रोमानियापर्यंत कसं पोहोचलं? त्यांना वाटेत काय दिसलं? टोनी आणि ओलेनानं आपले अनुभव बीबीसी मराठीला कथन केले आहेत.
वसईतले टोनी युक्रेनला कसे पोहोचले?
41 वर्षांचे टोनी पेशानं आयटी मॅनेजर आणि एक खलाशी आहेत. ते रॉयल कॅरिबियन कंपनीच्या जहाजांवर काम करतात.
जहाजावरच त्यांची ओळख युक्रेनच्या ओलेना इव्हानविना स्टेफाक यांच्याशी झाली. दोघांनी 2014 साली लग्न केलं. टोनी आणि ओलेना यांना दोन मुलंही आहेत.
युक्रेन-रशिया
युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ होत आहे. बुधवारी
अमेरिकन आणि युरोपीयन शेअर मार्केटांमध्ये तेजी नोंदवली गेली आणि तेलाच्या किंमती
110 डॉलरहून अधिक झाल्या.
याबरोबरच सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण नोंदवली गेली आहे.
अमेरिकेच्या सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हने या महिन्यात धोरणात्मक व्याज दरांमध्ये
वाढ करण्याची घोषणा केली आहे.
फेडरल
बँकेचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी या महिन्यात फेडरल रिझर्व व्याज दरात वाढ करायला
सुरुवात करेल.
नैसर्गिक वायूच्या किंमतीत गेल्या सात वर्षातील ही सर्वात
मोठी वाढ आहे. रशिया आणि सौदी अरेबिया हे देश जगातील सर्वात मोठे तेलउत्पादक देश
आहेत. निर्यातीवर त्यांचे नियंत्रण असते.
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाची रशियाविरोधात चौकशीला सुरुवात
आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या प्रमुख वकिलांनी
युक्रेन युद्धामधील संभावित युद्धगुन्ह्यांबद्दल रशियाविरोधात चौकशीची घोषणा केली
आहे.
करिम खान यांनी आपल्या लेखी घोषणेत म्हटलं, “युक्रेनमधील परिस्थितीची
सुरुवातीची तपासणी पाहिल्यावर आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयाच्या न्यायिक
क्षेत्रात येतील असे गुन्हे घडल्याचं मला दिसून आलं. अशा संभावित प्रकरणांची ओळख
आम्ही पटवली असून त्यांचा विचार यात केला जाईल.”
न्यायालयातून चौकशी सुरु होण्याची परवानगी हवी असल्याचं
त्यांनी सोमवारी सांगितलं बोतं. आतापर्यंत ब्रिटनसह 38 देशांनी चौकशीची मागणी केली
आहे. याचाच अर्थ आता लवकरच युक्रेन आक्रमणातील घटनांची चौकशी लवकरच सुरू होऊ शकते.
या युद्धाच्या पहिल्या पाच दिवसांमध्ये 227
सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार युक्रेनमधील 527
लोक जखमीही झाले आहेत.
पुतीन यांच्या राजवटीत त्यांचे काही 'खास दोस्त' श्रीमंत झाले कारण.....
रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा आज आठवा दिवस
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आज आठवा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ले वाढल्यानंतर लाखो लोक युक्रेन सोडून पलायन करत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या लाइव्ह पेजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तत्पूर्वी काय घडले हे आपण पाहू.
रशियाने युक्रेन केलेल्या हल्ल्याच्या कालच्या सातव्या दिवशी काय काय घडलं?
हा थोडक्यात आढावा :
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा युनायटेड नेशन्सने निषेध करत रशियाने सैन्य मागे घ्यावं अशी मागणी केली. याबाबतच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या आणीबाणीच्या सभेत मतदान करण्यात आलं. भारत या ठरावावरील मतदानाला अनुपस्थित होता. यामध्ये एकूण 193 सदस्यांपैकी 141 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं.
आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या संघर्षामध्ये युक्रेनमधील जवळपास 2000 पेक्षा अधिक सामान्य नागरिक मारले गेले असल्याचं युक्रेनमधील प्रशासनानं म्हटलं आहे.
युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत आतापर्यंत 498 रशियन सैनिक मारले गेले असून 1,597 जखमी झाल्याचं रशियन मीडियाने म्हटलंय.
खारकीव्हमधून तातडीने बाहेर पडा असे आदेश भारतीय दूतावासाने भारतीयांना दिलेत. वाहन मिळालं नाही तर पायी निघा, असं सांगण्यात आलंय.
पेसोचिन, बाबाई आणि बेझ्लेयुदिव्काकडे शक्य तितक्या लवकर जावं, युक्रेनी वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं भारतीय दूतावासाने म्हटलंय.
आतापर्यंत 17 हजार भारतीय नागरिक युक्रेनमधून बाहेर पडले असल्याचा अंदाज असल्याचं भारत सरकारने म्हटलंय.
तर गेल्या गुरुवारी (24 फेब्रुवारी) रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून आतापर्यंत सुमारे 9 लाख लोकांनी युक्रेन सोडल्याचं युनायटेड नेशन्सने म्हटलंय. यातले निम्म्यापेक्षा अधिक लोक पोलंडला गेले आहेत.
रशियानं युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ला अधिक तीव्र केला आहे. खारकीव्ह, मारिओपोल शहरांवर मोठे हल्ले करण्यात आले आहेत.
युक्रेनमधलं बंदर असणारं खर्सन शहर आपण ताब्यात घेतल्याचा दावा रशियाने केला आहे. पण युक्रेनने हा दावा फेटाळलाय.