You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

रवींद्र वायकर 48 मतांनी विजयी, नाट्यमय घडामोडींनंतर लागला निकाल

लोकसभा निवडणुकांच्या निकालांचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील. तसंच, निकालासंबंधी इतरही घडामोडींचे अपडेट तुम्हाला या लाईव्ह पेजवर मिळतील.

थोडक्यात

  • लोकसभा निवडणुकीचे कल आता हाती येत आहेत.
  • अभिनेत्री कंगना रणौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून जवळपास 54 हजार मतांनी आघाडीवर आहे.
  • नैऋत्य मोसमी वारे आता महाराष्ट्राच्या अगदी वेशीवर पोहोचले आहेत आणि पुढच्या तीन चार दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल अशी अपेक्षा आहे.
  • दक्षिण मध्य मुंबई लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
  • दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.
  • जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर
  • सांगलीत १२ व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर, भाजपाचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर
  • अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर
  • नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. दुपारी एक वाजेपर्यंत काय आहेत महाराष्ट्राचे कल?

  2. उस्मानाबाद लोकसभा निकाल : ओमराजे निंबाळकरांनी मिळवली मोठी आघाडी

  3. एक्झिट पोलच्या अंदाजाप्रमाणे पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांना आघाडी

    पुण्यात नवव्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना 55738 मतांची आघाडी मिळाली आहे.

    काँग्रेसचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे मात्र पिछाडीवर पडले आहे.

  4. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पिछाडीवर, काँग्रेसचे कल्याण काळे पुढे

    जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर पडले आहेत तर, काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर गेले आहेत.

    माढा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील 17 हजार 57 मतांनी आघाडीवर. भा्जपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर पिछाडीवर.

    दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर तर शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर पडले आहेत.

  5. नाशिकमध्ये महायुतीला दणका, मविआचे राजाभाऊ वाजेंना मोठी आघाडी

    शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारीवरून गाजलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला फटका बसला आहे. 15 व्या फेरीच्या शेवटी ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना 417842 मतं मिळाली, विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना 288442 मतं मिळाली.

    नाशिक लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांची आघाडी कायम राहिली आहे. राजाभाऊ वाजे तब्बल 1 लाख 29 हजार 400 मतांची आघाडी मिळाली आहे.

  6. मुंबईत कोणत्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या सेनेची आघाडी? कोणत्या मतदारसंघात शिंदेंच्या सेनेची?

    मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात सध्या चुरशीची लढत दिसत आहे.

    इथे तीन ठिकाणी ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमदेवारांची थेट लढत आहे.

    उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघात ठाकरे गटाच्या अमोल कीर्तीकर, अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आघाडी घेतली आहे.

  7. सांगली, दिंडोरी आणि अकोल्यात भाजप पिछाडीवर

    सांगलीत 12 व्या फेरीअखेर अपक्ष उमेदवार विशाल पाटील 52 हजार 573 मतांनी आघाडीवर आहेत. तर, भाजपचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील पिछाडीवर आहेत.

    दिंडोरीत 10व्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे भास्कर भगरे आघाडीवर, भाजपच्या भारती पवार पिछाडीवर अकोला मतदारसंघात काँग्रेसचे अभय पाटील आघाडीवर, भाजपचे अनुप धोत्रे आणि वंचितचे प्रकार आंबेडकर पिछाडीवर आहेत.

  8. दिंडोरीत भास्कर भगरेंची मोठी आघाडी, केंद्रीय मंत्री भारती पवार पिछाडीवर

    दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या भास्कर भगरे यांनी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यावर मोठी आघाडी मिळवली आहे.

    10 व्या फेरीच्या शेवटी भास्कर भगरे यांना 244220 मतं मिळाली. भारती पवार यांना 211557 मतं मिळाली. भास्कर भगरेंना 32663 मतांची आघाडी मिळाली आहे.

  9. ठाकरे की शिंदे - कुणाची सेना आघाडीवर? शिवसेना भवनात निकालाचे वारे कसे वाहतायत?

    शिवसेना निकाल LIVE : ठाकरे की शिंदे - कुणाची सेना आघाडीवर? शिवसेना भवनात निकालाचे वारे कसे वाहतायत?

  10. जालना, माढा, दक्षिण मध्य मुंबईत कोण आघाडीवर, कोणाची पिछाडी?

    निकालाचे ताजे अपडेट्स

    जालना मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजपचे रावसाहेब दानवे पिछाडीवर,

    काँग्रेसचे कल्याण काळे आघाडीवर

    माढा लोकसभा मतदारसंघात सहाव्या फेरी अखेरीस धैर्यशील मोहिते-पाटील 17 हजार 57 मतांनी आघाडीवर.

    भाजपचे रणजितसिंह नाईक-निंबाळकर पिछाडीवर.

    दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई आघाडीवर तर शिवसेना शिंदे गटाचे राहुल शेवाळे पिछाडीवर

  11. सोलापुरात प्रणिती शिंदे आघाडीवर, राम सातपुते पिछाडीवर; अटीतटीची लढाई

    सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सध्या आघाडीवर आहेत.

    निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या आकडेवारीनुसार दुपारी 12वाजून 30 मिनिटांपर्यंत प्रणिती शिंदे 10934 मतांनी आघाडीवर आहेत.

    माळशिरसचे आमदार आणि भाजपचे सोलापूरचे आमदार राम सातपुते पिछाडीवर पडले आहेत.

  12. अमरावती लोकसभा निकाल : सुरुवातीच्या कलांमध्ये वानखेडे-नवनीत राणांमध्ये रस्सीखेच

  13. काय आहे पूर्व विदर्भातील कल?

