'विकासाचा विजय झाला' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवा
  • राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, आता आज 23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू
  • महायुती 224, महाविकास आघाडी 56 तर इतर 08 जागांवर आघाडीवर
  • राज्यभरात महायुतीला मिळालेल्या कौलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.
  • बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक पराभूत.
  • अमित देशमुख, धीरज देशमुख, ऋतूराज पाटील पिछाडीवर
  • मनसे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून पराभूत झाले आहेत.
  • नितेश राणे, सुधीर गाडगीळ, आदिती तटकरे, रोहित पाटील विजयी झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. कसे आहेत पक्षनिहाय कल?

    सध्या आघाड्यांचे कल पाहिल्यास, महायुती 215 जागांवर, महाविकास आघाडी 57 तर इतर 16 जागांवर आघाडीवर आहेत.

    संपूर्ण निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  2. सध्याचे ताजे कल (सकाळी 11 वाजेपर्यंत)

    • मोठ्या लढतींबाबत बोलायचं झालं तर संगमनेरमधून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात तर तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर पिछाडीवर आहेत.
    • माहिममधून मनसे नेते अमित ठाकरे तर कर्जत जामखेडमधून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे रोहित पवार पिछाडीवर आहेत.
    • सर्व मोठ्या लढतींचे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  3. नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचे अपडेट

    • 1. येवलात छगन भुजबळ 6900 मतांनी आघाडी
    • 2. नांदगाव मध्ये सुहास कांदे 27465 आघाडीवर
    • 3. पश्चिम विधानसभा मतदारसंघात सीमा हिरे 18209 आघाडीवर दिनकर पाटील दुसऱ्या क्रमांकावर
    • 4. देवळाली विधानसभा मतदारसंघात सरोज अहिरे 18477 आघाडीवर
    • 5. मध्य विधानसभा मतदारसंघात देवयानी फरांदे 3842 आघाडीवर
    • 6. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राहुल ढिकले 7830 आघाडीवर
    • 7. मालेगाव मध्ये दादा भुसे 30190 आघाडीवर
    • 8. इगतपुरीत हिरामण खोसकर 13500 आघाडीवर
    • 9. दिंडोरीतून नरहरी शिरवळ 15457 आघाडीवर (नववी फेरी)
    • 10. निफाड मधून दिलीप बनकर 14491 आघाडीवर
    • 11. चांदवड मधून राहुल आहेर 25956 आघाडीवर
    • 12. मालेगाव मध्य मधून अपक्ष असिफ शेख 3637 मतांनी आघाडीवर
    • 13. बागलान मधून दिलीप बोरसे 10660 आघाडीवर
    • 14. कळवण मधून जे पी गावित 99 मतांनी आघाडीवर
    • 15. सिन्नर मधून माणिकराव कोकाटे 13900 आघाडीवर
  4. असं आहे दोन्ही आघाड्यांसाठीचे कल (सकाळी 10:30 वाजेपर्यंत)

    या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांची महायुती तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांची महाविकास आघाडी असा हा सामना आहे.

    तुम्हाला मोठ्या लढतींचे कल इथे वाचायला मिळतील.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  5. काय आहेत ताजे कल (सकाळी 10:30 वाजेपर्यंत)

    मोठ्या लढतींचे निकाल तुम्ही इथे वाचू शकता.

    विधानसभा निवडणूक 2024

    फोटो स्रोत, bbc

  6. कुठे कोण आहे आघाडीवर?

    विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, विधानसभा निवडणूक 2024
  7. अमरावती जिल्ह्यातील मतदारसंघात कसे आहेत कल?

    • अमरावती - फेरी 5 - महायुतीच्या सुलभा खोडके 4923 मतांनी आघाडीवर
    • बडनेरा फेरी 2 - युवा स्वाभिमानचे रवी राणा 1930% मतांनी आघाडीवर
    • दर्यापूर फेरी 2 - ठाकरे गटाचे गजानन लवटे 282 मतांनी आघाडीवर
    • धामणगाव - फेरी 5 - भाजपचे प्रताप अडसड 3100 मतांनी आघाडीवर
    • मोर्शी - फेरी 2 - भाजपचे उमेश यावलकर 2167 मतांनी आघाडीवर
    • अचलपूर - फेरी 3 - भाजपचे प्रवीण तायडे 6128 आघाडीवर
    • मेळघाट - फेरी 2 - भाजपचे केवलराम काळे 2300 मतांनी आघाडीवर
    • तिवसा - फेरी 1 - भाजपचे राजेश वानखेडे 783 मतांनी आघाडीवर
  8. अजित पवार 15 हजार मतांनी आघाडीवर

