संयुक्त राष्ट्रांच्या सभेत रशियाच्या विरुद्ध ठराव मंजूर, भारत मतदानाला अनुपस्थित
रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध संघर्ष सुरू आहे. ताज्या अपडेट्साठी हे पेज फॉलो करत राहा.
लाईव्ह कव्हरेज
अमृता दुर्वे
रशियाची गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी, कच्च तेल 300 डॉलरवर जाण्याची भीती
नरेंद्र मोदींमुळे रशियाने 6 तास युद्ध थांबवलं, हा महाराष्ट्र भाजपचा दावा किती खरा?
चीन आणि रशियामध्ये किती व्यापार होतो?
युरोपचा गॅस पुरवठा रोखण्याची रशियाची धमकी

फोटो स्रोत, Getty Images
पाश्चिमात्य देशांनी रशियन तेलावर बंदी घातल्यास जर्मनीला रशियातून जाणारी गॅस पाईपलाईन बंद करण्याचा इशारा दिलाय.
रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झंर नोव्हाक यांनी म्हटलं की, हे पाऊल जागतिक पुरवठ्यासाठी विनाशकारी परिणामांचं ठरू शकतं आणि जगातील तेलाच्या किंमती दुप्पट होत बॅरलमागे 300 डॉलरपर्यंत पोहोचू शकतात.
युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियाला शिक्षा करण्याचा मार्ग म्हणून अमेरिका सहकारी राष्ट्रांसह संभाव्य बंदी शोधत आहे. मात्र जर्मनी आणि नेदरलँड्सने अमेरिकेची ही योजना नाकारली.
युरोपियन कमिशनला 40 टक्के गॅस आणि 30 टक्के तेल रशियातून येतो. जर यात अडथळा आल्यास, त्याला कुठलाच पर्याय नाहीय.
युक्रेनमधून लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशियाची पुन्हा तयारी
सोमवारी संघर्षविरामाच्या घोषणेनंतरही रशियाकडून हल्ले होत राहिल्यानं भारतीय विद्यार्थ्यांसह इतर नागरिकांना सुरक्षित बाहेर निघण्यासाठी अडचणींना सामोरं जावं लागलं.
भारतातील रशियाच्या दूतावासानं यावर आज बाजू मांडत म्हटलं की, 8 मार्चला स्थानिक वेळेनुसार 10 वाजल्यापासून संघर्षविरामाची घोषणा केली आहे. सुमीहून पोल्ताव्हा आणि बेल्गोरोड जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती.
त्यानंतर विमान, रेल्वे आणि रस्तेमार्गे सर्वसामान्य लोकांना आपापल्या ठिकाणी पोहोचण्यासाठीही नियोजन करण्यात आलं होतं.
रशियानं ही माहिती संबंधित देश, संयुक्त राष्ट्र आणि दूतावासांपर्यंत पोहोचवली होती.
X पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
हे युक्रेननंही करणं अपेक्षित होतं. मात्र, लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यास युक्रेन अयशस्वी ठरला आणि त्यामुळे कीव्ह, सुमी, चेर्निगव्ह, खारकीव्ह आणि मारियुपोलसह संपूर्ण युक्रेनमध्ये स्थिती बिघडत चालली आहे. अमानवीय संकटात रुपांतर होतंय.
रशियाने म्हटलंय की, आम्ही पुन्हा एकदा लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रस्ते तयार करत आहोत. मात्र, युक्रेनच्या पुढाकारावरही हे यशस्वी होणं बेतलेलं आहे
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
युक्रेन मागणी करत असलेला 'नो फ्लाय झोन' म्हणजे नेमकं काय?
महिला दिन....

फोटो स्रोत, Getty Images
फोटो कॅप्शन, युक्रेनमधील झोपोरिजझियामधलं छायाचित्र. आई आणि तिची दोन लेकरं युक्रेनबाहेर सुरक्षितरित्या बाहेर जाण्यासाठी ट्रेनची वाट पाहत आहेत. आईच्या चेहऱ्यावरची भीती आणि डोळ्यातील अश्रू कुणाही संवेदनशील माणसाचं काळीज कापणारं आहे. दोन्ही लेकरांना कवेत घेऊन आधार देऊ पाहतेय ही माय.... 'मी माझ्या बिबट्या-जग्वारबरोबरच येईन नाही तर नाही', युद्धात अडकलेल्या गिरीकुमार पाटलांचा निर्धार
VIDEO : युक्रेनबाहेर पडेपर्यंत मराठी मुलांची उपासमार
युक्रेनमध्ये अडकलेले मराठी मुलं आता मायदेशी परतत आहेत. पण युक्रेनमधून बाहेर पडण्याआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. जेवण, पाणी वेळेवर मिळालं नाही. रस्त्यावर बर्फवृष्टी होत असताना दिवसरात्र प्रवास करावा लागला.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
'युक्रेनमधून 20 हजार भारतीयांना सुरक्षित बाहेर काढलं'

फोटो स्रोत, ANI
फोटो कॅप्शन, टीएस तिरुमूर्ती संयुक्त राष्ट्रातील भाराताचे राजदूत टीएस तिरुमूर्तींनी सुरक्षा परिषदेत सांगितलं की, भारतानं युक्रेनमधून आतापर्यंत 20 हजार भारतीयांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश मिळवलंय.
याचसोबत, भारतानं युद्धग्रस्त देशातून निर्दोष लोकांना आणि भारतीय नागरिकांना सुरक्षित रस्ता देण्याची मागणीही केलीय.
"भारतानं रशिया आणि युक्रेनला सुमीमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सुरक्षित कॉरिडोअर बनवण्यासाठी अनेकदा विनंती केली. मात्र, तरीही अद्याप कॉरिडोअर बनवण्यात आलं नाही. त्यामुळे काळजी वाटते," असंही तिरुमूर्ती म्हणाले.

फोटो स्रोत, Reuters
मानवीय कारवाई तटस्थता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्य या सिद्धांतांच्या दिशेनं असायला हवी, असंही ते म्हणाले.
"आम्ही त्या देशांच्या नागरिकांचीही मदत केली, ज्यांनी आमच्याकडे मदत मागितली. येत्या दिवसात लोकांना बाहेर काढणं आम्ही सुरूच ठेवू. 80 हून अधिक विमानं लोकांना घरात पोहोचवण्यासाठी युक्रेननजिकच्या देशांमधून आतापर्यंत उडाली आहेत," असं तिरुमूर्तींनी सांगितलं.
पुतिन यांच्या आक्रमकतेचा बिमोड करण्यासाठी चीनची भूमिका महत्त्वाची ठरु शकते, कारण...
मी कुणालाही घाबरत नाही, युद्ध जिंकेपर्यंत इथेच राहीन - झेलेन्स्की

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्कींनी सोशल मीडियावर नवीन व्हीडिओ पोस्ट केला आहे. या व्हीडिओत ते कीव्हमधील त्यांच्या कार्यालयात बसलेले दिसतायेत.
झेलेन्स्की व्हीडिओत म्हणाले आहेत की, "लपत नाहीय. आणि मी कुणालाही घाबरत नाहीय. जोपर्यंत युद्ध जिंकत नाही, तोपर्यंत मी इथेच राहणार आहे."
झेलेन्स्कींनी या व्हीडिओत ऑफिसमधून कीव्हचे दृश्यंही दाखवले. सोमवारी सकाळी हा व्हीडिओ बनवल्याचे आणि कीव्हमधूनच व्हीडिओ बनवल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांनी आजूबाजूचे दृश्यंही दाखवले.
आज युद्धाचा 13 वा दिवस

फोटो स्रोत, Getty Images
नमस्कार,
बीबीसी मराठीच्या लाईव्ह पेजच्या माध्यमातून आपण गेले 12 दिवस रशिया-युक्रेन युद्धाच्या बातम्या पाहात आहोत.
आज या युद्धाचा 13 वा दिवस आहे. या युद्धासंदर्भात जगभरात सुरू असलेल्या घडामोडींचा आढावा बीबीसी मराठीच्या वाचकांसाठी नामदेव काटकर आणि ओंकार करंबेळकर येथे देत आहेत.
आतापर्यंत काय काय घडलं?
- 2008 नंतर तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार जागतिक बाजारात इराणचं तेल उपलब्ध व्हायला झालेला उशीर आणि अमेरिका तसंच युरोपियन युनियनकडून रशियाकडून मिळणाऱ्या तेलावर बंदीमुळे खनिज तेलाच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. आज मोदी यांनी पुतिन यांच्याशी 50 मिनिटे संवाद साधला. याआधी मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी देखील चर्चा केली होती.
- युक्रेनमधील सुमीममध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी सहकार्यकरा, अशीमागणी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींशी फोनवरून चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 35 मिनिटं चर्चाझाली.
- युक्रेनमधील युद्धग्रस्त भागात असलेल्या लोकांनाबाहेर जाता यावे यासाठी रशियाने मानवी कॉरिडोर उघडण्याचा प्रस्ताव युक्रेनला दिला आहे.
- युक्रेनच्या चीफ ऑफ जनरल स्टाफ यांनी सांगितलं की कीव्ह शहरासाठीच्या सुरक्षायंत्रणांनी चुहुइव शहर ताब्यात घेतलं.
- युक्रेनमध्ये वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या सर्वसामान्य लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी रशिया हल्ला रोखेल, अशी माहिती रशियाच्या सरकारी माध्यमाने दिलीय.
- कीव्ह, खारकीव्ह यांसारख्या शहरांमध्येही हल्ले रोखण्यासाठी तयार आहोत, असं रशियानं म्हटलंय.
काल घडलेल्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा-झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा
युक्रेनमधून परतले आणखी 410 भारतीय, आतापर्यंत 18 हजार नागरिकांना परत आणल्याचा सरकारचा दावा
जेव्हा रशियाने गावातील पूलही पाडला
अणुबॉम्ब वापरण्याचे अधिकार कुणाकडे असतात? - सोपीगोष्ट 549
झेलेन्स्कीनंतर पंतप्रधान मोदींनी केली पुतिन यांच्याशी चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी चर्चा केली आहे. आज मोदी यांनी पुतिन यांच्याशी 50 मिनिटे संवाद साधला. याआधी मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्याशी देखील चर्चा केली होती.
सध्या चालू असलेल्या युद्धविषयक घडामोडींविषयी पुतिन यांच्याशी मोदींनी चर्चा केली असल्याचे एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी म्हटले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
युक्रेन बाहेर पडेपर्यंत मराठी मुलांची उपासमार; केला गोळीबार, बर्फवृष्टीचा सामना
युक्रेनमध्ये अडकलेले मराठी मुलं आता मायदेशी परतत आहेत. पण युक्रेनमधून बाहेर पडण्याआधी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.
जेवण, पाणी वेळेवर मिळालं नाही. रस्त्यावर बर्फवृष्टी होत असताना दिवसरात्र प्रवास करावा लागला.
त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी हा व्हीडिओ पाहा.
YouTube पोस्टवरून पुढे जापरवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
