संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.

लाईव्ह कव्हरेज

अमृता दुर्वे

  1. ब्रेकिंग, संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या निषेधाचा ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित

    संयुक्त राष्ट्र मतदान

    फोटो स्रोत, Getty Images

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा युनायटेड नेशन्सने निषेध करत रशियाने सैन्य मागे घ्यावं अशी मागणी केलीय.

    याबाबतच्या ठरावावर संयुक्त राष्ट्रांच्या आणीबाणीच्या सभेत मतदान करण्यात आलं.

    यामध्ये एकूण 193 सदस्यांपैकी 141 सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केलं. 5 सदस्यांनी ठरावाच्या विरोधात मतदान केलं, तर 35 सदस्यांनी मतदान केलं नाही.

    भारत या ठरावावरील मतदानाला अनुपस्थित होता. यापूर्वीही रशियाच्या विरोधातल्या प्रस्तावावरच्या मतदानावेळी भारत अनुपस्थित होता.

    युक्रेनच्या अस्तित्त्वाचा अधिकार रशियाने हिरावून घेऊ नये, असं आवाहन या मतदानाच्या आधी युक्रेनचे राजदूत सर्गेई काईस्लित्सिया यांनी केलं होतं.

    तर रशियाला पूर्व युक्रेनमधला फुटीरतावादी संघर्ष संपवायचा असल्याचं रशियाचे राजदूत वासिली नेबेंझिया यांनी म्हटलं.

    1997 नंतर पहिल्यांदाच संयुक्त राष्ट्रांची अशी आणीबाणीची बैठक झाली.

  2. ब्रेकिंग, आतापर्यंत 498 रशियन सैनिक मारले गेले, रशिया प्रथमच सांगितली आकडेवारी

    युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यात आतापर्यंत किती रशियन सैनिक मारले गेले याची माहिती पहिल्यांदाच रशियाच्या संरक्षण खात्याने दिली आहे.

    आतापर्यंत 498 रशियन सैनिक मारले गेले असून 1,597 जखमी झाल्याचं रशियन मीडियाने म्हटलंय.

    रशियाचे किती सैनिक मारले गेले याबद्दल युक्रेनने केलेल्या दाव्यांपेक्षा ही आकडेवारी बरीच कमी आहे.

    आतापर्यंत 2,870 युक्रेनियन सैनिक मारले गेले आणि सुमारे 3,700 जखमी झाल्याचा दावा रशियाने केलाय. युक्रेनने याबद्दलची आकडेवारी दिलेली नाही.

    रशिया किंवा युक्रेन दोन्ही देशांनी केलेल्या दाव्यांची बीबीसीने स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाही. पण रशियाचं या हल्ल्यात मोठं नुकसान झालं असावं, असा युकेच्या संरक्षण खात्याचा अंदाज आहे.

    आतापर्यंत 2,000 सामान्य नागरिक आणि 10 आपत्कालीन सेवा कर्मचारी मारले गेल्याचं युक्रेनने म्हटलं आहे.

  3. आतापर्यंत 9 लाख लोकांनी सोडला युक्रेन, संयुक्त राष्ट्रसंघांची माहिती

    24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर हल्ला केला. तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 9,00,000 (9 लाख) लोकांनी युक्रेन देश सोडला असल्याचं युनायटेड नेशन्सच्या रेफ्युजी एजन्सीने म्हटलं आहे.

    यापैकी निम्म्यापेक्षा अधिक लोक शेजारच्या पोलंडमध्ये गेले आहेत.

    त्यासोबत हंगेरी, रोमेनिया, मॉल्डोवा, स्लोवाकिया या देशांमध्येही युक्रेनमधले निर्वासित आसरा घेत आहेत.

    युक्रेनचा नकाशा
  4. पुतिन यांच्यासोबतची थेट चर्चा हाच युद्ध थांबवण्याचा एकमेव उपाय - झेलेन्स्की

  5. आतापर्यंत 17 हजार भारतीयांनी युक्रेन सोडला - भारत सरकारची माहिती

    28 फेब्रुवारीला भारतात परतलेले विद्यार्थी

    फोटो स्रोत, ANI

    फोटो कॅप्शन, 28 फेब्रुवारीला भारतात परतलेले विद्यार्थी

    पूर्व युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात परत आणण्यासाठी भारत सरकार मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं, भारत सरकारनं म्हटलं आहे.

    "तिथपर्यंत कसं पोहोचायचं हे भारतीय पथक पाहत आहे. यावेळी हे काम सोपं नाही. कारण मार्ग हे कायम खुले नसतात," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी बुधवारी माहिती देताना सांगितलं.