    • चौथ्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 15245 मतांनी आघाडीवर
    • अजित पवार - 35329
    • युगेद्र पवार - 20084
    बारामती मतदारसंघ
    फोटो कॅप्शन, बारामती मतदारसंघ
  9. अमित ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर, माहीममधील चुरस वाढली

    राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे माहीम मतदारसंघामध्ये तिसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहेत.

    या मतदारसंघात ठाकरे गटाचे महेश सावंत पहिल्या, तर शिंदे गटाचे सद सरवणकर दुसऱ्या स्थानी आहेत.

    अमित ठाकरेंमुळे या मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

  10. कसे आहेत ताजे कल (सकाळी 10 वाजेपर्यंत)

    असे आहेत सकाळी 10 वाजेपर्यंतचे ताजे कल

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  11. महत्त्वाच्या मतदारसंघांमधले ताजे कल

    विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, विधानसभा निवडणूक 2024
  12. सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांमध्ये कसे आहेत कल?

    • कराड दक्षिण : अतुल भोसले 1500 मतांनी आघाडीवर
    • माण-खटाव : जयकुमार गोरे 12761 मतांनी आघाडीवर
    • सातारा : शिवेंद्रराजे 12731 मतांनी आघाडीवर
    • पाटण : शंभुराज देसाई 1268 मतांनी आघाडीवर
    • फलटण : सचिन पाटील 1493 मतांनी आघाडीवर
    • वाई : मकरंद पाटील 4593 मतांनी आघाडीवर
    • कराड उत्तर : मनोज घोरपडे 2824 मतांनी आघाडीवर
  13. सांगली मतदारसंघ अपडेट्स

    • तिसरी फेरी
    • भाजपा - सुधीर गाडगीळ - 20311
    • काँग्रेस - पृथ्वीराज पाटील - 13005
    • अपक्ष - जयश्रीताई पाटील - 9051
    • तिसऱ्या फेरी अखेर भाजपा सुधीर गाडगीळ 7 हजार 306 मतांनी आघाडीवर
  14. वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघ

    • ऍड. आशिष शेलार - 4,563
    • आसिफ झकेरिया - 2,451
    • आशिष शेलार यांची आघाडी - 2,212
    आशिष शेलार
  15. अणुशक्ती नगर मतदारसंघ

    • फाहाद अहमद (शरद चंद्र पवार राष्ट्रवादी पक्ष) - 3091
    • सलाम अलिक (अजित पवार राष्ट्रवादी पक्ष) - 2287
    • फाहाद अहमद आघाडीवर
  16. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ

    • पहिली फेरी
    • देवेंद्र फडणवीस - 4713
    • प्रफुल गुडधे -2467
    • देवेंद्र फडणवीस 2246 मतांनी आघाडीवर
    देवेंद्र फडणवीस
    फोटो कॅप्शन, देवेंद्र फडणवीस
  17. महाराष्ट्राच्या निकालाचा कल (सकाळी 9.15 वाजेपर्यंत)

    मतमोजणी सुरु झाली असून सकाळी 9:15 पर्यंतचे कल स्पष्ट झाले आहेत.

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
    फोटो कॅप्शन, महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  18. भुजबळ काका पुतण्यांना धक्का

    • मतमोजणीच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये येवल्यात छगन भुजबळ तर नांदगाव मध्ये समीर भुजबळ पिछाडीवर
    छगन भुजबळ

    फोटो स्रोत, Getty Images

    फोटो कॅप्शन, छगन भुजबळ
  19. मावळ विधानसभा मतदारसंघ

    • चौथी फेरी
    • सुनील शेळके - 24613
    • बापू भेगडे - 96671
  20. छत्रपती संभाजीनगर कन्नड विधानसभा मतदारसंघ

    • पहिली फेरी
    • उदयसिंग राजपूत (उबाठा) - 2047
    • संजना जाधव ( शिंदे सेना) - 2117
    • हर्षवर्धन जाधव - अपक्ष - 1766