अण्वस्त्रांचे नेमके काय परिणाम होतात?

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.
अमृता दुर्वे

रशियन राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्व भागात सैनिकी कारवाईची घोषणा करण्याच्या काहीच तास आधी अमेरिकेने रशिया व चीन यांच्यावर आरोप केला होता की, 'हे दोन देश मिळून अत्यंत अनुदार जागतिक व्यवस्था निर्माण करू पाहत आहेत.
युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धामुळे चीनला अनेक आघाड्यांवर एका मोठ्या आव्हानाला सामोरं जावं लागतं आहे.
चीनमध्ये नुकत्याच पार पडलेल्या 'हिवाळी ऑलम्पिक क्रीडास्पर्धां'साठी बीजिंगमध्ये उपस्थित राहिलेल्या मोजक्याच जागतिक नेत्यांमध्ये पुतीन यांचा समावेश होता. यावरून रशिया व चीन यांच्या घनिष्ठ राजनैतिक संबंधांची चुणूक मिळाली होती.
विशेष म्हणजे युक्रेनमधील दोन फुटीरतावादी प्रदेशांना मान्यता देण्यासाठी आणि तिथे रशियन लष्कर पाठवण्यासाठी पुतीन यांनी 'हिवाळी ऑलम्पिक' संपण्याची वाट पाहिली.
युक्रेनमधील तणाव कमी होण्यासाठी सर्व बाजूंनी प्रयत्न करावेत, असं आवाहन चिनी सरकारने या संदर्भात केलेल्या जाहीर निवेदनामध्ये केलं आहे.
सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा- युक्रेनमधील संकट हे चीनसमोरचं मोठं आव्हान


फोटो स्रोत, Getty Images
विमान निर्मितीत जगातल्या अव्वल कंपन्यांमध्ये समावेश होणाऱ्या बोइंगने रशियाशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आहे.
मंगळवारी बोइंगने यासंदर्भात घोषणा केली. मॉस्कोतील सर्व कामकाज थांबवण्यात येत आहे. अमेरिकास्थित बोइंग आता रशियाला तांत्रिक साहाय्य तसंच देखभालसंदर्भात कोणतीही मदत देणार नाही.
बोइंग कंपनीने सोमवारी युक्रेनची राजधानी कीव्हमधील कार्यालय बंद केलं आणि मॉस्कोतील पायलट ट्रेनिंग बंद करण्यात येत असल्याची घोषणा केली.
आमच्या सहकाऱ्यांची सुरक्षितता हे सर्वोच्च प्राधान्य आहे असं बोइंगच्या प्रवक्त्याने सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
सहा दिवसांपूर्वी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मुक्त जगाच्या संकल्पनेला धक्का दिला. आपण वाकवू तसं जग वाकेल असं त्यांना वाटलं. पण त्यांची ही मोहीम पूर्णत: फसली आहे असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे.
युक्रेनच्या नागरिकांच्या अतुलनीय धैर्याची त्यांनी जराही कल्पना नाही. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्स्की यांनी अतिशय सक्षमतेनं देशाचं नेतृत्व केलं आहे. त्यांनी जगासमोर अनोखं उदाहरण सादर केलं आहे. आपण सगळ्यांनी युक्रेनच्या ठामपणे युक्रेनच्या पाठीशी उभं राहायला हवं असं बायडन म्हणाले.
ते अमेरिकन काँग्रेसला उद्देशून केलेल्या 'स्टेट ऑफ द युनियन' भाषणात बोलत होते. दरवर्षी या खालच्या सभागृहाचं सत्र सुरू होण्याआधी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष देशातील परिस्थितीविषयी संसदेला माहिती देतात.
"हूकूमशहांना आपल्या आक्रमकतेची किंमत चुकवावी लागत नाही तेव्हा ते जास्त नुकसान करतात. रशियाने आखणी करूनच हल्ला केला आहे. पण स्वातंत्र्याचं महत्त्व उमगलेल्या देशांनी एकत्र येत ताकद दाखवून दिली आहे", असं बायडन यांनी पुढे सांगितलं.
"पुतिन चुकले आहेत. आम्ही तयार आहोत. रशिया ज्या पद्धतीने युक्रेनवर हल्ले करत आहे त्यासाठी पुतिनच सर्वस्वी जबाबदार आहेत. रशियाला याची जबर किंमत चुकवावी लागेल.
पुतिन यांच्या हिंसक राजवटीत त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशाची अमाप उधळपट्टी केली आहे. त्यांना याचं उत्तर द्यावं लागेल", असं बायडन म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
अमेरिकेने रशियाच्या कमर्शियल आणि खाजगी विमान वाहतुकीवर बंदी घातली आहे. युरोपियन युनियन आणि कॅनडाने याच स्वरुपाची बंदी घातली आहे.
या बंदीमुळे रशिया आणखी एकटं पडेल. रशियाचा शेअर बाजार 30 टक्क्यांनी घसरला आहे. अमेरिकेच्या नागरिकांनी युक्रेनच्या नागरिकांच्या निर्भय मानसिकतेतून प्रेरणा घ्यावी.
पुतिन त्यांच्या लष्कराच्या बळावर युक्रेनची राजधानी कीव्हला वेढा देऊ शकतात पण ते युक्रेनच्या लोकांचं मन जिंकू शकत नाहीत असं बायडन यांनी सांगितलं.
युरोपीय देश आणि कॅनडाने आपले हवाई क्षेत्र वापरू देण्याबद्दल रशियावर निर्बंध लादले आहेत. त्या पाठोपाठ आता अमेरिकादेखील रशियावर असे निर्बंध लादू शकतं अशी शक्यता मांडण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री, जो बायडन हे अमेरिकन संसदेला संबोधित करणार आहेत.
अमेरिका रशियावर पुढील 24 तासांसाठी हे निर्बंध लावू शकतं असा अंदाज आहे.


एकीकडे रशियाकडून रॉकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांस्त्रांनी हल्ले होत आहेत. त्याचवेळी युक्रेनचे नागरिक त्या हल्ल्याचा प्रतिकार करताना दिसत आहेत.
युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये महिला आणि पुरुषांना रशियाचा प्रतिकार कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना मोलोटोव्ह कॉकटेल्स, पेट्रोल बॉम्ब कसे फेकावेत याचे प्रशिक्षण दिले जात आहे.
युक्रेनवर रशियाने केलेल्या हल्ल्याचा आज सातवा दिवस आहे. युक्रेनवरील हल्ले वाढल्यानंतर लाखो लोक युक्रेन सोडून पलायन करत आहेत. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी घडत आहेत. त्याची इत्यंभूत माहिती आम्ही तुमच्यापर्यंत या लाइव्ह पेजच्या माध्यमातून पोहोचवत आहोत. तत्पूर्वी काय घडले हे आपण पाहू.
कालचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीच्या या पेजला भेट द्या.

फोटो स्रोत, Getty Images