You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल

लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील. तसंच, निकालासंबंधी इतरही घडामोडींचे अपडेट तुम्हाला या लाईव्ह पेजवर मिळतील.

थोडक्यात

  • लोकसभा निवडणुकीचे कल आता हाती येत आहेत.
  • अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
  • जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर
  • सांगलीत १२ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर, भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर
  • अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर
  • नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. सुप्रिया सुळे पुढे की सुनेत्रा पवार? मोहोळ आघाडीवर की धंगेकर?

    सुप्रिया सुळे पुढे की सुनेत्रा पवार? मोहोळ आघाडीवर की धंगेकर? मतमोजणीचे आत्ताचे कौल काय?

    पाहा पुण्याहून बीबीसी मराठीसाठी प्राची कुलकर्णी यांचं पत्रकार प्रशांत आहेर यांच्यासोबत विश्लेषण

    व्हीडिओ पाहा इथे क्लिक करून

  2. माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची आघाडी

    महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे माढा. माढ्यात भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत होती.

    सुरुवातीच्या कलांमध्ये मोहिते पाटील घराण्याच्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी 11 हजार 700 मतांची आघाडी मिळवली आहे.

  3. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती : महाराष्ट्रातील 48 जागांवर कोणाची आघाडी?

  4. पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान होणार- जयराम रमेश

    काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मतमोजणीच्या सुरुवातीच्या आकड्यांवर प्रतिक्रिया दिली आहे.

    सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान होणार असल्याचा दावा जयराम रमेश यांनी केला आहे.

    एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश म्हणाले, "या ट्रेंडवरून असं दिसून येतंय की सध्याचे पंतप्रधान माजी पंतप्रधान होणार आहेत. हा त्यांचा (मोदींचा) नैतिक आणि राजकीय पराभव आहे."

  5. महाराष्ट्र : 2019 लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार

    महाराष्ट्रात 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांची यादी. तेव्हा शिवसेना आणि भाजपने लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली होती.

  6. आघाडी अपक्ष विशाल पाटलांची, जल्लोष काँग्रेस कार्यालयासमोर

    सांगली लोकसभेच्या निवडणुकीत सुरुवातीच्या मतमोजणीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी आघाडी घेतल्यानंतर सांगलीच्या काँग्रेस कार्यालयासमोर जल्लोष करण्यात आला.

    लोकसभा मतमोजणीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विशाल पाटील 12958 मतांनी आघाडीवर आहेत.

  7. कार्टून : तुम्ही कुठली ऑर्डर दिलीत का? किंवा घेतली का?

  8. धाराशिवमध्ये ठाकरे गटाचे ओमराजे आघाडीवर, अर्चना पाटील पिछाडीवर

    ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर विरुद्ध अजित पवार गटाच्या अर्चना पाटील यांच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली आहे.

    भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असलेल्या अर्चना पाटील यांनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला होता पण मतदारांनी त्यांना सुरुवातीच्या मतमोजणीत पिछाडीवर टाकलं आहे.

  9. महाराष्ट्र निकाल LIVE शिंदे की ठाकरे, अजित पवार की शरद पवार - राज्यात कुणाचा पक्ष पुढे?

    राज्यातले मतमोजणीचे ताजे कल, अपडेट्स आणि विश्लेषण पाहा LIVE इथे

    विश्लेषण - विनायक गायकवाड आणि सिद्धनाथ गानू

  10. साताऱ्यात उदयनराजे पिछाडीवर, शशिकांत शिंदेंची आघाडी

    सातारा लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले हे पिछाडीवर पडले आहेत.

    सातारकरांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांना 5655 मतांची आघाडी सुरुवातीचा कलांमध्ये दिली आहे.

  11. सुरुवातीच्या कलांमध्ये मोदी आणि इंडियात टक्कर

    सुरुवातीचा मतमोजणीचा कल पाहता एनडीए 277 जागांवर आघाडीवर आहे, तर इंडिया अलायन्स 205 जागांवर आघाडीवर आहे.

    लोकसभेच्या सर्व 542 जागांसाठी मंगळवारी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. सुरत लोकसभेची जागा भाजपने यापूर्वीच बिनविरोध जिंकली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्यात चुरस दिसून येत आहे.

  12. रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे पिछाडीवर, रायगडमध्ये सुनील तटकरेंची पिछाडी

    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे पिछाडीवर आहेत.

    निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार ठाकरे गटाच्या विनायक राऊत यांनी 1712 मतांची आघाडी घेतली आहे.

    कोकणातल्या रायगडमध्येही सुनील तटकरे पिछाडीवर आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अनंत गीते आघाडीवर आहेत.

  13. काय आहेत सुरुवातीचे कल? एनडीए आणि इंडिया किती जागांवर आघाडीवर?

  14. सांगलीत तिसऱ्या फेरीअखेरीस विशाल पाटील आघाडीवर

    सांगली लोकसभा तिसऱ्या फेरी अखेर अपक्ष उमेदवार विशाला पाटील 16 हजार 561 मतांनी आघाडीवर.

