You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

ठाणे जिलह्यातील सर्व भाजीपाला, फळे दुकानं 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार

पाहा कोरोना व्हायरस विषयीचे महाराष्ट्र, देश आणि जगातले सर्व ताजे अपडेट्स एकाच ठिकाणी...

लाईव्ह कव्हरेज

  1. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8,159 नवे कोरोना रुग्ण, 165 जणांचा मृत्यू

  2. ठाणे जिल्ह्यातील सर्व फळे-भाजीपाला दुकानं 14 एप्रिलपर्यंत बंद

    ठाणे जिल्ह्यातील सर्व फळे आणि भाजीपाला दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. लोक सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    किराणा मालाची दुकानं मात्र सुरू राहणार आहेत.

    अंबरनाथ, बदलापुर, शहापूर आणि मुरबाड नगर परिषद क्षेत्राच्या सीमा 14 एप्रिल पर्यंत बंद करण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

  3. महाराष्ट्रात कोरोनाचे 210 नवीन रुग्ण, एकूण संख्या 1574

    शुक्रवारी राज्यात कोरोनाचे नवीन 210 नवीन रुग्ण आढळले. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1574 झाली आहे. याव्यतिरिक्त आज राज्यात 13 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

    या 13 पैकी 10 जण मुंबईतले असून पुणे, पनवेल, वसई-विरार येथील प्रत्येकी एका जणाचा मृत्यू झाला. मृतांपैकी 9 पुरुष, तर 4 महिला आहेत.

    राज्यातील एकूण मृतांची संख्या 110 झाली आहे.

  4. दक्षिण कोरियामध्ये बऱ्या झालेल्या 91 रुग्णांना पुन्हा कोरोनाचा संसर्ग

    दक्षिण कोरियामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गातून बऱ्या झालेल्या 91 लोकांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचं वैद्यकीय तपासणीतून समोर आलं आहे.

    कोरियाच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेनशनने हे स्पष्ट केलं नाही, की हे सर्व रुग्ण पुन्हा कसे पॉझिटिव्ह बनले.

    काही तज्ज्ञांनी त्यांची चाचणी योग्य प्रकारे झाली नसेल, असा निष्कर्ष मांडला आहे.

    त्यामुळे या रुग्णांच्या पुन्हा होणाऱ्या चाचणीकडे सगळ्या जगाचं लक्ष असेल. कारण आतापर्यंत असा समज आहे, की एकदा कोव्हिड-19 चा झाल्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा कोरोनाचा संसर्ग होत नाही. कारण त्यांच्यामध्ये या विषाणूशी लढण्याची प्रतिकारक्षमता वाढते.

  5. डोंबिवलीच्या महापौर पुन्हा बनणार नर्स

    जे लोक रुग्णसेवेत होते त्यांनी कोरोनाच्या संकटाच्या काळात रुग्णसेवा करावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुन्हा कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा देण्याचा निश्चयडोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी केला आहे. इथं वाचा सविस्तर बातमी.

  6. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 866 जणांचा मृत्यू

    ब्रिटनमध्ये कोव्हिड-19 मुळे 866 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा आता 8114 झाला आहे.

    बेल्जियमध्येही मृतांचा आकडा वाढला असून गेल्या चोवीस तासात 496 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बेल्जियममध्ये आतापर्यत 3,019 जणांचा मृत्यू झाला आहे.

  7. व्हॉट्सअपवर कोरोनासंबंधी अफवा पसरवणं ग्रुप अॅडमिनला पडणार महागात

    कोरोना व्हायरससंबंधी सोशल मीडिया अफवा तसंच चुकीचे मेसेज पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. व्हॉट्सअपवर असे मेसेज पसरवल्यास संबंधित ग्रुपच्या अॅडमिनवर कारवाई करण्यात येईल, असं मुंबई पोलिसांनी म्हटलं आहे.

  8. आजचं कार्टून

    दिल्ली, महाराष्ट्र आणि ओडिशा या राज्यांनी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. त्यासंबंधी आजचं कार्टून.

  9. महाराष्ट्रात लॉकडाऊननंतर सरकारचा काय प्लान?

    कोरोना व्हायरसच्या नियंत्रणाविषयी जी माहिती समोर येते आहे, त्यानुसार, केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्वात कोरोना विषाणूच्या फैलावाच्या काळात कंन्टेनमेन्ट (नियंत्रण) प्लान तयार केला आहे.

    अर्थात हा प्लान लॉकडाऊन हटवल्यानंतर राबविण्यात येणार आहे, असं सरकारनं अधिकृतरित्या कुठेही म्हटलं नाही आहे.किंबहुना क्लस्टर कंटेनमेंट प्लान राजस्थान, महाराष्ट्र यासारख्या राज्यांमध्ये राबवला जातो आहे. तोच आता अधिक व्यापक प्रमाणावर देशभरात वापरण्यात येईल.

    याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी पाहा हा व्हीडिओ.

  10. भारतात अद्याप कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाला सुरुवात नाही - आरोग्य मंत्रालय

    गेल्या 24 तासांत देशात 678 नवीन रुग्ण वाढले असून कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 6412 झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

    देशात अद्याप कोरोनाच्या सामुदायिक संसर्गाची सुरुवात झाली नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे-

    1. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसमुळे 33 मृत्यू झाले आहेत. देशात आतापर्यंत कोरोनामुळे 199 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 503 रुग्ण बरे झाले आहेत.

    2. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्री आणि आरोग्य सचिवांनी देशातील सर्व राज्यांतील आरोग्य मंत्री तसेच आरोग्य संबंधित अधिकाऱ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. सर्वांनी कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी सज्ज राहण्याचं आवाहन केंद्राने केलं आहे.

    3. मलेरियासाठी वापरण्यात येणाऱ्या तसंच काही अपवादात्मक स्थितीत कोरोना व्हायरसग्रस्तांच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या हायड्रॉक्सिक्लोरोक्विन या औषधाचा पुरेसा साठा भारतात उपलब्ध असल्याचं अगरवाल यांनी सांगितलं.

    4. जानेवारीत एका लॅबमध्ये कोरोना व्हायरसशी संबंधित चाचणी करण्यात येत होती. सध्या 146 लॅबमध्ये तपासणी सुरू आहे. 67 खासगी लॅबमध्येही चाचणी घेण्यात येत आहे. काल एका दिवसात 16 हजार चाचण्या घेण्यात आल्याची माहिती अगरवाल यांनी दिली.

  11. कोरोनामुळे जवळपास 1 लाख जणांचा मृत्यू

    कोरोना व्हायरसनं आतापर्यंत जगातील 96 हजार जणांचा बळी घेतला आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या आकडेवारीतून हे समोर आलं आहे.

    इटलीत 18,300, अमेरिकेत 16,686 आणि स्पेनमध्ये 15,447 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र सरकारची आकडेवारी आणि या आकडेवारीमध्ये थोडाफार फरक असू शकतो, असंही विद्यापीठानं म्हटलं आहे.

    हा आकडा मोठा असू शकतो, कारण अनेक देशांनी हॉस्पिटलबाहेरील मृत्यूंचा यात समावेश केलेला नाही.

    कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये अनेक जण वयस्कर होते, त्यांना इतरही आजार होते, असंही विद्यापाठीनं स्पष्ट केलं आहे.

  12. सप्टेंबरपर्यंत पंजाब बंद ठेवू शकत नाही - अमरिंदर सिंग

    आम्ही सप्टेंबरपर्यंत पंजाब बंद ठेवू शकत नाही. म्हणून कोरोना असताना कामं कशी करायची, याचा आम्ही विचार करत आहोत. त्यासाठी एक समिती स्थापन केली आहे, असं पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी म्हटलं आहे.

  13. मुंबईतल्या हॉस्पिटलमधल्या सर्व नर्सेसना केलं क्वारंटाईन

    मुंबईतल्या दादर येथील सुश्रुषा हॉस्पिटलमधील सर्व नर्सेसना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमधल्या 2 नर्सेसना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे.

    नवीन कोणत्याही रुग्णाला दाखल करू नका आणि आधी भरती असलेल्या रुग्णांना सुद्दी द्या, असे आदेश मुंबई महापालिकेनं दिले आहेत.

  14. धारावीतील सर्व स्वच्छतागृहे सॅनिटाइझ करण्याचे काम सुरू

  15. स्वच्छता कामगारांचे हार घालून, टाळ्या वाजवून अभिनंदन

    अंबाला येथील लोकांनी स्वच्छता कामगारांचे हार घालून, पुष्पवृष्टी करुन आणि टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

  16. पंकजा मुंडे म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यापेक्षा सुचना करेन

  17. नागालँडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही

    नागालँडमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण दिसून आलेला नाही. 69 जणांची चाचणी केल्यानंतर त्यातील 65 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. 4 जणांच्या चाचणीचा अहवाल अजून यायचा आहे.

  18. 'फॅमिली इमर्जन्सी'चं पत्र घेऊन वाधवान पोहोचले खरे, पण असं फुटलं त्यांचं बिंग

  19. मुंबई पोलिसांनी मानले अक्षय कुमारचे आभार

    अभिनेता अक्षय कुमारने काल ट्वीटरवर प्रसिद्ध केलेल्या व्हीडिओला उत्तर देऊन मुंबई पोलिसांनी त्याचे आभार मानले आहेत.

  20. महाराष्ट्रात 16 नवे रुग्ण

    महाराष्ट्रात आज 16 नवे कोव्हिड-19चे रुग्ण सापडले आहेत.