पुणे आत्महत्या : एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

पुण्याच्या सुखसागर नगरमधील एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

यामध्ये एका जोडप्याचा समावेश असून दोन लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती वृत्तसंस्था PTIनं दिली आहे.

काल रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.

अतुल दत्तात्रय शिंदे (33), जया अतुल शिंदे (32) , ऋग्वेद अतुल शिंदे (6) आणि अंतरा अतुल शिंदे (3) अशी मृतांची नावं आहेत.

याप्रकरणाविषयी पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी माहिती दिली की, "गुरुवारी रात्री 10 वाजता शशिकांत चुहे यांनी फोन करून पोलिसांना कळवलं की, अतुल शिंदे त्यांच्या फोन कॉल्सला प्रतिसाद देत नाही. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घरात प्रवेश केला, तेव्हा चौघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आलं."

"पोलिसांनी या घटनेसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, असं घरातील भींतीवर लिहिलेलं आहे. तरीदेखील या घटनेची पुढील चौकशी सुरू आहे," असंही ताम्हाणे यांनी सांगितलं.

पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे यांनी माध्यमांना सांगितलं, "सुरुवातीला तरी असं दिसत आहे की, या घटनेमागे आर्थिक कारणं असण्याची शक्यता आहे. या कुटुंबातील व्यक्ती I-card बनवण्याच्या व्यवसाय करत होता. पण, लॉकडाऊनमुळे त्याला फटका बसला. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि ती पूर्ण झाल्यास नेमकं कारण समोर येईल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)