कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना कोरोना #5मोठ्या बातम्या

मेघवाल

फोटो स्रोत, Twitter

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.

1. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांना कोरोना 

कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मेघवाल यांच्या कोरोनाच्या पहिल्या चाचणीचे निकाल निगेटिव्ह आले होते.

मात्र, दुसऱ्या चाचणीचे निकाल पॉझिटिव्ह आले. माझी प्रकृती स्थिर आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हॉस्पिटलात दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असं मेघवाल यांनी म्हटलं आहे. 'एनडीटीव्ही'ने ही बातमी दिली आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

मेघवाल हे राजस्थानमधील बिकानेरचे खासदार आहेत. काही दिवसांपूर्वी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला मेघवाल यांनी दिला होता. यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.  

2. उद्धव ठाकरे कार्यक्षम मुख्यमंत्र्यांच्या यादीत

कोरोना काळात राज्याचा गाडा यशस्वीपणे हाताळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना स्थान पटकावले आहे. इंडिया टुडे आणि कार्वी यांच्यातर्फे संयुक्तपणे घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना वाचकांची सर्वोत्तम पसंती मिळाली आहे.

उद्धव ठाकरे

फोटो स्रोत, facebook

फोटो कॅप्शन, उद्धव ठाकरे

'मूड ऑफ द नेशन' असं या सर्वेक्षणाचं नाव होतं. ग्रामीण तसंच शहरी भागातल्या नागरिकांना कामकाजाबद्दल विविध प्रश्न विचारण्यात आले. 24 टक्के लोकांनी आदित्यनाथ यांच्या कामाला दाद दिली आहे. 15 टक्क्यांसह दिल्लीचे अरविंद केजरीवाल दुसऱ्या स्थानी तर आंध्र प्रदेशचे वायएस जगनमोहन रेड्डी 11 टक्के मतांसह तिसऱ्या स्थानी आहेत.

ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. उद्धव ठाकरे यांना 7 टक्के मतं मिळाली आहेत. 

3. बेळगावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद 

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील बेळगावजवळच्या मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झाला आहे. 'टीव्ही9'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

7 ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. मात्र, पुतळा हटवण्यासाठी पोलिसांनी दबाव आणला होता. मनगुत्ती येथील नागरिक यासाठी रस्त्यावर उतरले होते.

शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर पोलिसांचा दबाव कमी झाला आणि शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला. मात्र, आता हाच पुतळा कर्नाटक सरकारनं हटवला आहे.सरकारच्या आदेशानंतर रातोरात पोलीस बंदोबस्तात शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील शिवभक्तांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

4. सीबीआय अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी अन्यथा क्वारंटीन- महापौर

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास आता सीबीआयचे अधिकारी करणार आहेत. पाटण्याचे एसपी विनय तिवारी यांना क्वारंटाईन केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यामुळे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आधीच सीबीआयच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा दिला आहे.

मुंबईत दुसऱ्या राज्यातून येणाऱ्यांना प्रथम मुंबई पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल. जर ही परवानगी घेतली नाही तर नियमानुसार १४ दिवस क्वारंटाईन करावे लागेल, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी बजावले आहे.  'झी न्यूज'ने ही बातमी दिली आहे.

कोरोना
लाईन

14 जून 2020 रोजी सुशांतचा मृत्यू झाला होता. सुशांतसिंह आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करीत होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी पाटणा येथे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर बिहार राज्यातील पाटण्याचे पोलीस मुंबई येऊन तपास आणि चौकशी करीत होते. दरम्यान, कोविड-19 च्या प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर पाटण्याचे एसपी विनय तिवारी हे विमानाने मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना मुंबई महापालिकेने राज्य शासनाच्या नियमानुसार क्वारंटाईन करण्यात आले होते. यावरुन वाद निर्माण झाला. कालच त्यांना क्वारंटाईनमधून मुक्त करण्यात आले होते.   

5. मोदी सरकारचे 20 लाख कोटी गेले कुठे? काँग्रेसचं आंदोलन

कुठे गेले ते वीस लाख कोटी रुपये? हा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र युवक काँग्रेस एक अनोखं राज्यव्यापी आंदोलन करणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी 12 मे 2020 रोजी 20 लाख कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. पण जमिनीवर याची किती अंमलबजावणी झाली आहे हे दाखवण्यासाठी हे पर्दाफाश आंदोलन करत असल्याचा युवक काँग्रेसचा दावा आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ही माहिती दिली. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे. 

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

10 ते 14 ऑगस्ट या कालावधीत चालणाऱ्या या आंदोलनात युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते पहिल्या दिवशी शेतकऱ्यांकडे जाऊन या 20 लाख कोटी पॅकेजचा काही लाभ मिळाला आहे की नाही व त्यांच्या प्रतिक्रिया व्हीडीओ चित्रित करणार आहेत. 

छोट्या व्यापाऱ्यांना जीएसटीमध्ये सवलत मिळाली का? नोकरदारांच्या काय अडचणी आहेत, बेरोजगार झालेल्या युवकांना काय मदत मिळाली ह्याचा पर्दाफाश युवक काँग्रेस करणार असून ह्या सर्वांच्या मागण्या व्हिडिओ चित्रण करुन व पंतप्रधान कार्यालयाला फोन करून व पत्र लिहून सरकारला जाब विचारणार आहेत. 

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)