You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'विकासाचा विजय झाला' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवा
  • राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, आता आज 23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू
  • महायुती 224, महाविकास आघाडी 56 तर इतर 08 जागांवर आघाडीवर
  • राज्यभरात महायुतीला मिळालेल्या कौलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.
  • बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक पराभूत.
  • अमित देशमुख, धीरज देशमुख, ऋतूराज पाटील पिछाडीवर
  • मनसे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून पराभूत झाले आहेत.
  • नितेश राणे, सुधीर गाडगीळ, आदिती तटकरे, रोहित पाटील विजयी झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. सांगलीत सुधीर गाडगीळांची हॅटट्रिक

    सांगली विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे सुधीर गाडगीळ यांनी तिसऱ्यांदा विजय नोंदवत केली हॅटट्रिक केली आहे.

    36 हजार 500 मताधिक्क्यांनी सुधीर गाडगीळ यांनी विजय मिळवला आहे.. काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा सुधीर गाडगीळ यांनी पराभव केला आहे.

  2. श्रीवर्धनमध्ये आदिती तटकरे यांचा मोठा विजय

  3. सुरेश खाडे चौथ्यांदा विजयी

    मिरज विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार कामगार मंत्री सुरेश खाडे विजयी झाले आहेत. सलग चौथ्यांदा सुरेश खाडे यांचा विजय. 40 हजार मतांनी नोंदवला विजय.महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांचा त्यांनी पराभव केला आहे.

  4. गोपीचंद पडळकर यांना मोठी आघाडी

    जत विधानसभा मतदार संघात 14 व्या फेरी अखेर भाजपाचे गोपीचंद पडळकर 24 हजार 422 मतांनी आघाडीवर.

  5. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर

    कराड दक्षिण मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण पिछाडीवर आहेत.

    • डॉ. अतुलबाबा भोसले - 60939
    • पृथ्वीराज चव्हाण - 54025
    • अतुलबाबा भोसले 10914 मतांनी आघाडीवर आहेत.
  6. काँग्रेसेचे नाना पटोले पिछाडीवर

    साकोली विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पिछाडीवर आहेत.

    • नाना पटोले - 39371
    • अविनाश ब्राह्मणकर - 40242
    • नाना पटोले 871 मतांनी पिछाडीवर आहेत.
  7. 'एक है तो सेफ है!' - देवेंद्र फडणवीस

    ताज्या आकडेवारीनुसार, महायुती जवळपास 221 जागांवर आघाडीवर आहे. सध्याचा कल पाहता भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे.

    त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं आहे.

    विधानसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट्स इथे वाचा.

  8. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (दुपारी 12:30 वाजेपर्यंत)

    दुपारी 12:30 वाजेपर्यंतचे हे कल आहेत. महायुती सध्या सर्वांत आघाडीवर असून 216 ठिकाणी त्यांचे उमेदवार इतर उमेदवारांना मागे टाकताना दिसत आहेत.

    मोठ्या लढती कोणत्या आहेत आणि तिथे कसं चित्र आहे, ते इथे वाचा.

  9. ताजे कल (दुपारी 12:30 वाजेपर्यंत)

    दुपारी 12:30 वाजेपर्यंतचे हे ताजे कल आहेत.

    अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

  10. निवडणूक आयोगाकडून पहिला विजयी उमेदवार घोषित

    निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या वडाळा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.

  11. कसे आहेत पक्षनिहाय कल? (दुपारी 12 वाजेपर्यंत)

    दुपारी बारा वाजेपर्यंतचे हे कल आहेत.

    या कलांनुसार, भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

    एकूणच मतदारसंघनिहाय कोण कसे आघाडीवर आहे, हे पाहण्यासाठी तुम्ही बीबीसी मराठीचे हे पान वाचू शकता. इथे तुम्हाला ग्राफीक्सच्या माध्यमातून सर्व अपडेट्स समजून घेता येतील.

  12. ताजे कल (दुपारी 12 वाजेपर्यंत)

    दुपारी 12 वाजेपर्यंतचे हे कल आहेत. सध्या महायुती आघाडीवर आहे.

