छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ
- पहिली फेरी
- महाविकास आघाडी - राजू शिंदे 5622
- महायुती- संजय शिरसाट 5105
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.
ओंकार करंबेळकर
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जयंत पाटील दुसऱ्या फेरीअंती 1195 मतांनी आघाडीवर

फोटो स्रोत, Facebook
इस्लामपूर मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जयंत पाटील 691 मतांनी आघाडीवर
टपाली मतांमध्ये सांगली मधून भाजपाचे सुधीर गाडगीळ आघाडीवर
भंडारा- नरेंद्र पहाडे आघाडीवर
तुमसर- राजू कारेमोरे आघाडीवर
साकोली - नाना पटोले आघाडीवर
पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीच्या अर्ध्या तासात पोस्टल मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी केली जाईल. मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांनंतर अंतिम निकाल स्पष्ट होतो.

टपाली मतांमध्ये...
'कुटुंबप्रमुख होणार पुन्हा मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर लावण्यात आले आहेत.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कुणी किती जागा लढवल्या, याची ही आकडेवारी!

या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे.
महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांचा समावेश आहे.
सध्या पक्षीय बलाबल कसं आहे, ते पाहा...


महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.
यासंदर्भातील इत्यंभूत आकडेवारी तुम्ही इथे पाहू शकता.


शिवसेना या पक्षाची दोन शकले झाली. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत आहे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विरोधात आहे.
खरी शिवसेना कुणाची, या प्रश्नाचं खऱ्या अर्थाने उत्तर याच निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.
निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर पोलिसांचा अक्षरश: फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

राज्यातील 288 मतदारसंघासाठी 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
पण काही अपवाद वगळता, राज्यात प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच आहे.
महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही गटांमध्ये प्रमुख तीन-तीन राजकीय पक्ष आहेत, तर इतर काही लहान पक्षही त्यांच्या साथीनं आहेत.
तसंच, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडी आणि मनसे अशा पक्षांच्या उमेदवारांमुळे काही ठिकाणी तिरंगी लढतीही पाहायला मिळणार आहेत.
288 मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची यादी तुम्हाला इथे वाचता येईल.

अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रं सज्ज झाली आहेत!

विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.
त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातील मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

