बीबीसी मराठीच्या श्रीकांत बंगाळे यांना 'रेड इंक' पुरस्कार

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

बीबीसी मराठीचे पत्रकार श्रीकांत बंगाळे यांना मुंबई प्रेस क्लबतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'रेड इंक' पुरस्कार जाहीर झाला आहे.

महिला सक्षमीकरण आणि लिंग समानता या श्रेणीत श्रीकांतच्या यांच्या बातमीला मानांकन मिळालं होतं.

घरातील तीन व्यक्तींनी आत्महत्या केल्यानंतरही खचून ना जाता जिद्दीने उभं राहत 29 एकरांची शेती सांभाळणाऱ्या ज्योती देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी श्रीकांत यांनी मांडली होती.

ज्योती देशमुख यांचा व्हीडिओ बीबीसीच्या राहुल रणसुभे यांनी एडिट केला होता.

ज्योती देशमुख यांच्या संघर्षमय वाटचालीचा प्रवास तुम्ही इथे वाचू आणि पाहू शकता.

श्रीकांत यांनी गावाकडच्या गोष्टींच्या माध्यमातून शेतीचे तसंच ग्रामीण भागाचे प्रश्न, सरकारी योजनांसाठी कशा पद्धतीने कागदपत्रांची सिद्धता कशी करायची याचं वृत्तांकन तुम्हाला इथे वाचायला मिळू शकेल.

दरवर्षी मुंबई प्रेस क्लबतर्फे पत्रकारितेतील विविध विषयांवर सखोल वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कार दिले जातात. रेड इंक पुरस्काराचं हे दहावं वर्ष आहे.

बीबीसी मराठीच्या अनघा पाठक आणि निलेश धोत्रे यांनाही नामांकन प्राप्त झालं होतं.

अनघा यांनी मुंबईपासून अवघ्या काही तासांवर असणाऱ्या गावातील पिण्याच्या पाण्याच्या समस्येविषयी वृत्तांकन केलं होतं. ही स्टोरी तुम्ही इथे पाहू शकता तर राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलनातली एक रात्र नीलेश धोत्रे यांनी टिपली होती.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)