ओमर अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका

Published
वाचन वेळ: 1 मिनिटे

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची सुटका करण्यात आली आहे. त्यांच्यावर लावण्यात आलेला नागरी सुरक्षा कायदा मागे घेण्यात आला आहे.

"काश्मीरमध्ये जे काही घडलं आहे त्याबाबत मी नंतर सविस्तर बोलेलच पण त्याआधी मी सर्वांना कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारनं जे सांगितलं आहे त्याचा अंमल करावा असं सांगेन, ज्या लोकांना नजरकैदेत ठेवलं आहे त्यांना या कठीण परिस्थितीत सोडावं आणि इंटरनेट सुविधा पूर्ववत करावी," अशी मागणी ओमर अब्दुल्ला यांनी सुटल्यानंतर केली आहे.

ओमर अब्दुल्ला यांची कधी सुटका करणार, या संदर्भात सविस्तर माहिती देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकार आणि जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिले होते.

केंद्राकडून जर ओमर अब्दुल्ला यांची लवकर सुटका झाली नाही, तर अब्दुल्ला यांच्यावतीनं अर्ज करणाऱ्या सारा अब्दुल्ला-पायलट यांची याचिका सुनावणीस घेण्यात येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं.

कलम 370 रद्द झाल्यापासून ओमर अब्दुल्ला नजरकैदेत होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)