You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी मंत्रिमंडळ यादी: मोदींच्या मंत्रिमंडळात अनेक फेरबदल
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला आहे. मंत्रिमंडळात अनेक बदल करण्यात आले आहेत.
मनसुख मांडवीय यांच्याकडे आरोग्य खात्याचा पदभार देण्यात आला आहे. नारायण राणेंना सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खातं देण्यात आलं आहे. ज्योतिरादित्य शिंदेंकडे नागरी उड्डाण खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गृहमंत्री अमित शाह नव्याने निर्माण केलेलं सहकार खातं सांभाळणार आहेत. शिक्षण खात्याचा पदभार धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे आला आहे.
किरण रिजिजू हे नवे कायदा मंत्री झाले आहेत तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
किरण रिजिजू हे नवे कायदा मंत्री झाले आहेत तर हरदीप सिंग पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खात्याचा पदभार सोपवण्यात आला आहे.
कुणाकडे कोणते खाते
नरेंद्र मोदी - पंतप्रधान, निवृत्ती वेतन, कार्मिक मंत्रालय, आण्विक ऊर्जा
कॅबिनेट मंत्री
- राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय
- अमित शाह - गृह मंत्रालय आणि सहकार
- नितीन गडकरी - भुपृष्ट वाहतूक आणि महामार्ग
- निर्मला सीतारामण - अर्थ मंत्रालय
- नरेंद्र सिंह तोमर - कृषी
- एस. जयशंकर - परराष्ट्र मंत्रालय
- अर्जुन मुंडा - आदिवासी संबंधित विभाग
- स्मृती इराणी - महिला आणि बाल कल्याण
- पीयूष गोयल - वाणिज्य, उद्योग आणि ग्राहक समस्या, कापड उद्योग
- धर्मेंद्र प्रधान - शिक्षण आणि कौशल्य विकास
- अश्विनी वैष्णव - रेल्वे, माहिती आणि तंत्रज्ञान
- मनसुख मांडवीय - आरोग्य
- प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज, कोळसा आणि उत्खनन
- नारायण राणे - सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
- सर्वानंद सोनोवाल - बंदरे, शिपिंग, जलमार्ग आणि आयुष मंत्रालय
- मुख्तार अब्बास नकवी - अल्पसंख्याक मंत्रालय
- वीरेंद्र कुमार - सामाजिक न्याय
- गिरीराज सिंह - ग्रामविकास आणि पंचायती राज
- ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण
- आर. एस. पी. सिंह - स्टील
- पशुपती कुमार पारस - अन्न प्रक्रिया उद्योग
- गजेंद्र सिंह शेखावत - जलशक्ती
- हरदीप सिंह पुरी - पेट्रोलियम
- महेंद्र नाथ - अवजड उद्योग
- अनुराग ठाकूर - माहिती प्रसारण, क्रीडा आणि युवा मंत्रालय
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)