You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कॅटरिना कैफ -विकी कौशल यांना जीवे मारण्याची धमकी, तक्रार दाखल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल या दोघांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार अज्ञात लोकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईच्या सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून कॅटरिनाला सोशल मीडियाहून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. पोलिसांनी आयटी अॅक्टच्या कलमांअंतर्गत तक्रार दाखल केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विकी कौशल आणि कॅटरिना यांचं लग्न झालं होतं. याआधी, सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
तुमचाही मुसेवाला करू- सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचं पत्र
पंजाबी रॅपर सिध्दू मूसेवाला याची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकी देणारं पत्र मिळालं होतं.
'सलमान और आपका बहुत जल्द मुसेवाला होगा' ( सलमान आणि तुमचा लवकरच मुसेवाला होणार) अशी धमकी चिठ्ठीतून देण्यात आली आहे.
सलीम खान यांना हे धमकीचं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी लगेचच पोलिसांना याबद्दल माहिती दिली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेलेले सलीम खान वांद्र्यातील बँड स्टँड इथं नेहमीचे बेंचवर बसले असता कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांना आणि सलमान खानला चिट्ठीद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या सुरक्षारक्षकाद्वारे पोलिसांशी संपर्क साधला.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)