You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत, राज्यात एकूण 1761 बाधित

कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स

लाईव्ह कव्हरेज

  1. कोरोना व्हायरस, बॅचलर आणि स्वयंपाक...

  2. पंतप्रधान मोदी सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

    पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करतील. सकाळी 11 वाजता चर्चेला सुरूवात होईल. येत्या दोन ते तीन दिवसात म्हणजे 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन आहे. त्यानंतर पुढे काय, यावर मोदी काही बोलतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

  3. दिल्लीमध्ये 13,550 पीपीई किटस्

    दिल्लीमध्ये 13,550 पीपीई किटस् आणले असल्याचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले.

  4. दिल्लीमध्ये 30 कंटेनमेंट झोन

  5. मालेगावच्या 22 वर्षीय तरुणीचा धुळ्यात मृत्यू

    मालेगावातील 22 वर्षीय तरुणीचा धुळ्यात कोरोना व्हायरसमुळं मृत्यू झाला आहे. काल (10 एप्रिल) या तरुणीच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

    धुळे जिल्ह्यात कोरोना व्हायरसमुळं मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या दोन झालीय.

  6. कोल्हापुरात कोरोनाचा आणखी एक रुग्ण सापडला

    कोल्हापुरात कोरोना व्हायरसचा आणखी एक रुग्ण सापडला. शाहूवाडीतील उचत गावातील तरुणाच्या संपर्कात आल्यानं महिलेला संसर्ग झाला. उचतचा तरुण निझामुद्दीन येथील मरकजच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. कोल्हापुरातील रुग्णांची एकूण संख्या 6 वर पोहचली.

  7. कोरोनाच्या फैलावाला एखाद्या धर्माला जबाबदार धरणं योग्य आहे का? पाहा व्हीडिओ-

  8. भारतात गेल्या 24 तासात 1035 रुग्ण वाढले

    भारतात गेल्या 24 तासात 1035 रुग्णांची वाढ झाली असून, 40 जण मृत्युमुखी पडले. भारतातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या 7447 वर पोहोचलीय. आतापर्यंत 643 जण बरे होऊन घरी परतलेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं ही आकडेवारी दिलीय.

  9. मासेमारी आणि विक्री करण्यास केंद्राची परवानगी

    मासेमारी, मत्स्यपालन उद्योग, मासे विक्री या गोष्टींना देशव्यापी लॉकडाऊनमधून सूट देण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिलीय.

  10. कोरोना व्हायरसमुळे दक्षिण कोरियात शाळांचे वर्ग भरताहेत ऑनलाईन- पाहा व्हीडिओ

  11. लॉकडाऊन उठवणं 'प्राणघातक' - WHO

    "लॉकडाऊन लवकर उठवल्यास कोरोना व्हायरसला रोखण्यास मोठा अडथळा निर्माण होईल. विषाणूचा संसर्ग पुन्हा डोकं वर काढेल," असं मत जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केलंय.

    WHO चे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅडानॉम गेब्रेयेसूस यांनी म्हटलं की, आर्थिक फटका मोठा असला, तरीही लॉकडाऊनच्या अटी शिथिल करताना सर्व देशांना सतर्कता बाळगा.

    युरोपमधील स्पेन आणि इटलीमध्ये कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असतानाही, काही अटी शिथिल करण्यात आल्यात. तेथील लॉकडाऊन मात्र अद्याप कायम आहे.

    "जगातील सर्व देशांच्या प्रमुखांशी लॉकडाऊनसंदर्भात आम्ही चर्चा करतोय. लॉकडाऊन शिथिल करण्याच्या धोरणांवर काम करतोय. मात्र, यात कुठलीच घाई करुन चालणार नाही. लॉकडाऊन पूर्णपणे हटवल्यास मृतांची संख्या झपाट्यानं वाढेल," असं डॉ. टेड्रोस अॅडानॉम गेब्रेयेसूस यांनी सांगितलं.

  12. 20 वर्षांच्या उदित कक्करने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी 'फेस शिल्डस्'

    कोरोनाच्या विषाणूपासून रक्षण करण्यासाठी दिल्लीमधल्या उदित कक्करने हे फेस शिल्ड़्स घरातच तयार केले आहेत. हे शिल्ड थ्री डी प्रिंटरवर तयार केलेले आहेत. दिवसभरात तो असे 20 ते 25 शिल्ड्स तयार करु शकतो. त्याला दिल्लीमधल्या सहा प्रयोगशाळांनी कामही दिले आहे.

  13. दिल्लीतल्या कंटेनमेंट झोनची संख्या 30 वर पोहोचली

    दिल्लीतील कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार लक्षात घेता, सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलीय. ज्या ठिकाणी कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळलाय, अशी ठिकाणं सील केली जात आहेत. दिल्लीत आतापर्यंत 30 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आलेत.

  14. 'पगार द्या, आम्हाला घरी जाऊद्या', सुरतमध्ये मजुरांचं मध्यरात्री आंदोलन

  15. भारत आणि जग कोव्हिड 19 नंतर आर्थिक मंदीचा सामना कसा करणार?

    पाहा व्हीडिओ-

  16. लॉकडाऊनचा काळ वाढला तर काय परिणाम होणार?

    14 एप्रिलला 21 दिवसांचा लॉकडाऊन संपला की त्यानंतर काय होणार? मला माहितीये तुमच्या सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल. सगळीकडे हीच चर्चा सुरू आहे. आता हे स्पष्ट होत चाललंय की 15 एप्रिलला सगळं काही पूर्ववत होणार नाहीये. अनेक मंत्र्यांनी तसे संकेत दिले आहेत. अनेक तज्ज्ञांनी तसे अहवाल दिले आहेत.. त्यामुळे पुढे आपली एक्झिट स्ट्रॅटजी काय असेल आणि मुख्य म्हणजे कोरोना असताना कामं करणं शक्य आहे का.. याबाबत अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा

  17. लॉकडाऊनच्या काळात घरगुती हिंसाचारात अचानक वाढ

    घरगुती हिंसाचारात अचानक वाढ झाल्याचे राष्ट्रीय महिला आयोगानं म्हटलंय. लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर म्हणजे गेल्या 18 दिवसात घरगुती हिंसाचाराची 123 प्रकरणं आयोगाकडे आले आहेत. नेहमीपेक्षा ही संख्या जास्त असल्याचे आयोगाचे म्हणणे आहे.

  18. अमेरिकेत एका दिवसात 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

    अमेरिकेत एका दिवसात 2000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. 24 तासांमध्ये 2108 लोकांचे प्राण गेले आहेत. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

  19. आतापर्यंतच्या घडामोडी

    नमस्कार,

    दररोज आपण बीबीसी मराठीवर कोरोना व्हायरससंबंधी ताजे अपडेटस देत आहोत.

    शुक्रवारी राज्यात कोरोनाचे नवीन 210 नवीन रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1574 झाली आहे. तसेच काल राज्यात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

    राज्यातील एकूण मृतांची संख्या 110 झाली आहे

    ब्रिटनमध्ये कोव्हिड-19 मुळे 866 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांचा आकडा आता 8114 झाला आहे.

    आतापर्यंतच्या घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा