चीन: माथेफिरूचा बालवाडीवर चाकूने हल्ला, 2 लहानगे ठार, 16 जखमी

फोटो स्रोत, Getty Images
एका माथेफिरूने बालवाडीमध्ये घुसून तिथं उपस्थित असलेल्या बालकांवर चाकूहल्ला केल्याची घटना चीनमध्ये घडली आहे. या घटनेत 2 बालकांचा जागीच मृत्यू झाला असून 16 जण जखमी असल्याची माहित मिळाली आहे.
चीनी माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, चीनच्या दक्षिणेकडे असलेल्या ग्वांगझेई झांगजू प्रांतात बेलिऊ शहरात हा प्रकार घडला.
माथेफिरुच्या हल्ल्यात जखमी झालेल्या 16 जणांपैकी दोघांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
चीनमधील शाळांमध्ये चाकूहल्ला होण्याचा प्रकार नवा नाही. याआधीही शाळांमध्ये अशा प्रकारचे हल्ले झाल्याची इतिहासात नोंद आहे.
अशा घटनांमध्ये सहभाग असलेल्या व्यक्ती मुख्यत्वे मानसिक संतुलन ढासळलेल्या होत्या, त्यांनी अधिकारी किंवा वैयक्तिक बदला घेण्याच्या दृष्टीने हे कृत्य केलं, असा आजवरचा अनुभव आहे.

बुधवारी बेलिऊमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्याचा उद्देश अद्याप स्पष्ट नाही. स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी दोनच्या सुमारास संशयित हल्लेखोराने बालवाडी शाळेत प्रवेश केला होता.
या घटनेत एकूण 16 बालकं तर 2 शिक्षक यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यापैकी 2 बालकं जागीच दगावली. दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. इतर 14 जणांवर उपचार सुरू आहे, अशी माहिती शिन्हुआ वृत्तसमूहाने दिली आहे.
चीनमध्ये बालवाडीत वय वर्षं 3 ते 6 दरम्यानची मुले शिक्षण घेतात.
याआधी सप्टेंबर 2019 मध्ये चीनमधील एका शाळेत अशाच प्रकारचा जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 9 विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेतील हल्लेखोर हा शाळेत विद्यार्थी असताना त्याला रागावण्यात आलं होतं. या गोष्टीचा राग त्याच्या मनात होता, असं सांगितलं जातं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)























