IPL 2020: मुंबईची दिल्लीवर विजयी स्वारी

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर मुंबईने दिल्लीवर 5 विकेट्सनी विजय मिळवला.

दिल्लीने पहिल्यांदा बॅटिंग करताना 162 रन्सची मजल मारली. मुंबईने शेवटच्या ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत विजय साकारला.

संथगतीच्या खेळपट्टीवर कशी बॅटिंग करावी याचा नमुना सादर करताना क्विंटन आणि सूर्यकुमार दोघांनीही प्रत्येकी 53 रन्सची खेळी केली. क्विंटनने 4 चौकार 3 षटकार लगावले तर सूर्यकुमारने 6 चौकार आणि एक षटकार लगावला. इशान किशनने 28 रन्स केल्या.

दुखापतग्रस्त झाल्याने दिल्लीला ऋषभ पंतला वगळावे लागले. यामुळे अजिंक्य रहाणे आणि अलेक्स कॅरे यांना संधी मिळाली. कॅरेला घेतल्याने शिमोरन हेटमायरला संघाबाहेर जावे लागले. टॉप सहापैकी दोन हिटर बॅट्समन बाहेर गेल्याने दिल्लीच्या सुरुवातीच्या चार बॅट्समनवरचं दडपण वाढलं.

यामुळेच शिखर धवनने खेळपट्टीवर नांगर टाकून बॅटिंग केली. वीस ओव्हर खेळून काढून शिखरने 52 बॉलमध्ये 69 रन्सची खेळी केली. यामध्ये 6 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. श्रेयस अय्यरने 42 रन्सची खेळी केली. पृथ्वी शॉला केवळ चार रन्स करता आल्या.

यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच संधी मिळालेल्या अजिंक्य रहाणेने 15 रन्स केल्या. कृणाल पंड्याने त्याची खेळी संपुष्टात आणली. मुंबईच्या बॉलर्सनी शिस्तबद्ध बॉलिंग करत दिल्लीला 162 रन्समध्येच रोखलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)