You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

महाराष्ट्रात दिवसभरात कोरोनामुळे 2 मृत्यू, रुग्णांचा आकडा 220

कोरोनामुळे देशात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.

लाईव्ह कव्हरेज

  1. काश्मिरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, कोरोना व्हायरस : काश्मिरमध्ये पहिला बळी, 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

    काश्मिरमध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे पहिला मृत्यू झाला आहे.

    श्रीनगरमधील हैदरपूरा येथील 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता. संबंधित रुग्ण दिल्ली, उत्तर प्रदेशमधून प्रवास करून परतला होता.

    त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाबाचाही त्रास होता. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

    जम्मू आणि काश्मीरमध्ये कोरोनाचे 11 रुग्ण आढळले आहेत.

  2. औरंगाबादमध्ये अनेक मंगल कार्यालये सील, कोरोना व्हायरस : खबरदारी म्हणून औरंगाबादमध्ये अनेक मंगल कार्यालये सील

    औरंगाबादजवळ चिकलठाणा परिसरात मोठ्या प्रमाणावर मंगल कार्यालये आहेत. ही कार्यालयेच सील करण्यात आल्याची माहिती तलाठ्यांनी दिली आहे.

    गर्दी टाळण्यासाठी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं चिकलठाण्याचे तलाठी विशाल मगरे यांनी सांगितलं.

  3. महाराष्ट्रात कोरोनाचे अजून दोन रुग्ण, एकूण संख्या 124, कोरोना व्हायरस : महाराष्ट्रात अजून दोन रुग्ण पॉझिटिव्ह, राज्यातील एकूण संख्या 124

    महाराष्ट्रातल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता वाढून 124 झाला आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत एक आणि ठाण्यामध्ये एक रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळला आहे.

    दरम्यान, राज्यातील कोरोनाचे 14 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पिटलमधून सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी (25 मार्च) दिली.

  4. कोरोना व्हायरसमुळे विक्रमगडमधील अनेक गावांच्या सीमा बंद, कोरोना व्हायरसमुळे विक्रमगडमधील अनेक गावांच्या सीमा बंद

    कोरोना विषाणुच्या भीतीनं #पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या अनेक गावातली प्रवेशद्वारं सील; बाहेरील व्यक्तीना गावात प्रवेश बंद ; प्रवेशद्वारांवर ग्रामस्थांचा पहारा

  5. कोरोना संदर्भातील विविध विषयांवर पंतप्रधानांनी साधला संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधल्या लोकांच्या प्रश्नांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरेही दिली.

  6. कोरोना संदर्भातील विविध विषयांवर पंतप्रधानांनी साधला संवाद

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मधल्या लोकांच्या प्रश्नांना व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उत्तरेही दिली.

  7. रुग्णांना सेवा नाकारणाऱ्या खासगी डॉक्टर्स व रुग्णालयांवर कारवाई- आरोग्य राज्यमंत्री

    काही डॉक्टर्स व खाजगी रुग्णालय त्यांच्या ओपीडी मध्ये येणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे येत आहेत.

    देशासमोरील या संकटाला सामोरे जात असताना आरोग्य क्षेत्रातीलच काही मोजकी मंडळी रुग्णसेवा नाकारत असल्याच्या तक्रारी येत आहेत, या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वच डॉक्टर्स आणि रुग्णालयाच्या विश्वस्तांनी आपल्या रुग्णालयात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रुग्णांना आपण आपल्या परीने सेवा द्यावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले आहे.

    आपणाकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये कोरोना प्रादुर्भावाचाच्या संदर्भात लक्षणे आढळल्यास आपण आपल्या परिसरातील शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती द्यावी. खाजगी डॉक्टरच्या ओपीडी अथवा रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना सेवा देण्याचे नाकारल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना रद्द करण्याबाबत कारवाई केली जाईल असेही राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले आहे.

  8. राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 116वर

    राज्यातील कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या आता 116 वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.

    आज सांगलीच्या एकाच कुटुंबातील 5 सदस्य संसर्गातून बाधीत आढळून आले, त्याशिवाय मुंबईचे 4 सदस्य प्रवास इतिहास अथवा संसर्गातून बाधीत झाले आहेत, असं ट्वीट त्यांनी केलं.

    यापैकी 14 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत, असंही ते म्हणाले.

