संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. युक्रेन बाहेर पडेपर्यंत मराठी मुलांची उपासमार; केला गोळीबार, बर्फवृष्टीचा सामना

    युक्रेनमध्ये अडकलेले मराठी मुलं आता मायदेशी परतत आहेत. पण युक्रेनमधून बाहेर पडण्याआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

    जेवण, पाणी वेळेवर मिळालं नाही. रस्त्यावर बर्फवृष्टी होत असताना दिवसरात्र प्रवास करावा लागला.

    त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.

    YouTube पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

    YouTube पोस्ट समाप्त

  2. युक्रेन म्हणाले, 'रशियाने दिलेला कॉरिडोरचा प्रस्ताव अनैतिक'

    रशिया

    युक्रेनमघधील युद्धग्रस्त भागात असलेल्या लोकांना बाहेर जाता यावे यासाठी रशियाने मानवी कॉरिडोर उघडण्याचा प्रस्ताव युक्रेनला दिला आहे.

    हा प्रस्ताव युक्रेन स्वीकारण्याची शक्यता धुसर आहे. हा प्रस्ताव अनैतिक असल्याचे मत युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी दिले आहे.

    ते म्हणाले, रशियाचा प्रस्ताव अनैतिक आहे कारण या प्रस्तावात म्हटले आहे की जे युद्धग्रस्त भागात अडकले त्यांना रशिया किंवा बेलारूसला घेऊन जाता येईल. पुढे ते म्हणाले की ही दुर्दैवी गोष्ट आहे, लोकांच्या दुःखाचा वापर टीव्हीववर फोटो टाकण्यासाठी केला जात आहे.

    याआधी रशियाच्या सरकारी माध्यमांनी म्हटले होते की कीव्ह आणि खारकीव्ह येथून मानवी कॉरिडोर बनवण्यात येईल. पुढे त्यांनी हे देखील स्पष्ट केले होते की कीव्हचा कॉरिडोर बेलारूसला जाईल आणि खारकीव्हचा कॉरिडोर रशियाला जाईल.

  3. रशिया व अमेरिका यांच्याबाबतीत भारताला तारेवरची कसरत का करावी लागतेय?

  4. 'सुपरमार्केटमधून सामान आणतो म्हणाला, त्यानंतर नवीनचा फोन आला नाही'

    युक्रेनमध्ये रॉकेट हल्ल्यात नवीन या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. त्याचे कुटुंबीय या धक्क्यातून सावरत आहेत. ज्या दिवशी ही घटना घडली त्याआधी शेखरप्पा यांना नवीनचा फोन आला होता.

    तो त्याची आई आणि भावाशी बोलला होता. सुपरमार्केटमधून सामान आणतो म्हणाला. त्यानंतर नवीनचा फोन आला नाही. त्यानंतर थेट भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून फोन आला आणि त्यांना दुर्दैवी बातमी कळली.

    व्हीडिओ कॅप्शन, 'सुपरमार्केटमधून सामान आणतो म्हणाला, त्यानंतर नवीनचा फोन आला नाही.'
  5. युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर आता 'हे' पर्याय

  6. रशिया-युक्रेन युद्धाच्या वार्तांकनावर कार्टूनच्या माध्यमातून तिरकस भाष्य

    कार्टून
  7. युक्रेनमध्ये मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं काय होणार?

    विद्यार्थिनी

    फोटो स्रोत, Getty Images

    रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा नकारात्मक परिणाम जगातील बऱ्याच घटकांवर झाला आहे. युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर ही याचा परिणाम झाला आहे.

    खास करून युक्रेनच्या वैद्यकीय विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रम पूर्ण कसा करायचा? या प्रश्नाची टांगती तलवार आहे.

    18 हजार विद्यार्थी युद्धामुळे युक्रेन सोडून भारतात परतलेत. कोणाचं दुसरं वर्ष सुरू होत तर कोणी चौथ्या वर्षांत शिकत होतं.

    आता फक्त प्रश्न उरतो तो राहिलेलं शिक्षण पूर्ण कसं करायचं? त्यांना भारतात शिक्षण पूर्ण करायची संधी मिळेल का? की या विद्यार्थ्यांनी युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती निवळेपर्यंत वाट बघावी?

    या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी या बातमीवर क्लिक करा.

  8. रशियन फौजांनी युक्रेनमध्ये कोणत्या भागांवर ताबा मिळवला आहे?

    युक्रेन नकाशा
  9. 'बॉम्ब हल्ल्याचा आवाज नाही, असा एक मिनिटही जात नाहीये'

    शरणार्थी

    फोटो स्रोत, Getty Images

    युक्रेनच्या रशियावरील हल्ल्याचा आज बारावा दिवस आहे. युक्रेनची राजधानी कीव्ह शहराच्या विविध बाजूंनी जोरदार बॉम्बहल्ले होत आहेत.

    कीव्हवर पूर्णपणे ताबा मिळवण्याचा रशियाचा प्रयत्न आहे. बूचा, होस्तोमेल, इरपिन या शहरांमध्ये युक्रेन आणि रशियाच्या फौजांमध्ये सातत्याने संघर्ष सुरू आहे.

