You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वीडनमध्ये कुराण जाळल्यानंतर झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण
स्वीडनमधील एका पक्षाच्या समर्थकांनी कुराण जाळल्यानंतर निदर्शनं झाली. विरोध करणाऱ्या निदर्शक आणि पोलिसांमध्ये झटापट होण्याच्या घटना घडल्या आहेत.
शुक्रवारी अनेक तास चाललेल्या या निदर्शनांनी हिंसक वळण घेतलं.
स्वीडनच्या दक्षिणेस असणाऱ्या माल्मो शहरात झालेल्या या निदर्शनांमध्ये निदर्शकांनी गाड्या जाळल्या तसेच दुकानांची तोडफोडही केली.
अनेक निदर्शकांना अटक केल्याचं आणि सध्या स्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. तत्पुर्वी शुक्रवारी अती उजव्या विचारसरणीचे नेते रासमुस पालुदन यांना एका रॅलीमध्ये सहभागी होण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.
याच रॅलीमध्ये कुराण जाळण्याची योजना होती. रासमुस या रॅलीत अनुपस्थित असतानाही समर्थकांनी कुराण जाळलं.
दोन वर्षं शहरात येण्यास तुम्हाला बंदी आहे असं सांगून पोलिसांनी रासमूस यांना शहराच्या सीमेवरच रोखलं होतं.
रासमुस पालुदन हे अती-उजव्या विचारसरणीच्या स्ट्राम कुर्स पक्षाचे प्रमुख आहेत. या पक्षाने स्थलांतर धोरणाचा वारंवार विरोध केला आहे.
त्यांना याच वर्षी वंशभेद आणि इतर गुन्ह्यांसाठी एक महिन्याची कारावासाची शिक्षा सुनावली होत.
त्यांच्या पक्षाच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर मुसलमान विरोधी व्हीडिओ पोस्ट केल्याबद्दलही त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)