    सरकारच्या अंदाजानुसार जानेवारीच्या अखेरच्या आठवड्यात देण्यात आलेल्या सूचनांनंतर आतापर्यंत 17 हजार भारतीय नागरिक युक्रेनमधून बाहेर पडले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    "भारतीय नागरिकांना सीमा पार करता यावी यासाठी कीव्हमध्ये भारतीय दूतावासाला एक तात्पुरतं कार्यालय सुरू करण्यास सांगण्यात आलं आहे. भारतीय दूतावासाचं एक पथक त्यासाठी त्याठिकाणी उपस्थित आहे," असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.

    "ज्या लोकांचे भारतीय पासपोर्ट हरवले आहेत, त्यांना इमर्जन्सी सर्टिफिकेट देण्यासाठी एक सिस्टीम तयार करण्यात आली आहे. त्यामुळं अनेक भारतीय विद्यार्थ्यांची मदत होईल," असं बागची म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी रात्री रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी बोलणार आहेत का? असं बागची यांना विचारण्यात आलं. त्यावर 'मोदी अनेक देशाच्या नेत्यांशी बोलत आहेत' असं ते म्हणाले.

    'ते एखाद्या नेत्याशी बोलतील तेव्हा आम्ही सांगू आधीच तसं सांगता येणार नाही', असंही ते म्हणाले.

    दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन बुधवारी एक आणखी विमान दिल्लीला पोहोचलं. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी देशात पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचं विमानतळावर स्वागत केलं.

  6. रशियाला आमचा इतिहास पुसून टाकायचाय - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

    वोलोदिमिर झेलेन्स्की

    फोटो स्रोत, Getty Images

    रशियाला आमचा इतिहास पुसून टाकायचाय आणि आम्हा सर्वांना संपुष्टात आणायचंय, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

    युक्रेनची राजधानी कीव्हमधल्या एका हॉलोकॉस्ट मेमोरियलवर रशियाने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा त्यांनी निषेध केलाय.

    दुसऱ्या महायुद्धादरम्यान कीव्हमध्ये मारल्या गेलेल्या 33 हजारांपेक्षा अधिक ज्यूंच्या स्मरणार्थ बेबीन यार मेमोरियल तयार करण्यात आलं होतं. या सगळ्या ज्यूंची हत्या नाझी सैनिकांनी केली होती.

    झेलेन्स्की म्हणाले, "रशियातल्या अनेकांसाठी कीव्ह पूर्णपणे अनोळखी असल्याचं या क्षेपणास्त्रं हल्ल्यावरून दिसतं. त्यांना आमच्या राजधानीबद्दल, आमच्या इतिहासाबद्दल काहीही माहिती नाही. आमचा इतिहास पुसून टाकण्याचे, आमचा देश आणि आम्हाला संपवण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी बुधवारी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याशीही चर्चा केली. सुरक्षेसाठी मदत दिल्याबद्दल त्यांनी जॉन्सन यांचे आभार मानले. पुतिन यांच्यावरचा दबाव वाढवण्यासाठी आणखी निर्बंध गरजेचे आहेत, यावर या दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.

    आपण रशियाच्या हल्ल्यांचा निषेध करत असून युक्रेनच्या लोकांसाठी प्रार्थना करत असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय.

  7. रशियाकडे किती अण्वस्त्र आहेत?। सोपी गोष्ट 545

  8. रशियाने आतापर्यंत आमच्या 2,000 नागरिकांना मारलं - युक्रेनचा दावा

    युक्रेनी सैनिक

    फोटो स्रोत, Getty Images

    रशियाच्या हल्लयामध्ये आतापर्यंत आपले 2,000 पेक्षा जास्त नागरिक मारले गेल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलाय.

    या हल्ल्यांमध्ये बचाव पथकांतल्या 10 जणांचाही मृत्यू झाल्याचं युक्रेनच्या आपत्कालिन सेवांनी म्हटलंय. रशियाने केलेल्या हल्ल्यांमुळे अनेक ठिकाणी आग लागलीय. अशा 400 आगी यंत्रणांनी काबूमध्ये आणल्या आहेत. 416 बॉम्बही निकामी करण्यात आल्याचा दावा युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी केलाय.

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आजचा सातवा दिवस आहे. या सात दिवसांत रशियन सैन्याने शेकडो परिवहन केंद्र, निवासी इमारती, हॉस्पिटल्स आणि लहान मुलांच्या शाळा उद्ध्वस्त केल्याचं युक्रेनने म्हटलंय.

    रशियाने बुधवारी खारकीव्ह शहरातल्या सिटी काऊन्सिलच्या इमारतीवर क्षेपणास्त्र डागलं. खारकीव्ह रशियाच्या सीमेपासून फक्त 30 मैलांवर आहे. गेले दोन दिवस रशिया खारकीव्हवर जोरदार हल्ले करतंय.

