You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.

Take me to the main website

रशियन सैन्य राजधानी कीव्हमध्ये शिरण्याच्या टप्प्यावर - झेलेन्स्की

रशियाने युक्रेनवर ‘आक्रमण’ केल्यानंतर युक्रेनच्या अनेक शहरांवर हल्ले झाले. राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रं हल्ले झाल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी म्हटलंय.

लाईव्ह कव्हरेज

  1. रशिया युक्रेन तणाव : आतापर्यंत काय घडलं?

    रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेवर लष्करी कारवाई करण्याचं जाहीर केल्यानंतर रशियाच्या फौजा तीन बाजूंनी युक्रेनकडे सरसावल्या.

    युक्रेनच्या पूर्व भागामध्ये सर्वाधिक संघर्ष सुरू असल्याचं वृत्त आहे.

    युक्रेनवर हल्ला केलेल्या रशियन फौजांनी चेर्नोबिल अणुभट्टीवर ताबा मिळवलाय.

    युद्धाच्या पहिल्या दिवशी युक्रेनमध्ये 137 जण मारले गेल्याचं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी सांगितलंय. यामध्ये सैनिकांसोबतच सामान्य नागरिकांचाही समावेश आहे.

    युक्रेनची सीमा सुरक्षा सेवा (डीपीएसए) नं 18 ते 60 वर्षाच्या युक्रेनच्या सर्व पुरुषांवर देश सोडून जाण्याची बंदी घातली आहे. ही बंदी मार्शल लॉ लागू असेपर्यंत असेल.

    अमेरिका आणि ब्रिटननं रशियावर कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केलीच आहे. त्याचबरोबर रशियाला मदत करणाऱ्या बेलारुसवरही निर्बंध लावले आहेत.

    रशियाच्या डॉलरमध्ये व्यवसाय करण्याच्या क्षमतेवरही मर्यादा आणल्या जातील असंही अमेरिकेनं म्हटलं आहे. तसंच रशियन बँकांवरही निर्बंध लादले जाणार आहेत.

    जगातील सात मोठ्या अर्थव्यवस्थांची संघटना असलेल्या जी7 देशांच्या नेत्यांमध्येही डॉलर, युरो, पाऊंड आणि येनमध्ये व्यवसाय करण्याच्या रशियाच्या क्षमतेवर मर्यादा आणण्यावर एकमत झालं आहे.