    स्थानिकांच्या मते एकही मिनिट असं जात नाही की हल्ल्याचा आवाज आसमंतात घुमत नाही. इरपिन शहरातून बाहेर पडत असताना एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला. हे कुटुंब ज्या पुलावरून जात होतं त्यावरच रशियाचं मोर्टार जाऊन आदळलं.

    रशिया आता सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहे असं युक्रेनच्या उपपंतप्रधानांनी सांगितलं. रशिया रुग्णालयं आणि शाळांवरही हल्ले करत आहे असं युक्रेनचं म्हणणं आहे.

    युक्रेनच्या लष्कराने कडवा प्रतिकार केल्याने रशियाने नागरिकांविरुद्ध अनेक मोहीमा हाती घेतल्या आहेत असं उपपंतप्रधान ओल्हा स्टेफनीशिना यांनी सांगितलं.

  10. युरोपावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं सर्वात मोठं शरणार्थी संकट - संयुक्त राष्ट्र

  11. ते रशियन दिसतात, ऊर्दू बोलतात आणि बॉलिवूड त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे

  12. युक्रेनसाठी आंदोलन करणाऱ्या रशियन आजीला पोलिसांनी पकडलं तेव्हा काय घडलं?

  13. युक्रेनमधल्या अंडरग्राउंड बंकरमधून भारतीय विद्यार्थिनीनं सांगितले तिचे हाल

    कॅनडामधील सीबीसी वृत्तवाहिनीच्या पत्रकार नताशा फतेह यांनी युक्रेनमध्ये अंडरग्राऊंड बंकरमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांशी बातचित केली. हे विद्यार्थी वाईट स्थितीत असून, त्यांच्या अडचणी सांगत होते.त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की, "अन्न-पाण्याविना हे विद्यार्थी अंडरग्राऊंड बंकरमध्ये लपलेले आहेत. जीव वाचवण्यासाठी काय करावं, हेच समजत नाही."

    महताब रजा या विद्यार्थ्यांपैकी एक आहे. रजाने सीबीसीच्या नताशा यांच्याशी बोलताना सांगितलं की, "मॅम, आम्ही खूप वाईट अवस्थेत आहोत. दहा दिवसांपासून आम्ही सर्वजण अंडरग्राऊंड बंकरमध्ये लपलो आहे. दिवसागणिक स्थिती बिकट होत जातेय. आम्ही हतबल आहोत. काहीच करण्याच्या स्थितीत नाही आहोत. कसंतरी करून भारतात परत जायचं, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आम्हाला माहीत नाही की, परत कधी जाऊ. युक्रेन आणि भारत सरकारकडून आम्हाला एखादी माहिती मिळेल आणि वाट पाहत आहोत."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    नताशा म्हणाल्या की, असं वाटतंय तुम्ही एखाद्या गुहेत आहात. तुम्ही नक्की कुठे आहात? यावर महताब रजाने सांगितलं की, "आम्ही युक्रेनच्या सुमी शहरात आहोत. इथं 800 ते 900 भारतीय विद्यार्थी अडकलो आहोत. आम्ही सीमेपर्यंतही जाऊ शकत नाही, कारण तिथवर जाण्यासाठी रस्ता नाहीय. रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त करण्यात आलंय. कुणीही टॅक्सी ड्रायव्हर तयार नाहीय. बस नाहीत. खारकीव्हमध्ये एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागलीय. इथं ना वीज आहे, ना पाणी. दोन दिवसांपूर्वीच इथं मोठा स्फोट झाला होता आणि तेव्हापासून पाणी संकट सुरू झालं. पाणी नसल्यानं ब्रशही करू शकत नाही आणि शौचालयातही जाऊ शकत नाहीय."

    "आम्ही अधून-मधून रशियात जातो आणि तिथून कसंतरी आमच्या कुटुंबीयांशी बोलतो. आम्ही कुटुंबीयांना सुद्धा खरं सांगू शकत नाही, कारण ते काळजी करतील. आम्ही ज्या वेदना सहन करतोय, त्यांचा विचारही करू शकत नाही. हे मानवतेसाठी योग्य नाही. आम्हाला लढायचं नाहीय. आम्हाला शांतता हवीय. युद्ध थांबावं, असं आम्हा भारतीयांना वाटतं," हे सांगत असताना महताब रडू लागला.

    भारत सरकारनं रशिया आणि युक्रेनच्या सरकारनं शुक्रवारी सुमीमध्ये युद्धविरामासाठी आग्रह केला होता, जेणेकरून भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढलं जाऊ शकतं. 24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला सुरू केला होता, तेव्हा सुमी शहरात 800 विद्यार्थी तिथं फसले होते.

  14. युक्रेनमधील रशियन लष्कराचा वेग मंदावला

  15. झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा

  16. रशिया युक्रेन संघर्ष : युद्धात मी माझ्या बायकोला गमावलंय, आता काय करू?

  17. मराठी मुलंमुली युक्रेनमध्ये काय शिक्षण घ्यायला जातात?

  18. रशिया-युक्रेन युद्ध कसं संपू शकतं? 'या' 5 शक्यता जाणून घ्या

  19. उद्ध्वस्त घरं, राख, मातीचा ढीग; युक्रेनचं विदारक चित्र दाखवणारे 7 फोटो

  20. युक्रेन रशिया वादामुळे भारतात इंधन दराचा भडका उडणार?