  9. युक्रेनी राष्ट्राध्यक्षांच्या 'या' भाषणानंतर टाळ्यांच्या कडकडाट मिळाला पाठिंबा

  10. भारत सरकारनं युक्रेनमधून भारतीयांना आणि विशेष करून विद्यार्थ्यांना आणायला उशीर केलाय का?

  11. रशिया युक्रेन युद्ध : सातव्या दिवशी आतापर्यंत काय घडलंय?

    रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याचा आज सातवा दिवस. या हल्ल्याचे सगळे लाईव्ह अपडेट्स, फोटो, बातम्या, व्हिडिओ आणि विश्लेषण या लाईव्ह पेजवर मिळेल.

    रशियाने युक्रेन केलेल्या हल्ल्याच्या आजच्या सातव्या दिवशी आतापर्यंत काय काय घडलं?

    हा थोडक्यात आढावा :

    • आठवडाभरापूर्वी सुरू झालेल्या संघर्षामध्ये युक्रेनमधील जवळपास 2000 पेक्षा अधिक सामान्य नागरिक मारले गेले असल्याचं युक्रेनमधील प्रशासनानं म्हटलं आहे.
    • रशियानं युक्रेनमधील महत्त्वाच्या शहरांवर हल्ला अधिक तीव्र केला आहे. रशियानं खारकीव्हवर मोठा हल्ला केला आहे. येथील सरकारी कार्यालयांवर रशियानं क्रूझ मिसाईलनं हल्ले केले आहेत.
    • खारकीव्हमधून तातडीने बाहेर पडा असे आदेश भारतीय दूतावासाने भारतीयांना दिलेत. वाहन मिळालं नाही तर पायी निघा, असं सांगण्यात आलंय.
    • पेसोचिन, बाबाई आणि बेझ्लेयुदिव्काकडे शक्य तितक्या लवकर जावं, युक्रेनी वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं भारतीय दूतावासाने म्हटलंय.
    • दक्षिण युक्रेनमधील बंदरावरचं शहर असलेल्या खर्सनवरही ताबा मिळवल्याचा दावा रशियानं केला आहे. तर स्थानिक अधिकारी मात्र हे शहर अजूनही युक्रेनच्या ताब्यात असल्याचा दावा करत आहेत.
    • युक्रेननं आतापर्यंत रशियाचे 5840 सैनिक मारल्याचा दावा केला आहे. हल्ल्याला सुरुवात झाल्यापासून रशियाचं मोठं नुकसान झाल्याचं युक्रेनच्या लष्करानं म्हटलं आहे.
  12. रशिया युक्रेन युद्ध: रोमानिया सीमेवर अडकले भारतीय विद्यार्थी

    व्हीडिओ कॅप्शन, रशिया युक्रेन युद्ध: रोमानिया सीमेवर भारतीय विद्यार्थी असे अडकलेत...
  13. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर कसं पडता येईल?

  14. युक्रेनमध्ये आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती

    युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. चंदन जिंदाल नावाचा हा विद्यार्थी मूळचा पंजाबातल्या बर्नालाचा आहे. 2018 साली वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी तो युक्रेनला गेला होता.

    22 वर्षांचा चंदन युक्रेनच्या विनित्सिया शहरातल्या मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होता.

    मेंदूमध्ये रक्ताची गुठळी झाल्याने त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तो बेशुद्ध होता. युक्रेनमधल्या हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    यापूर्वी काल कर्नाटकमधल्या नवीन नावाच्या विद्यार्थ्याचा युक्रेनमध्ये मृत्यू झाला होता. अन्नपदार्थ आणण्यासाठी सुपरमार्केटला गेला असताना शेलिंगमध्ये नवीनचा मृत्यू झाला.

  15. रशियासोबतच्या चर्चेनंतरच खारकीव्हमधल्या नागरिकांना सूचना - भारतीय परराष्ट्र मंत्रालय

    युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने खारकीव्हमधल्या भारतीयांना तात्काळ शहर सोडण्याचे आदेश दिले आहेत.

    रशियाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच दूतावासाने या सूचना दिल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलंय.

    आतापर्यंत सुमारे 17 हजार भारतीय नागरिकांनी युक्रेन सोडला असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  16. ब्रेकिंग, खारकीव्हमध्ये रशियाचा मोठा हल्ला, सिटी काऊन्सिलची इमारत लक्ष्य

    खारकीव्ह हल्ला

    फोटो स्रोत, Getty Images

    रशिया युक्रेनमधील खार्किव्ह या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या शहरावर सातत्यानं हल्ले करत आहे. याठिकाणच्या अनेक सरकारी इमारतींना रशियानं लक्ष्य केलं आहे. आता खार्किव्ह येथील नगर परिषदेच्या इमारतीवर रशियानं क्रूझ मिसाईलनं हल्ला केला आहे.