    भाजपाचे संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर

  15. निकालांचे सुरूवातीचे कल हाती, शेअर बाजारात घसरणीने ट्रेडिंगला सुरुवात

    लोकसभा निवडणुकीसाठीच्या निकालांची मतमोजणी सुरू होऊन कल हातात येत असतानाच शेअर बाजारात घसरणीने ट्रेडिंगला सुरुवात झाली आहे. सेंसेक्स आणि निफ्टी दोन्हीमध्ये घसरण आहे.

    सेंसेक्स 1000 पाँईंट्स घसरून सुरुवात झाली. तर निफ्टीमध्येही 400 अंकांच्या घसरणीने सुरुवात झाली. भाजप आणि भाजपच्या नेतृत्त्वातील NDA आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सनी वर्तवल्यानंतर 3 जूनला शेअर बाजारात तेजी पहायला मिळाली होती.

    सेंसेक्स काल 76,400 च्या पातळीच्याही वर गेला होता. तर निफ्टी 50 निर्देशांकही 23,250च्या पातळीवर होता. पण मतमोजणीच्या दिवशी सुरुवातीचे कल अपेक्षेप्रमाणे न आल्याने बाजारात घसरणीने सुरुवात झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे.

    पुढच्या काही मिनिटांमध्ये सेंसेक्स 2000 तर निफ्टी 600 पाॅइंट्सनी घसरला. मिड कॅप इंडेक्स आणि स्मॉल कॅप इंडेक्समध्येही मोठी घसरण आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, रिलायन्स, लार्सन अँड टूब्रो, पॉवर ग्रिड, NTPC, HDFC बँक या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली. निफ्टी 50 मध्ये सुधारणा व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि जसजसे मतमोजणीचे अधिकाधिक कल हाती यायला लागतील तशी शेअर बाजारात सुधारणा होण्याचा अंदाज आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमारास सेंसेक्स 1500 पाॅइंट्स आणि निप्टी 460 पॉइंट्स खाली होता

  16. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे 6500 मतांनी आघाडीवर

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे आणि कल्याण मतदारसंघात त्यांचे दोन्ही उमेदवार आघाडीवर असल्याचं सुरुवातीच्या कलांमध्ये पाहायला मिळत आहे.

    कल्याण मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांनी 6572 मतांची आघाडी घेतली आहे. तर ठाण्यातून नरेश म्हस्के यांनी 3964 मतांची आघाडी घेतली आहे.

    त्याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे, यामिनी जाधव आणि श्रीरंग बारणे हेदेखिल त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर आहेत.

  17. मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर सुप्रिया सुळे, शाहू छत्रपती आघाडीवर

    मतमोजणीच्या पहिल्या फेरीत बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. पोस्टल बॅलेटचे कल हाती येत असताना सुनेत्रा पवार आघाडीवर होत्या. मात्र, पहिल्या फेरीअखेर सुप्रिया सुळे 6 हजार 941 ने आघाडीवर आहेत.

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरीत शाहू महाराज छत्रपती आघाडीवर. पहिल्या फेरीत 6170इतक्या मतांनी शाहू महाराज छत्रपती आघाडीवर. कोल्हापूर उत्तर, राधानगरी या विधानसभा मतदारसंघात पहिल्या फेरीत मताधिक्य

    धाराशिवमध्ये दुसऱ्या फेरीअखेरीस शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर 30,000 मतांनी आघाडीवर.

    बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर आहेत.

  18. पोस्टल बॅलेटचे कल हाती, बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर

    देशात आणि राज्यात मतमोजणीला सुरूवात झाली असून सुरूवातीचे कल हाती यायला सुरूवात झाली आहे.

    पोस्टल बॅलेटचे कल हाती येत असून बारामतीत सुनेत्रा पवार आघाडीवर दिसत आहेत.

    अमरावतीमध्ये पोस्टल मतमोजणी प्रक्रियेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आघाडीवर आहेत, तर महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा पिछाडीवर आहेत..

    सांगलीमध्ये अपक्ष उमेदवार विशाल पाटील आघाडीवर आहेत.

    शिरूरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत.

    पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीत नागपुरात नितीन गडकरी आघाडीवर आहेत, तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शामकुमार बर्वे आघाडीवर आहेत.

  19. राज्यात पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू

    सांगली, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

    पहिल्यांदा पोस्टल बॅलेटची मतमोजणी होईल.

    सांगलीमध्ये पहिल्यांदा 6 हजार 961 पोस्टल मतांची पहिल्यांदा होणार मतमोजणी.

    नाशिकमध्ये 3706 पोस्टल बॅलेट आहेत.

    रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघातही मतमोजणीला सुरूवात झाली आहे.

  20. मतमोजणीला सुरुवात, लवकरच कल हाती यायला होणार सुरूवात

    #BreakingNews‌ | मतमोजणीला सुरुवात ☑️

    पाहा लोकसभा निवडणुकीचं अचूक आणि सखोल कव्हरेज थेट तुमच्या

    व्हॉट्सॲपवर आत्ताच भेट द्या bbc.com/marathi ला, आणि फॉलो करा आमच्या चॅनलला

    https://whatsapp.com/channel/0029Vaa8TxTIyPtQpqWBTh3j