You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं
घरात आणि रानवनात तुम्ही कोळ्याचं जाळं पाहिलं असेल. हे जाळ असं किती मोठं असू शकतं? 6 इंच, 1 फूट, 2 फूट. यापेक्षा जास्त नक्कीचं नाही. पण तुम्हाला आश्चर्य वाटले, ग्रीसमध्ये समुद्र किनाऱ्यावर तब्बल 310 फूट लांबीचं कोळ्यांचं जाळं दिसून आलं आहे.
पश्चिम ग्रीसमध्ये उबदार हवामानामुळे हे जाळ विणलं आहे.
ग्रीसमधील ऐटोलिकोमध्ये समुद्रकिनारी हिरवळीवर हे भलं मोठं जाळं पसरलं आहे. तिथल्या डेली हेल्लासने ही बातमी दिली आहे.
तज्ज्ञांचं मत आहे की घटना ठराविक काळात दिसणारी आहे. टेट्रागांथा प्रजातीचे कोळी असं मोठं जाळं निर्माण करू शकतात.
इथं डासांची संख्या वाढली असल्याने तेही यामागंच एक कारण असावं असं तज्ज्ञांना वाटतं.
इथल्या डेमोर्टिकस विद्यापीठातील प्रा. मारिया चाट्जकी म्हणाल्या, "ग्रीसमधील तापमान जास्त आहे. शिवाय आर्द्रताही आहे. शिवाय अन्नही उपलब्ध असल्याने या कोळ्यांनी हे जाळं विणलं केलं आहे. खरंतर कोळ्यांसाठी ही पार्टीच आहे. त्यांना भरपूर अन्न आहे, त्यांना जोडीदारही मिळाले आहेत. या कोळ्यांचा माणसांना आणि तिथल्या वनस्पतींना कोणताही धोका नाही."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)