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

    खारकीव्हच्या डेप्युटी गव्हर्नरनं ही माहिती दिली आहे. खारकीव्ह रशियाच्या सीमेपासून अवघ्या 30 मैल अंतरावर आहे.

    गेल्या दोन दिवसांपासून रशियाचं लष्कर या शहरावर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले करत आहे. येथील रस्त्यांवर रशिया आणि युक्रेनच्या लष्करात आमने-सामने संघर्ष झाल्याचंही वृत्त आहे.

    काल रात्री याठिकाणी पॅराट्रूपर्स म्हणे विमानातून सैन्य उतरवण्यात आलं, त्यानंतर संघर्ष अधिक तीव्र झाला.

    मंगळवारी सरकारी मुख्यालयावरही एक क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. त्याच्या आसपास आग लागली होती. त्यामुळं इमारत आणि त्याच्या आसपास असलेल्या कारचं मोठं नुकसान झालं.

    रशिया नागरी वस्त्यांवर हल्ला करून युद्धातील गुन्हे करत असल्याचं, युक्रेनच्या राष्ट्रपतींनी या प्रकारानंतर म्हटलं होतं.

  17. ब्रेकिंग, वाहन मिळालं नाही तर पायी निघा, खारकीव्हमधल्या भारतीयांसाठी नवीन ॲडव्हायजरी

    युक्रेनमधल्या खारकीव्ह शहरात असणाऱ्या भारतीयांसाठी एक नवीन ॲडव्हायजरी जाहीर करण्यात आली आहे. वाहन मिळालं नाही तर पायी शहरातून बाहेर पडा, असं सांगण्यात आलंय.

    युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने म्हटलंय. "बिघडत चाललेली परिस्थिती लक्षात घेत लोकांनी त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ, पुन्हा सांगतो तात्काळ खारकीव्ह सोडावं. त्यांनी पेसोचिन, बाबाई आणि बेझ्लेयुदिव्काकडे शक्य तितक्या लवकर जावं.

    "ज्या विद्यार्थ्यांना वाहनं किंवा बस किंवा रेल्वे मिळत नसेल त्यांनी पायी पेसोचिन (11 किमी), बाबाई (12 किमी) आणि बेझ्लेयुदिव्का (16 किमी) जावं.

    "लगेच निघा. कोणत्याही परिस्थितीत भारतीयांनी या ठिकाणी आज युक्रेनी वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे."

    X पोस्टवरून पुढे जा
    परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

    या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

    सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

    X पोस्ट समाप्त

  18. वोलोदिमीर झेलेन्स्की : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष ज्यांनी राजकारणासाठी कॉमेडी करणं सोडलं

  19. रशियाने खेरसन ताब्यात घेतल्यास युक्रेनच्या पुरवठा साखळीवर येईल ताण

    युक्रेनच्या रस्त्यावरचा रशियन लष्कराचा ट्रक

    फोटो स्रोत, Reuters

    फोटो कॅप्शन, युक्रेनच्या रस्त्यावरचा रशियन लष्कराचा ट्रक

    युक्रेनमध्ये शिरत असतानाचे रशियाच्या एका लष्करी वाहनाचे अज्ञात ठिकाणाचे फोटो समोर आले आहेत.

    रशियाच्या सैनिकांनी काळ्या समुद्रातील बंदरावरील खेरसन शहरावर ताबा मिळवला असल्याचा दावा रशियानं केला आहे. विभागीय गव्हर्नर आणि शहराचे महापौर यांनी आजुबाजूला लष्कराचा घेराव असल्याचं म्हटलं आहे. मात्र खेरसनवर रशियानं ताबा मिळवल्याचं वृत्त त्यांनी नाकारलं आहे.

    शहरावर ताबा मिळवणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार असल्याचं रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूटचे लष्करी तज्ज्ञ डॉ. जॅक वॉल्टिंग यांनी म्हटलं. त्याचं कारण म्हणजे युक्रेनची विभागणी करणाऱ्या नीपर नदीवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी हे शहर आहे.

    "रशियाच्या लष्करानं नीपर नदीवरील महत्त्वाच्या शहरांवर ताबा मिळवायला रशियानं सुरुवात केली आहे. त्यामुळं त्यांना दॉनबसच्या आसपासच्या परिसरात लढत असलेल्या युक्रेनच्या सैन्यासाठी पश्चिमेकडून पूर्वेकडे होणारा रसद पुरवठा रोखण्यात यश मिळणार आहे," असं वॉल्टींग म्हणाले.

    रशिया लवकरच युक्रेनला मिळणारी रसद - पुरवठा बंद करेल असंही ते म्हणाले.

  20. युक्रेनबाबत अंदाज बांधण्यात व्लादिमीर पुतिन यांची चूक झाली का?