You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोनाची लागण
- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 1 मिनिटे
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांना उपचारासाठी नागपुरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानुसार डॉ. प्रकाश आमटे यांना नागपुरातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
डॉ. प्रकाश आमटे हे समाजसेवक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. महारोगी सेवा समितीच्या लोक बिरादरी प्रकल्पाचं काम डॉ. प्रकाश आमटे पाहतात.
"गेल्या सात दिवसांपासून त्यांना ताप आणि खोकला होता. दोन दिवसांपूर्वी त्यांची RTPCR चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र ताप आणि खोकला कमी होत नसल्याने त्यांनी आज पुन्हा कोरोना चाचणी केली. त्यात ते पॉझिटिव्ह आले आहे," अशी माहिती डॉ. प्रकाश आमटे यांचे पुत्र अनिकेत आमटे यांनी दिली आहे.
डॉ. प्रकाश आमटे यांची रक्त चाचणी आणि सिटी स्कॅनमध्ये कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं.
त्यामुळं पुढील काही दिवस हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प, आनंदवन आणि सोमनाथ प्रकल्प पुढील काही दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारत सरकारकडून 'पद्मश्री' पुरस्काराने डॉ. प्रकाश आमटे यांचा गौरव झाला आहे. तसंच, रॅमन मॅगसेसे, मदर तेरेसा अवॉर्ड्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आलं आहे.
'प्रकाशवाटा' ही डॉ. प्रकाश आमटे यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. मराठी, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा भाषांमध्ये ही आत्मकथा अनुवादित झालीय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)