कोव्हिड संकटात पाकिस्तान भारतासोबत ठामपणे उभा - इमरान खान

फोटो स्रोत, AFP
कोरोना व्हायरसच्या या धोकादायक लाटेचा भारत सामना करत आहे. या कोव्हिड संकटात पाकिस्तान भारतासोबत ठामपणे उभा आहे, असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी केलं आहे.
इमरान खान यांनी ट्विट करून लिहिलं, "कोरोना व्हायरसच्या या धोकादायक लाटेचा भारत सामना करत आहे. या संकट काळात मी भारतीय नागरिकांच्या सोबत आहे. आपले शेजारी आणि संपूर्ण जग कोरोना साथीविरुद्ध लढत आहेत. त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं, अशी मी प्रार्थना करतो. आपण या जागतिक संकटाचा सामना एकत्रितपणे आणि माणुसकीने करू."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
इमरान खान यांनी हे ट्विट केल्यानंतर भारतीय ट्विटर युझर त्यांचे आभार मानताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकही भारतातील कोरोना संकटाबाबत चर्च करत आहे.
भारतातही ट्विटरवर #PakistanstandswithIndia ट्रेंड करत आहे.
भारतात कोरोना संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चाललं आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतात प्रतिदिन 3 लाखांपेक्षाही जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहे.
जगभरातील माध्यमं आणि समाज माध्यमांवर भारतातील कोरोना स्थितीची चर्चा आहे. यामध्ये ऑक्सिजन आणि बेड यांची कमतरता यांच्याबाबत जास्त चर्चा पाहायला मिळते.
शेजारील पाकिस्तानातही भारतातील कोरोना स्थितीबाबत चर्चा होत आहे.
शुक्रवारी (23 एप्रिल) पाकिस्तानात #WeCantBreathe, #IndiaNeedsOxygen आणि #IndianLivesMatter यांसारखे हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होते.
#IndiaNeedsOxygen हॅशटॅग वापरून आतापर्यंत 28 हजारांपेक्षा जास्त ट्वीट करण्यात आले आहेत. तसंच #WeCantBreathe हॅशटॅग वापरून करण्यात आलेल्या ट्वीटची संख्या 54 हजारांहून जास्त आहे.
दोन्ही देशांतील संबंधांमध्ये राजकीय तणाव असला तरी पाकिस्तानातील नागरिकांकडून भारताच्या मदतीची मागणी केली जाणं, ही अत्यंत विशेष बाब आहे.
'इम्रान खान यांनी मदत करावी'
पत्रकार वजाहत काजमी यांनी #Indianeedsoxygen हा हॅशटॅग वापरून ट्वीट केलं आहे.
भारतातील स्थिती काळजीत टाकणारी आहे. कोव्हिडमधून सगळे जण बरे व्हावेत, भारतासाठी प्रार्थना, असं ते म्हणाले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
पख्तून सामाजिक कार्यकर्ते उसामा खिल्जी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारताची मदत करण्याची मागणी केली.
त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "मी हजारो पाकिस्तानी नागरिकांच्या वतीने सरकारला विनंती करतो की त्यांनी भारताची ऑक्सिजनच्या संदर्भात मदत करावी. पाकिस्तानात #IndiaNeedsOxygen आणि #IndianLivesMatter हे हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचं पाहणं आनंददायी आहे. लोकांच्या प्रेमाचं हे द्योतक आहे."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
डी कमाल म्हणाल्या, "पाकिस्तान अंतर्गत मतभेद विसरून आवश्यक त्या गोष्टींचा पुरवठा भारताला करेल, अशी अपेक्षा आहे. तिथली छायाचित्रे आणि बातम्या भीतीदायक आहेत. माणुसकी सर्वप्रथम."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
तसंच भारत शेजारी आहे, शत्रू नाही, असं ट्वीट सलमान हैदर यांनी यावेळी केलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
दोन्ही देशांना उपदेश
अम्मार हाश्मी या ट्वीटर अकाऊंटवरून दोन्ही देशांना उपदेशाचे डोस देण्यात आले. #WeCantBreathe हा हॅशटॅग वापरत त्यांनी लिहिलं, "दोन्ही देशांनी सैन्यावर पैसा खर्च करण्याऐवजी आरोग्ययंत्रणेवर केला असता तर परिस्थिती वेगळी असली असती."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
उस्मान महबूब म्हणतात, राजकीय किंवा ऐतिहासिक मतभेद दूर ठेवून आपण भारताची मदत केली पाहिजे, अन्यथा माणुसकीने दम तोडला असं म्हणावं लागेल.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 7
तर अनेकजण पाकिस्तानला भारताकडून धडा घेण्याचा सल्ला देत आहेत.
पाकिस्तानने आपल्या देशातील यंत्रणा सुसज्ज करावी, असं अनेक जण म्हणत आहेत.
तूबा जमाली ट्वीट करताना म्हणतात, "भारताची आरोग्य व्यवस्था आपल्यापेक्षा चांगली असूनही ती कोलमडली. कोव्हिड-19 चा हा स्ट्रेन अत्यंत धोकादायक आहे. पाकिस्तानात लगेच लॉकडाऊन लावायला हवा. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णसंख्या वाढणं आपल्याला परवडणार नाही."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 8
पाकिस्तानात कोरोनाची तिसरी लाट वेगाने पसरत आहे. येथील रुग्णसंख्याही वेगाने वाढताना दिसत आहे. पाकिस्तानातील रुग्णालयांवरील भारही वाढत चालला आहे.
गेल्या 24 तासांत पाकिस्तानात 5480 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तसंच कोरोनाने 144 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी सर्वाधिक मृत्यू पंजाब प्रांतात झाले आहेत.
देशातील मोठ्या शहरांमध्ये व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेडची आवश्यकता असणारे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)