You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'विकासाचा विजय झाला' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवा
  • राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, आता आज 23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू
  • महायुती 224, महाविकास आघाडी 56 तर इतर 08 जागांवर आघाडीवर
  • राज्यभरात महायुतीला मिळालेल्या कौलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.
  • बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक पराभूत.
  • अमित देशमुख, धीरज देशमुख, ऋतूराज पाटील पिछाडीवर
  • मनसे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून पराभूत झाले आहेत.
  • नितेश राणे, सुधीर गाडगीळ, आदिती तटकरे, रोहित पाटील विजयी झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. मतमोजणीच्या प्रक्रियेची लगबग सुरु

    मतमोजणीसाठीची प्रक्रिया अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरु होणार आहे. माहीम विधानसभा मतमोजणी केंद्रबाहेरील दृश्य...

  2. आज झारखंड विधानसभा निवडणुकीचाही निकाल!

    आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकालही लागणार आहे.

    या निकालाचे इत्यंभूत अपडेट्सही तुम्हाला इथे वाचता येतील.

  3. कुणाला कुठे मिळेल कौल? महाराष्ट्राचं चित्र नक्की काय असणार?

    बीबीसी मराठी कोणताही एक्झिट पोल सादर करत नाही. मात्र, आम्ही मतदानाच्या पार्श्वभूमीवर कुणाचं पारडं जड आहे, याचा विभागवार आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

    त्यासाठी बीबीसी मराठीने पुणे, मुंबई, नागपूर आणि संभाजीनगर या मुख्य शहरामधील आघाडीच्या पत्रकारांसोबत चर्चा केली.

    कुठल्या विभागात कोणते मुद्दे प्रभावी ठरले आणि कुणाला कुठे सर्वाधिक कौल मिळेल, याचा विश्लेषणात्मक आढावा तुम्हाला इथे वाचता येईल!

  4. नमस्कार!, मी बीबीसी मराठीचा प्रतिनिधी विनायक होगाडे.

    आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या राजकीय रणधुमाळीसाठी आजचा दिवस फारच महत्त्वाचा असणार आहे.

    दोन मुख्य आघाड्या, सहा प्रमुख पक्ष, तिसरी आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना व वंचित बहुजन आघाडीसारखे छोटे पक्ष यांसह ठिकठिकाणी झालेली बंडखोरी यामुळे या निवडणुकीतलं चित्र नेमकं कसं असेल, याची उत्सुकता प्रत्येकाला लागून राहिली आहे.

    आज साऱ्या गोष्टी स्पष्ट होतील. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरु होईल आणि प्रारंभिक कल येण्यास सुरुवात होईल.

    राज्यातील 288 जागांवर एकूण 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांचं भवितव्य आज ठरणार आहे. लक्षवेधी लढतींसह आज दिवसभरातल्या सर्व घडामोडी बीबीसी मराठीच्या या लाईव्ह पेजवर तुम्हाला वाचायला मिळतील.

    कुणाला कुठे आघाडी मिळाली आहे आणि कुणाचं पारडं किती जड होत आहे, याची इत्यंभूत आकडेवारी तुम्हाला याच लाईव्ह पेजवर वाचायला मिळेल.

    त्यासोबतच तज्ज्ञांच्या विश्लेषणांसह वस्तुनिष्ठ माहिती असलेल्या बातम्या, विश्वासार्ह आकडेवारी, निष्पक्ष वार्तांकनांसह निवडणुकीची ही रणधुमाळी अत्यंत सोप्या आणि तुम्हाला समजेल अशा शब्दात वाचायची असल्यास 'महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024' या पेजवर क्लिक करा!

  5. निकाल काय असेल? जाणून घ्या 5 विश्लेषकांचं मत

    महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार? हा प्रश्न महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला पडलाच असेल. सध्या राज्यभर विधानसभा निवडणुकीची चर्चा सुरू आहे.

    • या निवडणुकीत कोणता फॅक्टर चालणार?
    • कोणत्या जातीय समीकरणांचं गणित मांडलं जाणार?
    • मराठवाड्यात काय होणार?
    • विदर्भात कुणाची सरशी होणार?
    • मुंबईच्या लढाईत कोण जिंकणार?

    अशा अनेक प्रश्नांनी सध्या वर्तमानपत्रं आणि प्रसारमाध्यमं गजबजून गेली आहेत.

    आता निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निवडणुकीचं वारं नेमकं कुणाच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकीय विश्लेषक आणि संपादकांशी संवाद साधला.

  6. महाराष्ट्रात त्रिशंकू परिस्थिती तयार झाल्यास काय?, विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसेंची सविस्तर मुलाखत

    महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या ताब्यात जाईल? महाविकास आघाडी की महायुती, की इतरांच्या मदतीची गरज लागेल? या प्रश्नाचं उत्तर अवघ्या काही तासांत कळेल. कारण विधानसभेचा निकाल लागण्यासाठी काही तासांचाच अवधी उरला आहे.

    निकालाबाबत एक्झिट पोल्सपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत अनेकजण अंदाजांवर अंदाज वर्तवत आहेत. आघाड्या-युत्या, प्रचाराची रंगत वगैरे गोष्टी पाहता, निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

    निकालात स्पष्ट बहुमत असेल की काठावर निकाल लागेल, हे अर्थातच निकाल लागल्यानंतरच स्पष्ट होईल. पण जर निकालानंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली, तर काय?

    याच प्रश्नावर बीबीसी मराठीने महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांच्याशी बातचित केली आणि त्यांच्याकडून पुढील शक्यतांची माहिती घेतली.

  7. नमस्कार!

    महाराष्ट्राच्या विधानसभा निकालाची उत्सुकता तुम्हा-आम्हा सगळ्यांनाच आहे. मतमोजणीला सुरुवात होण्यास आता काही तासांचा अवधी उरला आहे.

    सकाळी सुरू होणाऱ्या मतमोजणीचे आणि परिणामी निकालाचे प्रत्येक अपडेट बीबीसी मराठी तुम्हाला लाईव्ह पेजवरून देईल.

    एक्झिट पोल्सपासून राजकीय विश्लेषकांपर्यंत आणि गावखेड्यापासून शहरांच्या गल्लीबोळांपर्यंत एकच चर्चा आहे, ती म्हणजे, सत्ता कुणाची येणार? याच प्रश्नाचं उत्तर मतपेटीत बंद असलं, तरी मतमोजणीनंतर उघड होईल आणि ते उत्तर आम्ही तुमच्यापर्यंत या लाईव्ह पेजवरून पोहोचवू.