बीबीसीच्या अनघा आणि वंदना यांचा लाडली पुरस्काराने सन्मान

लाडली, लिंगभाव समानता, बीबीसी, मीडिया
फोटो कॅप्शन, बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अनघा पाठक लाडली पुरस्कार प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्हासह
Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

लाडली मीडिया अँड अडव्हर्टायिझिंग अवॉर्ड्स फॉर जेंडर सेन्सिटिव्हिटी पुरस्कारांमध्ये बीबीसीने छाप उमटवली. बीबीसीला तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी अनघा पाठक यांना जमिनीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या महिलेचा संघर्ष मांडणाऱ्या बातमीसाठी गौरवण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

बीबीसीच्या वंदना यांना पितृसत्ताक पद्धतीला छेद देत कुस्तीसारख्या खेळात आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या विनेश फोगटच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या बातमीसाठी सन्मानित करण्यात आलं. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर या उपक्रमासाठी विनेशच्या कारकीर्दीचा प्रवास वंदना यांनी टिपला.

वंदना यांना मासिक पाळी संदर्भात मौन आणि त्याचा खेळावर होणारा परिणाम यासाठी बीबीसी गुजराती टीव्हीसाठी केलेल्या बातमीकरता गौरवण्यात आलं.

लाडली, लिंगभाव समानता, बीबीसी, मीडिया
फोटो कॅप्शन, बीबीसीच्या वंदना दोन लाडली पुरस्कारांसह

लाडली पुरस्कार सोहळ्याच्या 11व्या आवृतीत अनघा आणि वंदना यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कारांसाठी प्रादेशिक भाषांमधील 98 पत्रकार शर्यतीत होते.

देशभरातून 10 विविध भाषांमधून पुरस्कारासाठी 900हून अधिक प्रवेशिकांची नोंदणी झाली होती.

UNFPA आणि भारतातील नॉर्वे दूतावास यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.

प्रसारमाध्यमांद्वारे लिंगभाव समानतेसंदर्भात केल्या जाणाऱ्या वृत्तांकनासाठी दिला जाणारा लाडली हा विशेष पुरस्कार आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)