You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

'विकासाचा विजय झाला' - पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. राज्यात महायुतीकडे सत्ता येईल असे दिसत आहे.

थोडक्यात

  • महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवा
  • राज्यातील 288 मतदारसंघांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान पार पडलं, आता आज 23 नोव्हेंबरला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू
  • महायुती 224, महाविकास आघाडी 56 तर इतर 08 जागांवर आघाडीवर
  • राज्यभरात महायुतीला मिळालेल्या कौलासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मानले मतदारांचे आभार.
  • बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर, हितेंद्र ठाकूर, पृथ्वीराज चव्हाण, नवाब मलिक पराभूत.
  • अमित देशमुख, धीरज देशमुख, ऋतूराज पाटील पिछाडीवर
  • मनसे उमेदवार अमित ठाकरे माहिममधून पराभूत झाले आहेत.
  • नितेश राणे, सुधीर गाडगीळ, आदिती तटकरे, रोहित पाटील विजयी झाले आहेत.

लाईव्ह कव्हरेज

ओंकार करंबेळकर

  1. छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघ

    • पहिली फेरी
    • महाविकास आघाडी - राजू शिंदे 5622
    • महायुती- संजय शिरसाट 5105
  2. इस्लामपूर मतदारसंघ अपडेट्स

    राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जयंत पाटील दुसऱ्या फेरीअंती 1195 मतांनी आघाडीवर

    • जयंत पाटील - 5828
    • निशिकांत पाटील - 4633
  3. धामणगाव रेल्वे मतदारसंघ अपडेट्स

    • प्रताप अडसड - 3366
    • विरेंद्र जगताप - 2782
  4. साकोली मतदारसंघ अपडेट्स

    • नाना पटोलें - 2859
    • अविनाश ब्राम्हणकर - 2547
  5. तासगाव मतदारसंघ अपडेट्स

    • तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघ - पहिली फेरी
    • रोहित पाटील -/5168
    • संजयकाका पाटील -/4762
    • राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित आर आर पाटील 406 मतांनी आघाडीवर
  6. बारामती अपडेट्स

    • अजित पवार - 9, 291
    • युगेंद्र पवार - 5,668
    • अजित पवार 3,623 मतांनी आघाडीवर
  7. सांगली अपडेट्स

    इस्लामपूर मतदारसंघ - राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे जयंत पाटील 691 मतांनी आघाडीवर

    टपाली मतांमध्ये सांगली मधून भाजपाचे सुधीर गाडगीळ आघाडीवर

  8. पोस्टल मतमोजणीमध्ये कोण आघाडीवर?

    भंडारा- नरेंद्र पहाडे आघाडीवर

    तुमसर- राजू कारेमोरे आघाडीवर

    साकोली - नाना पटोले आघाडीवर

  9. पोस्टल मतमोजणीस सुरुवात

    पोस्टल मतमोजणी सुरु झाली आहे. सुरुवातीच्या अर्ध्या तासात पोस्टल मतमोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मशीनमधील मतांची मोजणी केली जाईल. मतमोजणीच्या अनेक फेऱ्यांनंतर अंतिम निकाल स्पष्ट होतो.

  10. कोल्हापूर जिल्ह्यात कुणाची कशी आहे आघाडी?

    टपाली मतांमध्ये...

    • कागलमध्ये महायुतीचे हसन मुश्रीफ आघाडीवर
    • राधानगरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे प्रकाश आबिटकर आघाडीवर
    • शिरोळमध्ये महायुतीचे राजेंद्र पाटील यड्रावकर आघाडीवर
    • इचलकरंजीमधून महायुतीचे राहुल आवाडे आघाडीवर
    • शाहुवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे विनय कोरे आघाडीवर
    • कोल्हापूर दक्षिणमधून महाविकास आघाडी (काँग्रेस) ऋतुराज पाटील आघाडीवर
  11. मातोश्रीबाहेर बॅनर

    'कुटुंबप्रमुख होणार पुन्हा मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर लावण्यात आले आहेत.

  12. कुणी किती जागा लढवल्या?

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये कुणी किती जागा लढवल्या, याची ही आकडेवारी!

  13. असं आहे सध्याचं राजकीय गणित

    या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रामुख्याने लढत होत आहे.

    महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांचा समावेश आहे.

    सध्या पक्षीय बलाबल कसं आहे, ते पाहा...

  14. कसं आहे विधानसभा निवडणुकीचं चित्र?

  15. मोतमोजणीला सुरुवात

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे.

    यासंदर्भातील इत्यंभूत आकडेवारी तुम्ही इथे पाहू शकता.

  16. आतापर्यंत काय काय झालं?

    • पोलिंग एजंट्स मतमोजणी केंद्रांवर दाखल झाले आहेत.
    • मातोश्रीबाहेर मोठा फौजफाटा दाखल करण्यात आला आहे.
    • तसेच प्रत्येक मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे.
    • उमेदवारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रामध्ये दाखल झाले आहेत.
    • अवघ्या काही मिनिटांमध्ये म्हणजेच आठ वाजता मतमोजणीस सुरुवात होईल.
    • पहिल्या अर्ध्या तासात पोस्टल मतमोजणीला सुरुवात होईल.
  17. 'मातोश्री'बाहेर मोठा फौजफाटा

    शिवसेना या पक्षाची दोन शकले झाली. सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सत्तेत आहे तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना विरोधात आहे.

    खरी शिवसेना कुणाची, या प्रश्नाचं खऱ्या अर्थाने उत्तर याच निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट होणार आहे.

    निकालाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर पोलिसांचा अक्षरश: फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

  18. 288 मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची संपूर्ण यादी!

    राज्यातील 288 मतदारसंघासाठी 4 हजार 136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

    पण काही अपवाद वगळता, राज्यात प्रमुख लढत ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच आहे.

    महाविकास आघाडी आणि महायुती अशा दोन्ही गटांमध्ये प्रमुख तीन-तीन राजकीय पक्ष आहेत, तर इतर काही लहान पक्षही त्यांच्या साथीनं आहेत.

    तसंच, वंचित बहुजन आघाडी, परिवर्तन महाशक्ती आघाडी आणि मनसे अशा पक्षांच्या उमेदवारांमुळे काही ठिकाणी तिरंगी लढतीही पाहायला मिळणार आहेत.

    288 मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांची यादी तुम्हाला इथे वाचता येईल.

  19. मतमोजणी केंद्रं सज्ज!

    अवघ्या काही मिनिटांमध्ये मतमोजणीस सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रभरामध्ये ठिकठिकाणी मतमोजणी केंद्रं सज्ज झाली आहेत!

  20. मतमोजणी केंद्रांबाहेर कडेकोट सुरक्षाव्यवस्था

    विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे.

    त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभरातील मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.