    विधानसभा निवडणुकीतले हे निकाल अनेकांसाठी धक्कादायक आहेत. मोठ्या लढतींमध्ये नेमकं काय झालंय, याचे अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा.

  13. उद्धव ठाकरेंनी शिवसेना विसर्जित करावी; किरीट सोमय्यांचा खोचक टोला

    भाजपचे प्रवक्ते किरीट सोमय्या यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

    "उध्दव ठाकरे यांनी त्यांची उबाठा शिवसेना विसर्जित करावी," असं ट्विट करत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

    सध्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना 18 जागांवर आघाडीवर आहे; तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना 56 जागांवर आघाडीवर आहे.

    विधानसभा निवडणुकीबाबतचे सर्व अपडेट्स इथे वाचा.

  14. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जल्लोष

    सध्या अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. एकूणच महायुती 218 जागांवर आघाडीवर आहे.

    त्यामुळे, देवगिरी येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे आनंद आणि जल्लोष साजरा करताना दिसत आहेत.

    विधानसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

  15. अचलपूरमध्ये बच्चू कडू तिसऱ्या स्थानी

    • अचलपूरमध्ये बच्चू कडू तिसऱ्या स्थानी असून भाजपचे प्रवीण तायडे आघाडीवर आहेत.
    • प्रवीण तायडे (भाजप) - 40668
    • अनिरुद्ध देशमुख (काँग्रेस) - 23512
    • बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पार्टी) - 22904

    विधानसभा निवडणुकीसंदर्भातील सगळे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

  16. भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण

    भाजप कार्यालयाबाहेर जल्लोषाचं वातावरण दिसून येत आहे. सध्या भाजप 125 जागांवर आघाडीवर आहे. या आकडेवारीसह भाजप सर्वांत मोठा पक्ष सिद्ध होण्याची शक्यता आहे.

    त्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकमेकांना आनंदाने अलिंगन देताना!

    विधानसभा निवडणुकीबाबतचे अपडेट्स इथे वाचा.

  17. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी (सकाळी 11:30 वाजेपर्यंत)

    सध्या महायुतीला 214 जागांवर, महाविकास आघाडीला 58 जागांवर तर इतर 16 जागांवर आघाडीवर आहेत.

    ही निवडणूक 15 व्या विधानसभेसाठी होत आहे. या निवडणुकीचा निकाल काय असेल, याचा अंदाज महाराष्ट्रातील आघाडीच्या राजकीय विश्लेषकांनी काय व्यक्त केला होता, ते इथे वाचा.

  18. ताजे कल (सकाळी 11:30 वाजेपर्यंतची आकडेवारी)

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे हे ताजे कल आहेत. सध्या भाजप हा सर्वांत मोठा पक्ष सिद्ध होताना दिसत आहे.

    या विधानसभा निवडणुकीबाबतचे सगळे अपडेट्स तुम्हाला इथे वाचता येतील.

  19. माहिम विधानसभा मतदारसंघ

    माहिम मतदारसंघातील निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे उभे आहेत. मात्र, सध्या ते पिछाडीवर आहेत.

    या मतदारसंघातील चित्र कसं होतं, हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

    • सहाव्या फेरीअखेर
    • महेश सावंत (शिवसेना - उद्धव ठाकरे) - 19562
    • सदा सरवणकर (शिवसेना - एकनाथ शिंदे) - 11732
    • अमित ठाकरे (मनसे) - 8289
    • महेश सावंत 7830 मतांनी आघाडीवर आहेत.
  20. 'बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घ्या' - संजय राऊत

    सध्या जे कल येत आहेत, त्यावर महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे.

    त्यांनी आपल्या 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलं आहे की, "Ballet Paper (मत पत्रिका) वर पुन्हा निवडणुका घ्या. महाराष्ट्राचा निकाल हा जनमताचा कौल नाही.नाही! नाही! त्रिवार नाही! असा निकाल लागूच शकत नाही."

    • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबतचे आतापर्यंतचे सगळे अपडेट्स तुम्ही इथे वाचू शकता.