  9. पाहा उद्धव ठाकरे यांचं गुढीपाडवा विशेष संदेश

  10. 'त्यांची काळजी सरकार घेणार', मुख्यमंत्र्यांचं उद्धव ठाकरे यांचं आश्वासन

    ज्यांचं तळहातावर पोट, त्यांची काळजी सरकार घेणार. उद्योगपती संपर्क करून मदत देऊ करत आहेत. रिलायन्सने एक हॉस्पिटल सेटअप करून दिलंय.

    शेतकरी काम करताहेत, कारण आज शेती नाही केली तर उद्या दुसरं संकट उभं राहील. भाजीपाल्याची दुकानं बंद होणार नाहीत, तिथेच झुंबड करू नका.

  11. 'खिडक्या उघडा, हवा येऊ द्या', उद्धव ठाकरे

    "केंद्र सरकारने तर सूचना केली आहे की घरी एअर कंडिश्नर बंद करा, घरातलं तापमान कमी करू नका, कारण त्यामुळे दमटपणा वाढतो. त्यामुळे खिडक्या उघड्या ठेवा. आम्ही त्यांना सांगितलं आमचं नेहमी तसंच राहिलंय - चला हवा येऊ द्या.

    "कुणी मला विचारलं की तुम्ही घरात काय करताय?

    "मी माझ्या मिसेस मुख्यमंत्र्यांचं ऐकतोय, तुम्ही तुमच्या होम मिनिस्टरचं ऐका."

  12. उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्राशी संवाद

    गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. आज शांतता असली तरी कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर विजयाची गुढी उभारू.

    सोशल मीडियावर आपण पाहत आहोत अनेक कुटुंबं पहिल्यांदाच एकत्र आली आहेत.

    आपण आजपर्यंत जे गमावलं होतं, ते परत मिळतंय. हे चांगलंच आहे.

  13. सांगलीत कोरोनाचे आणखी 5 रुग्ण

    सांगलीत कोरोना व्हायरसचे 5 रुग्ण वाढले आहेत. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये 4 कोरोना संशयीतांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. एकाच कुटुंबातील आणखी 5 लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सांगली जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 9 झाली आहे. अहवालानंतर ते कोणाच्या संपर्कात होते याची तपासणी करण्यात येत आहे. तसंच पुढे घ्यावयाची खबरदारी प्रशासन पूर्णत: घेत आहे. कुणीही घाबरून जाऊ नये, असं आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय साळुंखे यांनी केलं आहे.

  14. इन्कम टॅक्स भरायला 30 जूनपर्यंत मुभा

    कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर इन्कम टॅक्स भरण्याची मुदत 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं. नोटीस, अपील, रिटर्न फाईल 30 जूनपर्यंत करता येणार आहे.

    उशिरा कर परतावा करणाऱ्यांना 12ऐवजी 9 टक्के दंड आकारण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं.

    आधार-पॅन लिंक करण्याची मुदतही 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे.

  15. महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा मृत्यू

    मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात आणखी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. 65 वर्षांच्या या व्यक्तीनं आधी दुबई आणि नंतर अहमदाबाद-मुंबई असा प्रवास केला होता. या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेह होता, असं मुंबई महापालिकेनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.

  16. राज्यसभेच्या 26 फेब्रुवारीच्या निवडणुका पुढे ढकलल्या

    राज्यसभेच्या 26 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 31 मार्चनंतर निवडणुका कधी घ्यायच्या याचा आढावा घेतला जाईल असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

  17. पंतप्रधान मोदींचं आज रात्री 8 वाजता देशाला उद्देशून भाषण

    पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला उद्देशून भाषण करणार आहेत. देशात पसरत असलेल्या कोरोना व्हायरसच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर ते देशवासीयांशी संवाद साधणार आहेत.

  18. कोरोना व्हायरसचे महाराष्ट्रात आता 101 रुग्ण

    महाराष्ट्रात आता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 101 वर पोहोचली आहे, तर देशात आतापर्यंत 490 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.

  19. देशात कोरोनाबाधितांची संख्या 492 वर

    देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा सतत वाढतच आहे. सध्या देशात 492 जणांना यांची लागण झाली आहे.

  20. राज्यात संचारबंदी लागू- उद्धव ठाकरे

    कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. वाचा संपूर्ण बातमी