  14. सेन्सेक्स 72 हजारांच्या खाली, बारा वाजेपर्यंत 5600 अंकांची घसरण

    सेंसेक्समध्ये 12 वाजताच्या सुमारास 5600 पेक्षा अधिक पॉइंट्सची घसरण आहे. सेंसेक्स 72 हजारांच्या खाली आलाय.

    तर निफ्टी 50 मध्ये 1500 पॉइंट्सची घसरण होत निफ्टी 21 हजारांवर आलेला आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे.

  15. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पिछाडीवर, काँग्रेसचे किशोरी लाल शर्मा पुढे

    उत्तर प्रदेशच्या अमेठी लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पिछाडीवर आहेत.

    भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार स्मृती इराणी यांना सकाळी 11.10 वाजेपर्यंत 63 हजार 652 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांना 90 हजार 747 मते मिळाली आहेत.

    किशोरीलाल शर्मा यांना 27094 मतांची आघाडी आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पराभव केला.

    मात्र, यावेळी काँग्रेसने राहुल गांधींच्या जागी किशोरीलाल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

  16. लोकसभा निवडणूक निकाल : काय आहे पश्चिम महाराष्ट्राचा कल?

  17. सुरुवातीच्या कलामध्ये इंडिया आघाडी 200 जवळ, एक्झिट पोलचे अंदाज चुकले

    सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या डेटानेट ट्रेंडनुसार, एनडीए (भाजप आणि मित्रपक्ष) 299 जागांवर तर इंडिया आघाडी (काँग्रेस आणि मित्रपक्ष) 193 जागांवर आघाडीवर आहेत.

    आत्तापर्यंत, उत्तर प्रदेशमध्ये एनडीए 43 वर आणि इंडिया आघाडी 36 वर पुढे आहे. बिहारमध्ये एनडीए 32 जागांवर तर इंडिया आघाडी 7 जागांवर पुढे आहे.

    तर पश्चिम बंगालमध्ये एनडीए 17 जागांवर तर इंडिया आघाडी 4 जागांवर पुढे आहे. इतर पक्ष 21 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या सकाळी 10 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत भाजप 209 जागांवर तर काँग्रेस 80 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

  18. कोल्हापुरात शाहू महाराज आघाडीवर, मंडलिक पिछाडीवर

    पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ असणाऱ्या कोल्हापुरात काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज आघाडीवर आहेत.

    शिवसेना शिंदे गटाच्या संजय मंडलिक यांना मागे टाकत शाहू महाराजांनी 32 हजारांची आघाडी घेतली आहे.

    धार्मिक ध्रुवीकरणामुळे चर्चेत असलेल्या कोल्हापूर मतदारसंघात शाहू महाराजांनी आघाडी घेतली आहे.

  19. शेअर बाजारात घसरगुंडी, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण

    शेअरबाजाराची घसरगुंडी ट्रेडिंगला सुरुवात झाल्यापासूनची शेअरबाजाराची घसरगुंडी सुरूच आहे. निकालाचे अधिक कल हाती आल्यानंतर शेअर बाजारात सुधारणा होईल असा अंदाज होता, पण एनडीए आणि इंडिया आघाडीतील तुल्यबळ कलांमुळे शेअर बाजारातील अनिश्चितता कायम आहे.

    BSE सेंसेक्स आणि निफ्टी 50 सह शेअर बाजारातल्या इतर इंडेक्समध्येही घसरण आहे. सेंसेक्समध्ये 11.30 वाजताच्या सुमारास 3600 पेक्षा अधिक पॉइंट्सची घसरण आहे. सेंसेक्स 73 हजारांच्या खाली आलाय, तर निफ्टी 50 मध्ये 1000 पॉइंट्सची घसरण होत निफ्टी 22 हजारांवर आलेला आहे. BSE बँकेक्स, मिड कॅप, स्मॉल कॅप असे सगळेच निर्देशांक घसरलेले आहेत.

    अदानी समूहाच्या अदानी एंटरप्रायजेस कंपनीचा शेअऱ सर्वात घसरलेला आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत या शेअरच्या किंमतीत 13 % घसरण झाली होती. फेब्रुवारी 2022 नंतरची ही शेअर बाजारातली सर्वात मोठी घसरण आहे. 3 जूनला एक्झिट पोलच्या अंदाजांवर बाजाराने मोठी उसळण घेतली होती.

    दोन प्रमुख निर्देशांकांमध्ये 3% वाढ सोमवारच्या दिवशी नोंदवण्यात आली होती. भाजप आणि भाजपच्या नेतृत्त्वातील NDA आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतेक एक्झिट पोल्सनी शनिवारी 1 जून रोजी वर्तवल्यानंतर 3 जूनला शेअर बाजारात तेजी आली होती. सेंसेक्स काल 76,400 च्या पातळीच्याही वर गेला होता. तर निफ्टी 50 निर्देशांकही 23,250च्या पातळीवर होता.

  20. 'हे' 13 लोकसभा मतदारसंघ ठरवणार ‘शिवसेना’ कुणाची?

    लोकसभा निवडणुकीचा निकालाचे कल हाती येऊ लागले आहेत. या निकालात अनेकांचं लक्ष महाराष्ट्रातील 'ठाकरे विरुद्ध शिंदे' लढतीकडे अधिक आहे.

    कारण दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड केलं आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत बसले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. पुढे शिंदेंच्या नेतृत्वातील पक्षाला ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्हही मिळालं.

    मात्र, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कायम दावा करत आले आहेत की, ‘खरी शिवसेना’ आमचीच आहे.

    लोकसभा निवडणुकीत ठाकरे आणि शिंदेंची 'शिवसेना' एकूण 13 जागांवर आमने-सामने लढत आहेत. या जागांवर नेमकं काय होईल, ही बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा.